Responsive Ads Here

शनिवार, २८ एप्रिल, २०१८

विविध फिचर्समुळे जीमेलचे बदलले रूपडे !

पुर्वीच्या काळात पत्र हेच संदेश वहनाचे मुख्य साधन हे होते. पत्रामुळे मुलगा आईवडीलाशीभाऊ बहीणीशी,प्रियकर प्रियसी संदेशवहनाच्या माध्यमातून आपल्या भावना कळवित असे. पत्र लिहून व्यक्ती आपले सुख दुखविवाहसमारंभपुत्रप्राप्तअभिनंदनआभारगौरवसांत्वन कळवित होता. अनेकदा पत्र पोहचण्यासाठी विलंब लागत होता. आधुनिक काळात ईमेल हे संदेशवहनाचे मुख्य साधन बनले आहे. जगात सर्वात जास्त जीमेल वापरकर्त्यांची संख्या आहे. नुकतीच जीमेलची आवृत्ती अद्यावत करीत उपयुक्त ठरणा-या फिचर्सचा समावेश केला. यामुळे अनेक दिवसापासून या नवीन फिचर्स विषयी शिगेला पोहचलेल्या उत्सुकतेला पुर्ण विराम मिळाला. आता आर्काईव्ह,मार्क अ‍ॅज रीड व डीलीट यांच्या सोबत स्नूझ हा नवीन फिचरचा समावेश केला आहे. स्नूझ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ई मेल किती कालावधी नंतर बघायचा याचे विविध पर्याय सुध्दा उपलब्ध आहे. याशिवाय नवीन जीमेलमध्ये नज या नावाचे नविन वैशिष्टाचा समावेश करण्यात आला असून याच्या मदतीमुळे ईबॉक्स मेल किती दिवसांपूर्वी आला होता याची माहिती सुध्दा मिळेल. 

स्मार्ट रिप्लाय
जीमेल मध्ये स्मार्ट रिप्लाय या नवीन फिचरचा समावेश करण्यात आला असून  यामुळे इनबॉक्समध्ये आलेल्या ई मेलला तात्काळ उत्तर देता येईल. याशिवाय आर्टीफिशय इंटिलेजीयन्स तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे समोरच्या युजरला तात्काळ उत्तर देण्यासाठी सुचक वाक्यांचा सुविधा सुध्दा व्यवस्था प्रदान केली आहे. 

कॉन्फीडेशिन्शयल मोड
आता जीमेलमध्ये कॉन्डीडेशिन्शल मोडच्या माध्यमातून पाठविलेला ईमेल समोरील व्यक्ती तो मेल किती वेळापर्यंत पाहू शकेल हे सुध्दा ठरविता येणार आहे. अतिशय महत्वाचे कार्यालयीन कागदपत्रेफोटोडाटाबेस इत्यादी माहिती पाठविण्यासाठी हा मोड महत्वाचा ठरणार असून या मोडमुळे मेलची कॉपीपेस्टफॉरवर्ड किंवा डाऊनलोड किंवाकॉन्फीडेशिन्शयल मोडव्दारे पाठविलेली माहिती प्रिंट करता येणार नाही.  

ऑफलाईन मोडची सुविधा
ऑफलाईन मोडच्या मदतीने आता जीमेल वापरकर्ता इंटरनेट शिवाय सुध्दाआपल्या इनबॉक्समधील ईमेल पाहू  शकणार आहे. याशिवाय वापरकर्त्याच्या सुविधेसाठी इनबॉक्सच्या उजव्या बाजुला साईडबार मध्ये गुगल कॅलेंडरमुळे आपल्या कामाचे योग्य नियोजन  करण्यास मोठी मदत मिळणार आहे. संपूर्ण  जीमेलचे अपडेट काही महिन्यात वापरकर्त्यांनामिळणार आहे. 

असा करा  ट्राय न्यू जीमेल
जीमेल अकाउंटच्या सेटिंग आयकॉन वरती  क्लिक करावे. त्या ठिकाणी  ट्राय न्यू जीमेल  या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नविन अद्यावत फिचर्सयुक्त जीमेल सहज वापरणे शक्य होतो.

लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

अल्पभुधारकांनी घेतले काकडीचे विक्रमी उत्पादन




जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम...तिथे अन्न होऊन ठाकेल शाम...दिसे सावळे रूप त्याचे शिवारी...जिथे राबती हात तेथे हरी...संतांची वेळोवेळीसमाजाच्या मनावर श्रममूल्य रुजविले. घामाच्या धारांनीच आर्थिक उत्कर्ष होतो म्हणून कष्टाशिवाय जीवनात पर्याय नाही. जिद्द ,चिकाटी, मेहनतीसोबत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञाना वापर केल्यास कमी खर्चात शेतीमधून चांगले व भरघोस उत्पन्न घेता येते. याचाच प्रत्यय सिंदखेडराजा तालुक्यातील बाळसमुद्र येथील अल्पभुधारक शेतकरी अरूण पशराम मेरत यांनी पॉली हॉऊस मध्ये काकडीचे विक्रमी उत्पन्न घेतले असून आपला उत्पादित मालाची थेट ग्राहकापर्यंत विक्री करूनआपला आर्थीक उत्कर्ष साधला आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी नाविन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराकडे वळल्याचे विधायक  चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी पारंपारीक पिकांवर विसंबून न राहता शेतीत नवनवीन प्रयोग करून आपली आर्थिक प्रगती साधत आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी अरूण मेरत यांनी आपल्या शेतातील दहा गुंठामध्ये पॉली हाऊस उभारून त्यामध्ये काकडीची विक्रमी उत्पादन घेतले आहे. अरूण मेरत यांनी या वर्षी मल्चींग पेपरचा वापर करुन दहा गुंठयात नामधारी जातीच्या काकडीची  लागवड केली. त्यातून त्यांना आतापर्यंत ५० ते ६० हजाराचे उत्पन्न मिळाले अजून एक ते सव्वा  लाखापर्यत उत्पन्न होईल असे दैनिक सकाळीशी बोलतांना सांगीतले. अरूण मेरत आपल्या शेतातील काकडीची विक्री स्वतः बाजारात करीत असल्यामुळे एक क्विंटल मागे दोन ते अडीच हजाराचा नफा मिळत आहे. त्यांनी दहा गुंठयाच्या पॉली हॉऊस मध्ये काकडीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. शेतीची मशागत करून व सेंद्रिय खताचा छिडकाव केला. त्यावर नामधारी ४६ कंपनीची काकडीचे बियाणे फेब्रुवारी महिन्यात लावले. दोन वाफयातील अंतर चार फुट असून चार बाय दिड फुड अंतरावर काकडीचे बियाणे लावण्यात आले. पाण्याचा योग्य वापर करावा म्हणून ठिबक सिंचनाचा उपयोग केला. सद्या ठिबक सिंचनामुळे दहा गुंठयातील काकडीचे पिक जोमात आले असून वेलीला जागोजागी काकडया लागल्या आहेत. सद्यस्थितीत काकडीचे पीक दोन महिन्यांचे झाले असून त्याला यामधून १० टन काकडीचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये त्यांना साडेतीन टन काकडीचे उत्पादन झाले. एक ते सव्वा लाख उत्पन्न होईल.

ग्राहकांपर्यंत काकडीची थेट विक्री
अरूण मेरत हे आपल्या शेतातील काकडीची विक्री दुसरबीड,सुलतानपुर,शेंदुरजन,साखरखेर्डा,मेहकर,हिवरा आश्रम,अमडापूर,खळेगांव,अंढेरा,उंद्री व लोणार या येथीलबाजारात विक्री करतात.

दैनिक सकाळमधून प्रकाशीत होणा-या कृषी यशोगाथामुळे पारंपारीक शेतीला फाटा देवून आधुनिक पध्दतीने शेती करण्याचे ठरविले. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची मदत मिळाल्याने शेतीतून काकडीचे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले.
                                                                                          अरूण मेरत शेतकरी बाळसमुद्र


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

सोमवार, २३ एप्रिल, २०१८

वाचन संस्कृतीमुळे विचारांचे आदान प्रदान


जगप्रसिध्द लेखक मानवी मनातील गुंतागुंत,व्दंद,प्रेमाची भावना यांचे उत्कटपणे शब्दासामर्थ्याने विचार प्रस्तृत करणारा प्रज्ञावंत विल्यम शेक्सपियर यांची जयंती जगभरात पुस्तक दिन म्हणून साजरी करण्यात येते. पुस्तक वाचनाचे मानवी जीवनातील महत्व. वाचन संस्कृती टिकण्यासाठी कुठल्याप्रकारची उपाययोजना करावी याबाबत साहित्याचे अभ्यासक तथा विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दैनिक सकाळशी मुलाखती दरम्यान प्रकाशझोत टाकला.
यावेळी संतोष गोरे  म्हणाले कीवाचन संस्कृतीमुळे विचारांचे आदान प्रदान होते. साहित्यीक,कवी व लेखक समाजाला काय देतो व स्वतः काय मिळवितो याचा विचार केल्यास मानसाच्या जगण्याच्या धडपडीत त्याच्या आत दडलेल्या भाव भावनांना माणुस म्हणून त्याला प्राप्त झालेल्या दिव्यस्वरूपाला जन्मतःच त्याने धारण केलेल्या मूल्यांची ओळख करून देतो. महर्षी व्यास,वाल्मीकीकालीदास,प्रेमचंद,रवींद्रनाथ टागोरसंत ज्ञानेश्वरसंत तुकाराम,गडकरी,खांडेकर,शिरवाडकरटॉलस्टॉय,रस्कीन बाँडवर्डसवर्थगटेइर्मसनअ‍ॅरिस्टॉटल,प्लुटो या शब्द प्रभुंनी आपल्या शब्दांनी विचारांना  मानवी चिंतनाच्या मुळाशी नेवून ठेवले. आज आवडीची कांदबरी वाचत प्रवास करणारी मंडळी दिसत नाही. वाचनाने  बुध्दीची प्रगल्भता वाढते. समंजसपणाचित्ताची एकाग्रता आणि योग्य वेळेला स्वतःला सादर करण्याची क्षमता निर्माण होते. रामायणमहाभारतज्युलियससिझर, हॅम्लेटऑथेलोगणपतराव बेलवणकरययातीविशाखागोदान, गीतांजलीश्यामची आई यांनी या देशाच्या अनेक पिढी घडविल्या,सभ्य सुसंस्कृत बनविले. वाचनाने जगण्याला लायक माणसे निमार्ण केली असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले. 
माणूसपण वेगळे ठेवायचे असेल तर पुस्तकांशिवाय पर्यायच नाही. वाचल्याशिवाय वाचणार नाही. उच्च साहित्यकलाकृती मनाला गोंजारतात,थांबवितात,गतीशील करतात. दिशा दर्शन करतात. निरपेक्ष वृत्ती आणि स्थायीभाव निर्माण करतात मग बघा किती आनंददायी आहे की जीवन परमेश्वरांनी दिलेली अमूल्य देणगी आहे. आज पुस्तक दिनी हा संकल्प करू या. दररोज एक पान वाचनाने सुरूवात करू या. सवय लागेल निश्चित लागेल असे ही पुढे बोलतांना म्हणाले.

सोशल मिडीयामुळे पुस्तक वाचनाला ब्रेक
सोशल मिडीयाच्या काळात तरूण तरूणी वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. ग्रंथालये,पुस्तकांची दुकाणेप्रकाशन संस्था वाचका अभावी ओस पडत आहेत. ग्रंथालयात सुध्दा मुले मुली व्हॉटअ‍ॅप,फेसबुक,इंस्टाग्रामचा वाचनापेक्षा अधिक वापर करतात

वाचकांने नेहमीच मधमाशीप्रमाणे असावे. ज्याप्रमाणे मधमाशी वेगवेगळया गुणधर्माच्या फुलांचा मकरंद शोषूण घेते. त्याप्रमाणे कोणत्याही चौकटी मध्ये न अडकता वाचकाने साहित्यकृतीचा आनंद घ्यावा.
                                         संतोष गोरे,साहित्याचे अभ्यासक हिवरा आश्रम


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

टाकाऊ वस्तुपासून बळीराजाने बनविले पक्षीरोधक यंत्र




प्रयोगशीलता,जिज्ञासा व नाविण्यपूर्णतेचा ध्यास मनी घेतल्यास माणसाला कुठलीही अशक्य गोष्ट शक्य झाल्याखेरीज राहत नाही. याचाच प्रत्यय मेहकर तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी परशुराम त्र्यंबक बो-हाडे यांच्याकडे पाहल्यानंतर येतो. कळंबेश्वर येथील परशुराम बो-हाडे यांनी घरातील टाकाऊ वस्तुच्या मदतीने अत्यंत कमी खर्चात पक्षीरोधक यंत्र बनविले आहे. त्यांनी बनविलेले पक्षीरोधक यंत्र परिसरातील शेतक-यांसाठी कुतूहलचा विषय ठरत आहे. त्यांनी आपल्या सहा एकर ज्वारीच्या शेतात असे आठ पक्षीरोधक यंत्र बसविले असून  या यंत्राच्या होणा-या आवाजामुळे  पक्षी शेतात येत नाही. या पक्षीरोधक यंत्रामुळे पक्ष्यांपासून होणा-या पिकांच्या नुकसाला आळा बसल्याचे त्यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले. शेतातील हिरव स्वप्न बहरल की बळीराजाचा ऊर आनंदाने भरून येतो. शेतातील याच हिरव्या स्वप्नाच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरहनिर्वाह असल्यामुळे पिकाची तो पोटच्या गोळया प्रमाणे काळजी घेतो. शेतातील हिरव्या पिकांचे नुकसान होवू नये म्हणून बळीराजा नेहमीच चिंतातूर असतो. दरवर्षी पक्ष्यांपासून पिकांचे जवळपासतीस ते चाळीस टक्के नुकसान होते. पुर्वीकाळापासून शेतातील पिकांच्या  सरवंक्षणासाठी पारंपारीक साधनाचा मोठया प्रमाणात उपयोग होत होता. यासाठी अनेकदा मजुर न मिळाल्यास पिकांचे सुध्दा नुकसान होते. शेतातील पिकांवर बसणा-या पक्ष्यांना हुसकाविण्यासाठी पुर्वी गोफण,गुलेर,बुजगावणे किंवा रिकामे डब्बे बाजवून पक्ष्यांना अटकाव केला जात असे. यामध्ये मनुष्यबळ मोठया प्रमाणात लागत असे मात्र परशुराम बो-हाडे यांनी बनविलेल्या पक्षीरोधक यंत्रामुळे हे काम अगदी सोपे झाले आहे. या पक्षीरोधक यंत्रामुळे दिवसा उभ्या पिकांचे पक्ष्यांपासून तर रक्षण होतेच परंतु रात्रीसुध्दा रानडुक्कर, हरीण व इतर जंगली प्राण्यांपासून पिकांचे रक्षण होवून त्याचा उत्पादन वाढीसाठी मदत मिळते.

असे बनविले पक्षीरोधक यंत्र
परशुराम बो-हाडे यांनी जुन्या कुलरचा फॅन,सायकल एक्सल,पातले व दोन लोखंडी पट्ट्या एवढया  घरातील टाकाऊ साहित्या पासून अवघ्या दिडशे ते दोनशे रुपयांमध्ये हे पक्षीरोधक यंत्र बनविले आहेपक्षीरोधक यंत्राचाफॅन फिरल्यामुळे दोन लोखंडी पट्टया पातेल्यावर आदळयाने आवाज होतो. पक्षी रोखण्यासाठी या यंत्राची मोठी मदत होते.

उभ्या पिकांचे पक्ष्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पक्षीरोधक यंत्र मोलाची कामगिरी पार पाडते. एक पक्षीरोधक यंत्र एक हेक्टर क्षेत्रात पक्ष्यांना रोखण्यास मदत करते. शेतक-यांनी हे यंत्र शेतात बसविल्यास नक्कीच फायदा होतो.
                                                  परशुराम बो-हाडे,शेतकरी कळंबेश्वर


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

बुधवार, १८ एप्रिल, २०१८

महात्मा बसवेश्वर समताधिष्ठीत समाजरचनेचे अग्रणी- संतोष गोरे

समाजातील जातीभेद,पंथभेद,संप्रदाय भेद,त्याज्य असून अखिल मानवजात मानवता धर्माने एकसमान आहे. समता,बंधुता व न्याय या सुधारणावादी विचाराच्या भूमिकेच्या प्रस्थापनेसाठी अकराव्या शतकात बसवेश्वरांसारखा योध्दया सत्पुरूषाची गरज होती. महात्मा बसवेश्वरांनी सनातनी परंपरावाद्यांशी मोठा संघर्ष करून त्यांना मोठा हादरा दिला. समतेचे मुल्य रूजवून  त्यांनी कोणतेही काम लहान मोठे नसून श्रमाचे मूल्य जाणून मानवाचा सन्मान व्हावा ही समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी त्यांचे जीवन खर्ची घातले. या त्यांच्या दिव्य विचारांनी ते समताधिष्ठीत समाजरचनेचे अग्रणी  आहेत हे सिध्द होते. असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना बुधवारी(दि. १८रोजी बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते हे होते तर अध्यक्षस्थानी विद्या मंदिराचे प्राचार्य अणाजी सिरसाट होते. बसवेश्वरांचा मानवी आचरणासंबंधी असलेला आग्रह हा कोरडया कर्मकांडाला भेद देणारा होता. परकोटीचा विरोध पत्कारून बसवेश्वरांनी मानवी कल्याणाचा सुलभ मार्ग प्रतिपादीत केला.त्यांचा आत्मा सर्वसामान्य मानसासाठी कळवळत होता म्हणून ते महात्मा होते.असे विचार आर.डी.पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.यावेळी उपप्राचार्य प्रा.कैलास भिसडे,पर्यवेक्षक ए.न.जामकर तथा शिक्षक,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

त्रिवार वंदन महामानवाला !!


देशाची राज्यघटना लिहिणारे.. अस्पृश्य समाजात जन्माला येवून आपल्या कुशाग्रबुद्धिमत्ता व विद्वत्तेने संपूर्ण जग जिंकणारे..आपल्या उभ्या आयुष्यात समाज आणि देशहित नजरेसमोर ठेऊन समाजासाठी चंदना प्रमाणे झिजणारे.. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली कि तो बंड करून उठेल असे सांगून समाजाला कार्यास सिद्ध करणारे...ज्ञान ही ज्यांची साधना होती.. पुस्तक व ग्रंथावर अतिशय प्रेम करत ...जीवनभर ज्ञान सागरात पोहणारे महान ज्ञानसूर्य ..भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हिवरा आश्रम येथे जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. सम्राट मित्र मंडळाचे वतीने संयुक्त जयंती उत्सव आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य शोभा यात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.जय भिमच्या जयघोषाने अवघी हिवरा आश्रम नगरी दुमदुमून गेली. विवेकानंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 127 वी जयंती निम्मित शतशः नमन!!!

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांचा अंगिकार करा.- अ‍ॅड जयश्री शेळके



बहुजनांच्या अवनतीचे,दुखाचे मूळ हे अज्ञान आहे. हे प्रथम ज्योतीबा फुले यांनी ओळखून पुणे येथे पहिली शाळा सुरू केली. बहूजनांना ज्ञान प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी आपल्या  आयुष्यात केले. सर्वसामान्य माणसाची कर्मकांड,अंधश्रध्दा निर्मूलन,जातीभेदाच्या जोखडातून बहूजन समाजची सुटका केली.आजच्या काळात सुध्दा महात्मा फुलेंच्या विचारांची समाजाला गरज आहे. प्रत्येकाने महात्मा फुलेंच्या विचारांचा अंगिकार करावा असे विचार जि.प.सदस्य अ‍ॅड जयश्री शेळके यांनी बुधवारी (दि.११) रोजी बोलतांना काढले.
सम्राट मित्र मंडळाने आयोजीत केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबडेकर व महात्मा ज्योतीबा फुले संयुक्त जयंतीच्या पर्वावर त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ.निर्मला डाखोरे या होत्या तर कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. यावेळी सारनाथ बुध्द विहाराचे अध्यक्ष शिवाजी घोंगडे,से.नि.तहसिलदार बि.टी.सरकटे,माणिकराव गवई,से.नि.मंडळ अधिकारी जी.डब्ल्यु सांळुके,उपसरपंच नितीन इंगळे,सुरेश सरकटे,समाधान बनसोडे,गौतम सरकटे,भिकेश इंगळे,आरख गुरूजी तथा आqदची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जुहू वानखेडे तर आभार प्रदर्शन नितीन इंगळे यांनी केले.

बुधवार, ११ एप्रिल, २०१८

सेल्फी वीथ पौष्टीक भेळ!


विवेकानंद उपहार गृहातील पौष्टीक भेळची तरूणाईला भुरळ...
माणसाचे आरोग्य जर निरोगी,सुदृढ असेल तर आयुष्याची सगळी वाटचाल सुरळीतपणे होते यात शंका नाही. म्हणून जेष्ठांची आपल्या मुलांना कायम शिकवण असते की सकस,संतुलीत व पोष्टीक आहार घ्या. गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या कायम पसंती व गुणवत्तेच्या कसोटीवर खरे ठरलेले विवेकानंद उपहार गृह म्हणजे ग्राहकांची पहिली पसंतीच होय. विवेकानंद उपहार गृहातील शुध्दता,स्वच्छता व तत्परसेवा ग्राहकांच्या पसंतीचे केंद्र आहे. 
आजच्या तरूण पीढीचा चमचमीत, चटकदार व जंक फुड खाण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. मात्र दहा रूपयामध्ये पौष्टीक भेळ ग्राहकांना विवेकानंद उपहार गृहाने उपलब्ध करून दिली आहे. सर्वसामान्याच्या खिशाला परवडेल अशी पौष्टीक व चवीष्ट भेळ सद्या ग्राहकांच्या आकर्षणाचा बिंदू बनली आहे. केवळ दहा रूपयामध्ये विवेकानंद आश्रमाच्या उपहारगृहात मिळते. दुपारीपासून या पौष्टीक भेळचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी तरूणाईपासून जेष्ठांची गर्दी उपहार गृहात पाहावयास मिळते. या पौष्टीक भेळमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर, भाजलेले मुरमूरे,चिंचेची खटाई, मक्का पोहे, शेंगदाणे, चवळी,मटकी, ताजे शेव, पोहे व दही असलेली भेळ खवय्येगिरांची पहिली पसंती ठरत आहे. ही भेळ विवेकानंद उपहार गृहात ३ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यत मिळते. जवळपासच्या खेडयातील नागरीक, प्रवासी,महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी ही भेळ रूचकर,चविष्ट व पोष्टीक भेळ खाण्यासाठी विवेकानंद उपहार गृहामध्ये एकच गर्दी करतात. आज दुपारी विवेकानंद उपहारगृहातील या स्वादिष्ट ,रुजकर व पौष्टीक भेळ्चा आस्वाद घेतला.
लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

अडोतीस साप पकडून सर्पसखीचा नवा विक्रम


महिलांनी आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचा प्रत्यय सर्पसखी वनिता बोराडे यांच्याकडे पाहल्यानंतर येतो. सर्वसामान्याच्या मनात सापा विषयीची कमीची धास्ती व भिती आहे. मात्र सर्पसखी वनिता बोराडे यांनी आतापर्यंत जवळपास ५१ हजार साप पकडून त्यांना जंगलात सोडून जीवनदान दिले आहे. नुकतचे सर्पसखी वनिता बोराडे यांनी दोन दिवसात मेहकर तालुक्यातील गाव,शेतातून अडोतीस साप पकत नवा विक्रम केला आहे. यामध्ये मेहकर येथील प्रशांत सावजी यांच्या फार्म हाऊसमधून एकाच दिवशी एकोणीस साप पकडले. दरवर्षी राज्यात जवळपास चोवीस हजार चारशे तीस लोक सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात. सर्पसखी वनिता बोराडे दरवर्षी सापांना पकडत असल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहे. या सर्व नाग विषारी प्रजातीचे असूनवनपरिक्षेत्र अधिका-यांना कळवून जंगलात सोडून दिले आहेत. पस्तीस  वर्षापासून वनिता बोराडे या सर्पसंवर्धन व सर्प जागृतीच्या क्षेत्रात मोलाचे कार्य करीत आहेत. सर्पमित्र वनिता बोराडे सर्पदंक्ष व प्राथमिक उपचार याबाबत जिल्हात मोठया प्रमाणात जनजागृतीचे काम करीत आहे. आतापर्यंत जवळपास ५० हजार सापांना पकडून जीवनदान दिल्याची माहिती दैनिक सकाळशी बोलतांना मंगळवारी(दि.१०) सांगीतले.

विषारी साप पकडण्यात निपुण
सर्पमित्र वनिता बोराडे यांनी ग्रामीण व शहरी भागातून आतापर्यंत अत्यंत जहाल विषारी असणा-या मण्यार,घोणस,फुरसे,नाग जीवित्वाचा धोका पत्कारून पकडले आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना एकदाही सर्पदंश झाला नाही.त्यांची साप पकडण्याची पद्धती अत्यंत सुरक्षित आहे.

साप पकडण्यासाठी निशुल्क सेवा
परिसरात कुठेही साप निघाला असता नागरीक त्यांना दुरध्वनीवरून संपर्क करतात. साप पकडण्यासाठी त्या वेळचे बंधन पाळत नाही. साप पकडण्यासाठी निशुल्क अहोरात्र सेवा देतात. सापांना  व लोकांना जीवनदान देण्याचे हे सेवाकार्य आहे.

साप हा अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असून लोक भितीपोटी सापाला मारतात. साप पर्यावरणाच्या संतुलनासाठी महत्वपूर्ण घटक आहे. साप उंदीर नियंत्रणासाठी महत्वाची भूमिका बजावतात. शेतक-याची मोठी मदत करतात. साप निघल्यास सर्पमित्रांची मदत घेवून वनविभागामार्फत जंगलात सोडून द्यावा.
                                                    वनिता बोराडे,सर्पमित्र हिवरा आश्रम
लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

रविवार, ८ एप्रिल, २०१८

"ग्रेट भेट" 
लहानपणापासून असलेली लिखाणाची कायम अभिरुची, उर्मी... अकोल्यातील महाविद्यालयीन काळापासून स्तंभलेख लिखाणापासून झालेली सुरुवात कधी पत्रकारितेत परिवर्तीत झाली हे कळलेच सुद्धा नाही. 

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

सोशल मिडीया ठरला सुशीलसाठी अर्थदुत

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

दिव्यांग 'संजयला' गवसला आयुष्याचा 'सूर'



आज अकोला येथून दैनिक सकाळच्या वर्धापन दिनाचा  कार्यक्रम संपल्यानंतर घराच्या ओढीने पावलांना गती आली....झपाझपा पावले बस स्थानकाच्या दिशने पडत होते. बस स्थानकावर जावून केंव्हा एकदा मेहकर कडे जाणारी बस  शोधतो व त्या बसमध्ये बसतो असे वाटू लागले. एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाच्या झळा,डोक्याव तापणारा सूर्य  व शरीरावरून वाहणा-या घामाच्या धारांनी जीव खूप वैतागून गेला...पाण्याच्या दोन - तीन बॉटल पिल्या  तरी शरीरातील उष्णता कमी होत नव्हती...गाडीत बसावे व सुटकेचा श्वास सोडावा असे वाटू लागले. यासाठी मेहकर कडे जाणा-या बसकडे जाणार एवढयातच बसस्थानकाच्या कोप-यातून "कर्तव्याने घडतो माणूस" हे गाण कुणी तरी गात असल्याचे कानी पडले... कुठल्याही प्रकारीची तबल्याची साथसंगत नसता केवळ हार्मोनिअम वरती कुणी गीत गात होते...
गीत सुरात असल्यामुळे गाण्याच एक कडव ऐकण्याचा मोहाला आवर घालणे अशक्य झाले म्हणून मागे वळून बघतोय तर काय  एक अंध व्यक्ती गात असून त्याच्या बाजूला कुणी महिला बसलेली दिसून आली...त्याचे गाणे सुरू असतांना येणारा जाणारा प्रवासी आपल्याजवळी काही सुट्टे पैसे त्यांना देत होते... कुणी आपल्याला पैसे देत आहे, हे अंध असल्यामुळे त्या अंध  व्यक्तीला दिसत नव्हते...मात्र तो गाणे गाण्यात तल्लीन झाला होता.. अंध व्यक्तीने गायलेल्या कर्तव्याने घडतो माणूस हे गीत नकळत मला अंर्तमुख करून विचार करायला लावू लागले...ज्याला दृष्टी नाही...रोज रोजीसाठी कुणापुढे हात न पसरता आपल्या गायनाच्या भरवशावर येणारा प्रवासी जे देईल त्यावर त्याचा व त्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालता हे त्यांच्याशी बोलल्या नंतर कळाले...मला कष्टातून मिळाले थोडे पैसे मिळाले तरी चालेल...मात्र फुकटची दमडी नको असे त्याचे बोल त्याच्यातील स्वाभिमानाचे दर्शन करून देत होते. संजय वानखेडे हा अकोल्यातील खडकी परिसरात  राहतो. सकाळपासून संजयच्या दिनचर्येला सुरुवात होते ती सुद्धा गायनानेच... कुठे हि संगीतच शिक्षण नाही...केवळ कानी पडलेले गीत सुरात जसेच्या तसे गाण्याची देण देवाने त्याला दिली. संजयसाठी तर गाणे हेच जीवन झाले आहे.सकाळ, दुपार व संध्याकाळच्या गायनाच्या भरवशावर च त्याचा कौटुंबिक उदरनिर्वाह चालतो... खरच आयुष्य आहे तरी काय? आयुष्य कसे आहे? आयुष्य जर व्याख्याबध्द केले तर नेमकी आयुष्याची व्याख्या तरी काय असेल? आयुष्याकडे पाहावे तरी कोणत्या दृष्टीने? आयुष्य जगण्याची प्रत्येकाची असलेली भिन्न भिन्न शैलीमुळे प्रत्येकाचे आयुष्य वेगळे भासते.मात्र संजयची आयुष्याकडे पाहण्याची उन्मेद काही वेगळीच जाणवली. संघर्ष जणू त्यांची सावली असला तरी तो आनंदाने जगतो...अशा संघर्ष करणा-या रिअल हिरोला सलाम करण्याचे मलाही राहवले नाही...


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
मो.९९२३२०९६५८
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा

सोमवार, २ एप्रिल, २०१८

सुजलाम सुफलामसाठी दुष्काळाशी लढू- शांतीलाल मुथा

सुजलाम सुफलामसाठी दुष्काळाशी लढू- शांतीलाल मुथा

काही दिवसापासून जिल्हयात ज्या गतीने दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकरी बांधवांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे त्यामुळे मी खूप समाधानी आहे. सकारात्मक विचारांनी अशक्य वाटणा-या गोष्टी शक्य झाल्या आहेत. बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचा अत्यानंद होत आहे. आपण पाण्यासाठीच्या लढाची वाट न पाहता एकत्रीतपणे सुजलाम् सुफलामसाठी दुष्काळाशी लढू असे विचार भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सोमवारी ( दि.२ )  रोजी बोलतांना काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून  जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा,आमदार डॉ.संजय रायमुलकर,राजेश देशलारा, जितेंद्र एन जैन, अ‍ॅड जितेंद्र कोठारी, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अप्पार,तहसिलदार संतोष काकडे, बीडीओ रविकांत पवार, जि.प.सदस्य संजय वडतकर, मंदाकीनी कंकाळ, अ‍ॅड शैलेश देशमुख, अशोक अडेलकर,सतिष ताजणे, सरपंच सौ.निर्मला डाखोरे, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णुपंत कुलवंत, विशेष प्रतिनिधी सिध्देश्वर पवार, तालुका प्रतिनिधी अमर रा,हिवरा आश्रम प्रतिनिधी समाधान म्हस्के पाटील,पत्रकार संतोष थोरहाते,शिवप्रसाद थुट्टे,निलेश नाहटा,फिरोज शहा,ज्ञानेश्वर इंगळे तथा आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार जयचंद भाटिया यांनी तर आभार तहसिलदार संतोष काकडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी विजय लोखंडे,तलाठी राजेंद्र आव्हाळे,ज्ञानेश्वर खरात,सुरूशे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.

मोहिमेला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकात पुलकुंडवार
प्रत्येक शेतकरी बांधवाच्या लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहिम यशस्वी होत आहे. धरणातील गाळाचा उपसा केल्याने धरणाच्या पाणी साठवण वाढ होवून जिल्हयाची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. शेतकरी बांधवांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळेच हे शक्य झाल्याचेही पुढे बोलतांना ते म्हणाले. 

अल्पभूधारकांना मिळाला दिलासा
मेहकर येथील पत्रकार सिध्देश्वर पवार यांनी अल्पभूधारक शेतक-यांच्या शेतात टाकण्यात येणा-या गाळाच्या  शंभर ट्रालीचा खर्च उचणार तर हिवरा आश्रम परिसरातील ट्रॅक्टरचे  मालक अरूण गावंडे,अरविंद धोंडगे,सागर म्हस्के,बाळू महाकाळ,संजय केंदळे,माधव हुबांड,रामा म्हस्के,शेषरावशिंगणे,रवि गायकवाड,बंडू धांडे यांनी प्रत्येकी दहा ट्राली प्रमाणे अल्पभुधारक शेतक-यांच्या शेतामध्ये गाळ टाकण्याचा खर्च उचल्यामुळे अल्पभूधारकांना  मोठा दिलासा मिळाला आहे.
  
पत्तीस हजार ब्रास गाळाचा उपसा
कोराडी धरातून ट्रॅक्टर व्दारे गाळ उपसा करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. हिवरा आश्रम परिसरातील अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची सुपीकता वाढण्यासाठी शेतात गाळ टाकला असून आतापर्यत कोराडी धरणातुन ३५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे.