जगप्रसिध्द लेखक मानवी मनातील गुंतागुंत,व्दंद,प्रेमाची भावना यांचे उत्कटपणे शब्दासामर्थ्याने विचार प्रस्तृत करणारा प्रज्ञावंत विल्यम शेक्सपियर यांची जयंती जगभरात पुस्तक दिन म्हणून साजरी करण्यात येते. पुस्तक वाचनाचे मानवी जीवनातील महत्व. वाचन संस्कृती टिकण्यासाठी कुठल्याप्रकारची उपाययोजना करावी याबाबत साहित्याचे अभ्यासक तथा विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दैनिक सकाळशी मुलाखती दरम्यान प्रकाशझोत टाकला.
यावेळी संतोष गोरे म्हणाले की, वाचन संस्कृतीमुळे विचारांचे आदान प्रदान होते. साहित्यीक,कवी व लेखक समाजाला काय देतो व स्वतः काय मिळवितो याचा विचार केल्यास मानसाच्या जगण्याच्या धडपडीत त्याच्या आत दडलेल्या भाव भावनांना माणुस म्हणून त्याला प्राप्त झालेल्या दिव्यस्वरूपाला जन्मतःच त्याने धारण केलेल्या मूल्यांची ओळख करून देतो. महर्षी व्यास,वाल्मीकी, कालीदास,प्रे मचंद,रवींद्रनाथ टागोर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,गडकरी,खांडेकर,शिरवाडकर , टॉलस्टॉय,रस्कीन बाँड, वर्डसवर्थ, गटे, इर्मसन, अॅरिस्टॉटल,प्लुटो या शब्द प्रभुंनी आपल्या शब्दांनी विचारांना मानवी चिंतनाच्या मु ळाशी नेवून ठेवले. आज आवडीची कांदबरी वाचत प्रवास करणारी मंडळी दिसत नाही. वाचनाने बुध्दीची प्रगल्भता वाढते. समंजसपणा, चित्ताची एकाग्रता आणि योग्य वेळेला स्वतःला सादर करण्याची क्षमता निर्माण होते. रामायण, महाभारत, ज्युलियससिझर, हॅम्लेट, ऑथेलो, गणपतराव बेलवणकर, ययाती, विशाखा, गोदान, गीतांजली, श्यामची आई यांनी या देशाच्या अनेक पिढी घडविल्या,सभ्य सुसंस्कृत बनविले. वाचनाने जगण्याला लायक माणसे निमार्ण केली असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले.
माणूसपण वेगळे ठेवायचे असेल तर पुस्तकांशिवाय पर्यायच नाही. वाचल्याशिवाय वाचणार नाही. उच्च साहित्यकलाकृती मनाला गोंजारतात,थांबवितात,गतीशील करतात. दिशा दर्शन करतात. निरपेक्ष वृत्ती आणि स्थायीभाव निर्माण करतात मग बघा किती आनंददायी आहे की जीवन परमेश्वरांनी दिलेली अमूल्य देणगी आहे. आज पुस्तक दिनी हा संकल्प करू या. दररोज एक पान वाचनाने सुरूवात करू या. सवय लागेल निश्चित लागेल असे ही पुढे बोलतांना म्हणाले.
सोशल मिडीयामुळे पुस्तक वाचनाला ब्रेक
सोशल मिडीयाच्या काळात तरूण तरूणी वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. ग्रंथालये,पुस्तकांची दुकाणे, प्रकाशन संस्था वाचका अभावी ओस पडत आहेत. ग्रंथालयात सुध्दा मुले मुली व्हॉटअॅप,फेसबुक,इंस्टाग्रामचा वाचनापेक्षा अधिक वापर करतात
वाचकांने नेहमीच मधमाशीप्रमाणे असावे. ज्याप्रमाणे मधमाशी वेगवेगळया गुणधर्माच्या फुलांचा मकरंद शोषूण घेते. त्याप्रमाणे कोणत्याही चौकटी मध्ये न अडकता वाचकाने साहित्यकृतीचा आनंद घ्यावा.
लेखक
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८
आपनाला खुप खुप अभिनंदन, आपन नवीन युगताले साधन वापरून, तारुनाना आपल्या डिजिटल लेखनितुन सद्गुणी विच्यार करीत आहत, आपल्या लेखानीला हार्दिक शुभेच्छा।
उत्तर द्याहटवा