Responsive Ads Here

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

आकाशी झेप घेण्यासाठी न्युनगंडाचा त्याग करा - उपजिल्हाधिकारी आर.डी.काळे




आयुष्यातील यशाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रत्येकाने अथक परिश्रम,जिद्द व चिकाटीची तयारी ठेवावी. दिव्यांग व्यक्ती सुध्दा प्रत्येक क्षेत्रात आपल्या बुध्दीमत्ता व कौशल्याने यशस्वी होवू शकतो. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा,स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करून तयारीला लागा यश तुमची वाट बघतेय. आकाशी झेप घेण्यासाठी न्युनगडांचा त्याग करावा असे  विचार अमरावतीचे उपजिल्हाधिकारी आर.डी.काळे यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद निवासी कर्णबधिर विद्यालयात जागतिक कर्णबधिर दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना  शुक्रवारी ता.२८ रोजी ते बालत होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते तर प्रमुख पाहूणे म्हणून सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,सरपंच सौ.निर्मला डाखोरे,उपसरपंच मधुकर शेळके,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,अशोक गि-हे,कर्णबधिर विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके, अणाजी सिरसाट,मुख्याध्यापिका सुनिता गोरे तथा आदींची उपस्थिती होती.

जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून विवेकानंद कर्णबधिर विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लांब उंडी,५०,१०० व २०० मीटर धावणे,उंच उडी या क्रीडा स्पर्धेत विवेकानंद कर्णबधिर विद्यालयातील विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी बक्षिस वितरण करण्यात  आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेक वाचवा लेक शिकवा ही नाटीका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी तर सुत्रसंचालन प्रमोद सावरकर तर आभार विश्वभंर शेळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद कर्णबधिर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

अबोल भावनांनी जिंकली मने

विवेकानंद कर्णबधिर विद्यालयातील मुले मुलींनी जागतिक कर्णबधिर दिनाच्या प्रसंगी आपल्या सकस व उत्कृष्ट अभिनयाव्दारे स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी व स्त्री सशक्तीकरणावर आधारीत लेक वाचवा लेक शिकवा ही सुंदर नाटिका यावेळी सादर केली. आपल्या अत्यंत बोलक्या अभिनयाव्दारे उपस्थितांच्या डोळयांच्या कडा ओल्या करून लेकी वाचवा लेक शिकवा या नाटीकेतून सामाजिक जाणिवांना बोलते केले.

संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

विवेकानंद विद्या मंदिराचे विद्यार्थी मैदानी स्पर्धेत जिल्हास्तरावर





मेहकर येथे दि.२१,२२ २५ सप्टेंबर रोजी  पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुला- मुलींच्या संघाने मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम,व्दितीय क्रमांक संपादित करून सदर खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये १४ वर्षवयोगटा मधून कु.इशा धोंडगे १०० मीटर लांब उडी प्रथम, ॠषिकेश काळे २०० मीटर धावणे प्रथम, गजानन वाबळे ६०० मीटर धावणे व्दितीय,नवल पवार ४०० मीटर धावणे प्रथम, सचिन चव्हाण ४०० मीटर धावणे तर १७ वर्ष वयोगटामधून शुभम तांगडे १५०० मीटर धावणेमध्ये व्दितीय,महेश मेव्हाणकर १५०० मीटर धावणे प्रथम,पवन घुगे ३००० मीटर धावणे प्रथम, रोहन पडघान ३००० मीटर धावणे व्दितीय,साहिल देशमुख ८०० मीटर धावणे प्रथम, उमेश पारधे ११० हर्डल्स प्रथम,१९ वर्ष वयोगटा आतील मुलामध्ये शुभम वडतकर उंच उडी प्रथम,प्रशिक गवई ३००० मीटर धावणे व्दितीय,कुंदन कंकाळ १०० मीटर धावणे तृतीय,अविनाश पवार १०० मीटर धावणे प्रथम,सागर गोसावी गोळा फेक प्रथम,ॠषिकेश सावळे ११० हर्डल्स प्रथम तर बाय १०० मीटर रिले संघ प्रथम दतात्रय वाघ वैष्णव आव्हाळे,अविनाश पवार, सागर गोसावी या सर्व विद्याथ्र्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धकांची तयारी क्रीडा शिक्षक रणजित जाधव,आत्मानंद थोरहाते, गोविंद  अवचार,शाम खरात यांनी करून घेतली. विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक अणाजी सिरसाट,उपमुख्याध्यापक प्रा.कैलास भिसडे,पर्यवेक्षक अशोक गि-हे,आत्माराम जामकर  यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिला असून विवेकानंद आश्रमाच्या पदाधिका-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात स्वच्छता मोहिम राबवून साजरा केला रा.से.यो.दिन




येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यायलात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून सोमवारी ता.२४  रोजी महाविद्यालय शैक्षणिक परिसराची स्वच्छता करून आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविला. राष्ट्रीय सेवा योजन शिबीराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर सामाजिक उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळते. राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून विद्यार्थ्यांच्या मनावर श्रमसंस्करा सोबत सामाजिक बांधलकीची जोपासना करणा-या उपक्रमांना विशेत्वाने प्राधान्य दिले जाते.याचा एक भाग म्हणून विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रासेयो दिनाचे औचित्य साधून परिसर स्वच्छ निर्मळ करीत निरोगी आरोग्याचा मंत्र दिला

सरकारच्या स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सर्व शालेय परिसर शालेय परिसरा जवळचा रस्ता स्वच्छ करण्यात आला. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूनी साफसफाई करण्यात आली. २४ सप्टेंबर १९६३ रोजी राष्ट्रीय सेवा योजने ची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन गायकवाड,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन ठाकरे,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी,प्रा.किशोर गवई यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना  अभ्यासक्रमा व्यतिरिक्त समाजातील लोकांमध्ये एकात्मतेची जाणीव निर्माण करून देणे, जनजागृती करणे,स्वच्छता मोहीम राबविण्यास भाग पाडणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात.
               प्रा.गजानन गायकवाड, रासेयो कार्यक्रम अधिकारी


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

मराठी सुविचार