
स्मार्ट रिप्लाय
जीमेल मध्ये स्मार्ट रिप्लाय या नवीन फिचरचा समावेश करण्यात आला असून यामुळे इनबॉक्समध्ये आलेल्या ई मेलला तात्काळ उत्तर देता येईल. याशिवाय आर्टीफिशय इंटिलेजीयन्स तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे समोरच्या युजरला तात्काळ उत्तर देण्यासाठी सुचक वाक्यांचा सुविधा सुध्दा व्यवस्था प्रदान केली आहे.
कॉन्फीडेशिन्शयल मोड
आता जीमेलमध्ये कॉन्डीडेशिन्शल मोडच्या माध्यमातून पाठविलेला ईमेल समोरील व्यक्ती तो मेल किती वेळापर्यंत पाहू शकेल हे सुध्दा ठरविता येणार आहे. अतिशय महत्वाचे कार्यालयीन कागदपत्रे, फोटो, डाटाबेस इत्यादी माहिती पाठविण्यासाठी हा मोड महत्वाचा ठरणार असून या मोडमुळे मेलची कॉपी, पेस्ट, फॉरवर्ड किंवा डाऊनलोड किंवाकॉन्फीडेशिन्शयल मोडव्दारे पाठविलेली माहिती प्रिंट करता येणार नाही.
ऑफलाईन मोडची सुविधा
ऑफलाईन मोडच्या मदतीने आता जीमेल वापरकर्ता इंटरनेट शिवाय सुध्दाआपल्या इनबॉक्समधील ईमेल पाहू शकणार आहे. याशिवाय वापरकर्त्याच्या सुविधेसाठी इनबॉक्सच्या उजव्या बाजुला साईडबार मध्ये गुगल कॅलेंडरमुळे आपल्या कामाचे योग्य नियोजन करण्यास मोठी मदत मिळणार आहे. संपूर्ण जीमेलचे अपडेट काही महिन्यात वापरकर्त्यांनामिळणार आहे.
असा करा ट्राय न्यू जीमेल
जीमेल अकाउंटच्या सेटिंग आयकॉन वरती क्लिक करावे. त्या ठिकाणी ट्राय न्यू जीमेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नविन अद्यावत फिचर्सयुक्त जीमेल सहज वापरणे शक्य होतो.
लेखक
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा