Responsive Ads Here

बुधवार, १८ एप्रिल, २०१८

महात्मा बसवेश्वर समताधिष्ठीत समाजरचनेचे अग्रणी- संतोष गोरे

समाजातील जातीभेद,पंथभेद,संप्रदाय भेद,त्याज्य असून अखिल मानवजात मानवता धर्माने एकसमान आहे. समता,बंधुता व न्याय या सुधारणावादी विचाराच्या भूमिकेच्या प्रस्थापनेसाठी अकराव्या शतकात बसवेश्वरांसारखा योध्दया सत्पुरूषाची गरज होती. महात्मा बसवेश्वरांनी सनातनी परंपरावाद्यांशी मोठा संघर्ष करून त्यांना मोठा हादरा दिला. समतेचे मुल्य रूजवून  त्यांनी कोणतेही काम लहान मोठे नसून श्रमाचे मूल्य जाणून मानवाचा सन्मान व्हावा ही समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी त्यांचे जीवन खर्ची घातले. या त्यांच्या दिव्य विचारांनी ते समताधिष्ठीत समाजरचनेचे अग्रणी  आहेत हे सिध्द होते. असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना बुधवारी(दि. १८रोजी बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते हे होते तर अध्यक्षस्थानी विद्या मंदिराचे प्राचार्य अणाजी सिरसाट होते. बसवेश्वरांचा मानवी आचरणासंबंधी असलेला आग्रह हा कोरडया कर्मकांडाला भेद देणारा होता. परकोटीचा विरोध पत्कारून बसवेश्वरांनी मानवी कल्याणाचा सुलभ मार्ग प्रतिपादीत केला.त्यांचा आत्मा सर्वसामान्य मानसासाठी कळवळत होता म्हणून ते महात्मा होते.असे विचार आर.डी.पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.यावेळी उपप्राचार्य प्रा.कैलास भिसडे,पर्यवेक्षक ए.न.जामकर तथा शिक्षक,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा