महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांचा अंगिकार करा.- अ‍ॅड जयश्री शेळके



बहुजनांच्या अवनतीचे,दुखाचे मूळ हे अज्ञान आहे. हे प्रथम ज्योतीबा फुले यांनी ओळखून पुणे येथे पहिली शाळा सुरू केली. बहूजनांना ज्ञान प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी आपल्या  आयुष्यात केले. सर्वसामान्य माणसाची कर्मकांड,अंधश्रध्दा निर्मूलन,जातीभेदाच्या जोखडातून बहूजन समाजची सुटका केली.आजच्या काळात सुध्दा महात्मा फुलेंच्या विचारांची समाजाला गरज आहे. प्रत्येकाने महात्मा फुलेंच्या विचारांचा अंगिकार करावा असे विचार जि.प.सदस्य अ‍ॅड जयश्री शेळके यांनी बुधवारी (दि.११) रोजी बोलतांना काढले.
सम्राट मित्र मंडळाने आयोजीत केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबडेकर व महात्मा ज्योतीबा फुले संयुक्त जयंतीच्या पर्वावर त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ.निर्मला डाखोरे या होत्या तर कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. यावेळी सारनाथ बुध्द विहाराचे अध्यक्ष शिवाजी घोंगडे,से.नि.तहसिलदार बि.टी.सरकटे,माणिकराव गवई,से.नि.मंडळ अधिकारी जी.डब्ल्यु सांळुके,उपसरपंच नितीन इंगळे,सुरेश सरकटे,समाधान बनसोडे,गौतम सरकटे,भिकेश इंगळे,आरख गुरूजी तथा आqदची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जुहू वानखेडे तर आभार प्रदर्शन नितीन इंगळे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा