सुजलाम सुफलामसाठी दुष्काळाशी लढू- शांतीलाल मुथा

सुजलाम सुफलामसाठी दुष्काळाशी लढू- शांतीलाल मुथा

काही दिवसापासून जिल्हयात ज्या गतीने दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकरी बांधवांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे त्यामुळे मी खूप समाधानी आहे. सकारात्मक विचारांनी अशक्य वाटणा-या गोष्टी शक्य झाल्या आहेत. बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचा अत्यानंद होत आहे. आपण पाण्यासाठीच्या लढाची वाट न पाहता एकत्रीतपणे सुजलाम् सुफलामसाठी दुष्काळाशी लढू असे विचार भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सोमवारी ( दि.२ )  रोजी बोलतांना काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून  जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा,आमदार डॉ.संजय रायमुलकर,राजेश देशलारा, जितेंद्र एन जैन, अ‍ॅड जितेंद्र कोठारी, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अप्पार,तहसिलदार संतोष काकडे, बीडीओ रविकांत पवार, जि.प.सदस्य संजय वडतकर, मंदाकीनी कंकाळ, अ‍ॅड शैलेश देशमुख, अशोक अडेलकर,सतिष ताजणे, सरपंच सौ.निर्मला डाखोरे, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णुपंत कुलवंत, विशेष प्रतिनिधी सिध्देश्वर पवार, तालुका प्रतिनिधी अमर रा,हिवरा आश्रम प्रतिनिधी समाधान म्हस्के पाटील,पत्रकार संतोष थोरहाते,शिवप्रसाद थुट्टे,निलेश नाहटा,फिरोज शहा,ज्ञानेश्वर इंगळे तथा आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार जयचंद भाटिया यांनी तर आभार तहसिलदार संतोष काकडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी विजय लोखंडे,तलाठी राजेंद्र आव्हाळे,ज्ञानेश्वर खरात,सुरूशे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.

मोहिमेला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकात पुलकुंडवार
प्रत्येक शेतकरी बांधवाच्या लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहिम यशस्वी होत आहे. धरणातील गाळाचा उपसा केल्याने धरणाच्या पाणी साठवण वाढ होवून जिल्हयाची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. शेतकरी बांधवांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळेच हे शक्य झाल्याचेही पुढे बोलतांना ते म्हणाले. 

अल्पभूधारकांना मिळाला दिलासा
मेहकर येथील पत्रकार सिध्देश्वर पवार यांनी अल्पभूधारक शेतक-यांच्या शेतात टाकण्यात येणा-या गाळाच्या  शंभर ट्रालीचा खर्च उचणार तर हिवरा आश्रम परिसरातील ट्रॅक्टरचे  मालक अरूण गावंडे,अरविंद धोंडगे,सागर म्हस्के,बाळू महाकाळ,संजय केंदळे,माधव हुबांड,रामा म्हस्के,शेषरावशिंगणे,रवि गायकवाड,बंडू धांडे यांनी प्रत्येकी दहा ट्राली प्रमाणे अल्पभुधारक शेतक-यांच्या शेतामध्ये गाळ टाकण्याचा खर्च उचल्यामुळे अल्पभूधारकांना  मोठा दिलासा मिळाला आहे.
  
पत्तीस हजार ब्रास गाळाचा उपसा
कोराडी धरातून ट्रॅक्टर व्दारे गाळ उपसा करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. हिवरा आश्रम परिसरातील अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची सुपीकता वाढण्यासाठी शेतात गाळ टाकला असून आतापर्यत कोराडी धरणातुन ३५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा