Responsive Ads Here

सोमवार, ४ मार्च, २०१९

शिक्षण समाजाच्या विकासाचा पाया- उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ


दरवर्षी गावोगावी धार्मिक सप्ताहाचे आयोजन करून आध्यात्मावर चिंतन होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्यातील संशोधनवृत्तीला व कल्पनाशक्तीला चालनामिळावी यासाठी ग्रामपातळीवरून विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय तज्ञांचे  शैक्षणिक मार्गदर्शनाचे  आयोजन करावे. शिक्षण समाजाच्या विकासाचा पाया असल्याचे विचार औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी बोलतांना काढले. मेहकर तालुक्यातील आरेगांव येथील जिल्हा परिषद शाळेला शंभर वर्ष पुर्ण झाल्याबद्दल आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. 
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन , दिप प्रज्वलन व पुलवामा येथील शहिद जवानांना श्रध्दांजी अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव जाधव  होते तर प्रमुख पाहूणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी स्वामी दिव्यानंद,मेहकरचे तहसीलदार गरकळ,सभापती भाऊराव वानखेडे, राजेंद्र पळसकर,प्रा.आशिष रहाटे,राजेंद्र गाडेकर,सुरेश वाळुकर,संजय धांडे,समाधान साबळे,निंबाजी पांडव,सागर पाटील तथा आदि उपस्थित होते. 
पुढे बोलतांना उपजिल्हाधिकारी वायाळ म्हणाले की, शाळा ही केवळ फक्त इमारत नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार,संस्कार व मूल्याधिष्ठीत जीवन जगण्याची उर्जाकेंद्र आहे. शाळेच्या इमारतीमध्ये सर्व जाती,धर्माची मुले एकत्रितपणे ज्ञानार्जन करतात. शाळामध्ये शिक्षणासोबत आदर्श व्यक्ती बनण्याची ताकद मिळत असल्याचेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दता अंभोरे यांती तर आभार राहुल डोंगरदिवे,गजानन पिंपरकर यांनी मानले.  


ध्येयप्राप्तीसाठी स्वप्नांचा पाठलाग करा.
मेहकर तालुक्यातील आरेगांव शाळेच्या शतकपूर्ती प्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात गावातील प्रथम तहसिलदार व सद्या औरंगाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले सोहम वायाळ यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना बोलतांना सांगीतले की, प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल करू नका. आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहा. मोठे स्वप्न बघा त्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी जिद्द,चिकाटी,परिश्रम व अभ्यासाचे नियोजन करा.ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करावे असेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


1 टिप्पणी: