मार्च हा जातिक महिला दिन विवेकानंद आश्रमात
साजरा करण्यात आला. महिलांचा सन्मान,सुरक्षा,
गौरव व संधी याबाबतीत समानता
असावी. महिलांना त्यांच्या हक्काची जाणिव व्हावी यासाठी दरवर्षी विविध
कार्यक्रमांचे आयोजन विवेकानंद आश्रमात केले जाते. महिला दिनाच्या निमित्ताने
आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ
डॉ.प्रज्ञा चांगाडे तसेच प्रसिध्द लेखिका खडसे मॅडम ,आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते हे होते. कार्यक्रमाची सुरूवातीला
सावित्रीबाई फुले,जीजामाता,शारदादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता समतोल आहार घ्यावा.
विद्यार्थीनींनी बुध्दीसोबतच शारीरीक व मानसीक आरोग्या बाबत जागरूक असावे.
स्त्रीला निसर्गाने निर्मितीचा मान दिला असून महिलांनी स्व सामर्थ्याची जाणिव
ठेवावी असे विचार डॉ. प्रज्ञा चांगाडे
यांनी व्यक्त केले. शिक्षणाशिवाय महिलांंची प्रगती नाही. कर्मयोगी संत प.
पू. शुकदास महाराजांसारख्या संतांनी या परिसरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी संधी
उपलब्ध करून दिली असून त्यादृष्टीने या परिसरात पोषक वातावरण निर्माण केले आहे. या
संस्थेतून शिक्षण घेवून दरवर्षी हजारो विद्यार्थीनी बाहेर पडत आहे. विवेकानंद
आश्रम ज्ञान प्रसाराचे केंद्र बनले आहे. या परिसरात मुलींना प्रवेश दिल्यावर
मुलींची सुरक्षा,गुणवत्ता व तीच्या व्यक्तीमत्वास आवश्यक असलेले
सर्व घटक याठिकाणी उपलब्ध आहेत असे विचार उषा खडसे यांनी व्यक्त केले. दुर्बलतेचा
भाव काढून टाकल्याशिवाय सबलतेकडे व सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू होत नाही.
महिलांच्या कर्तृत्वाला कोणतेही क्षेत्र आता
बाकी राहिले नसून मुलींनी स्वतःला सिध्द करून दाखविले आहे. आज हिवरा आश्रम
येथे शिकलेल्या विद्यार्थींनी उच्च शिक्षणासाठी परदेशी जात आहे. तसेच नोकरीच्या
क्षेत्रातही अग्रेसर होत आहेत. आपला विकास,
प्रगती व सक्षमीकरण हीच
शुकदास महाराजांना खरी आदरांजली ठरणार आहे असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव
संतोष गोरे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. याप्रसंगी
उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन
गि-हे,सुनिल ठेंग,पत्रकार संतोष थोरहाते आदि उपस्थित होते.
दिनानिमित्त भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवानी रडार तर आभार प्रदार्शन
जान्हवी डोसे हिने केले.
महिला दिनी विद्यार्थिनींची भाषणे
स्त्रीशक्तीची महत्व काय आहे. आजच्या काळातील महिलांनी
केलेली उल्लेखनीय कामगिरी यावर प्रकाश टाकणारी ओजस्वी भाषणे यावेळी विवेकानंद
आश्रमाच्या शैक्षणिक संस्थेत शिकणा-या कु. जान्हवी डोसे, कु. मनिषा भगत, कु. दिपाली शिंदे या विद्यार्थीनींनी महिला
महिलांना मोफत औषधींचे वाटप
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्री संस्थापित
विवेकानंद आश्रमात दरवर्षी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. महिला
दिनानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. यावेळी ५० ते ६० महिलांची
तपासणी करून महिलांना यावेळी औषधींचे वाटप करण्यात आले.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा