आठवडयापासून बाल गोपाल,महिलांना गौरी आगमनाची लागलेली आस आज गौरी आगमनाच्या क्षणांनी पूर्ण झाल्याचे समाधान चेह-यावर दिसून आले. गौराई आली सोन्याच्या पावलांनी ,गौराई आली माणीक मोतींच्यापावलांनी असे म्हणत शनिवारी ता.१५ रोजी लाडक्या गौराईचे आगमन आनंद झाले. तीन दिवसांची माहेरवाशीण असलेल्या गौराईच्या स्वागतासाठी कुटूंबातील प्रत्येकजण विशेषतः महिलावर्गात कमालीचा उत्साह दिसूनआला. सकाळ पासून गौरी आगमनाची ,लगबग दिसून येत होती.
गौरी आगमनासाठी विविध आकर्षक रोषणाई,हार,माळ,पुजेचे साहित्याची खरेदी करतांना महिला वर्ग
दिसून येत होता. आज गौरी आगमनाचा दिवसअसल्याने सकाळपासूनच महिलवर्गामध्ये उत्साह दिसून येत होता. शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांनी अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी, काढण्यात आले. नव्या भरजारी साडया,अंगभर दागिने,नथ, गौरीच्या समोरपारंपारीक फराळाचे पदार्थ,आरासाचे साहित्य, विविध प्रकारची मिठाई असे दृश्य गौरी प्रत्येक घरोघरी दिसून येत होते.
बाल गोपालांपासून,तरूण स्त्रीयां,वृध्दांनी मनोभावे
उत्तम आरोग्य,सुख समृध्दीसाठी गौरी पूजन केले. दि.१६ सप्टेंबर रोजी घरोघरी विधिवत व मंत्रोच्चार व आरतीने गौरीचे पूजन होईल. घरोघरी विविध नैवेद्य दाखविण्याच्या पद्धतींमध्येही वैविध्य पाहायला मिळते.दिव्यांच्या रोशनाईने गाभारा सजवून जेष्ठा गौरींचीकुटूंबातील सर्व सदस्यांनी भक्ती भावाने आरती केली.
गौरी पूजन हा महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत आनंदाचा सण आहे. या सणाच्या माध्यमातून शक्ती पुजनाला मानला असून प्रत्येक महिला या सणाची विशेत्वाने वाट पाहतात.
सौ.अरूणा समाधान म्हस्के गृहिणी हिवरा आश्रम
बळीराजाचे समृध्दीसाठी गौराईकडे साकडे
देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा गेल्या आठवड्यापासून
चातकाप्रमाणे वरूण राजाची वाट पाहत आहे. आपल्या कष्ठातून पिकविलेले सोन्यासारखे पिक करपून जाण्याच्या भितीने कासाविस होत आहे. अशाबळीराजाच्या कष्टाला मोल मिळू दे... त्याला समृध्दी लाभू दे... म्हणून गौरीकडे साकडे घातले.
संतोष उपाख्य बापुश्री थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा