Responsive Ads Here

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८

दिव्य स्मरण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांचे !!




    उठा,जागे व्हा. आणि ध्येय प्राप्त होई पर्यंत थांबू नका!  तरूणांना कार्यप्रणवतेचा संदेश देणारे जगदगुरु स्वामी विवेकानंदांच्या अमेरिकेतील शिकागो शहारात संपन्न झालेल्या  सर्वधर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषणाला आज ११ सप्टेंबर २०१८ रोजी १२५ वर्ष पूर्ण झाली असून स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी दिव्य विचारांनी संपूर्ण जगाला मोहणी घातलीस्वामी विवेकानंदांनी भाषणाच्या सुरूवात बंधू- भगीनी करता क्षणी संपूर्ण सभागृह टाळयांच्या कडकडाने गुंजून निघाले. स्वामी विवेकानंदानी शिकागो येथील भानातून मांडलेल्या विश्वबंधुत्वाची जगाला गरज असून आपसातील वैरभावनाधर्माभिमानगरीबश्रीमंतउच्च निच्च सर्व विसरून आपण सर्व एक आहोत ही भावना दृढ झाल्यास जगात शांती नांदणार  राहणार नाही. स्वामी विवेकानंदांचा विश्वबंधूत्वाचा विचार संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी उत्कर्षासाठी मोलाचा आहे. स्वामी विवेकानंदांचे नाव घेताक्षणीच डोळयापुढे येत ते त्यांचे दिव्य रूप, स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तीमत्वात ज्ञानवैराग्याचा झालेला अद्भूत संगम...
स्वामी विवेकानंदांचे जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषणं...
   आपल्या प्रेमळ उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिदूंच्या वतीनं आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे, असं या व्यासपीठावरून सांगणाऱ्या वक्त्यांचेही आभार मानतो.
जगाला सहिष्णुता सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असं नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या आजही त्यांचं पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे.
   बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या आणि मुखोद्गत केलेल्या एका श्लोकाच्या ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यवधी लोक आजही या ओळींचं पारायण करतात. ''ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात.
जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो''. आजची ही पवित्र परिषद भगवद्गगीतेमधील या सिद्धांताचाच पुरावा आहे.

   सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकलं आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचारानं भरून टाकलं आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्तानं लाल केलीय. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र, आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीनं झालेल्या असोत की लेखणीनं) आणि माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल.

   स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील सर्वधर्म परिषदेतील दिलेल्या भाषणामुळे भारताला जगात एक नावलौकीक ओळख मिळवून दिली.मद्रासमधील स्वामी विवेकानंदांच्या मित्रांच्या अथव प्रयत्नांनी अडवारचे राजे अजित सिहांच्या मोलाच्या मदतीने शिकागोच्या सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहू शकले.स्वामीजींचे शिकागो परिषदेतील दिव्य,ओजस्वी त्रिकालदर्शी विचार ऐकून संपूर्ण सभागृहातील श्रोतागण मंत्रमुग्ध झाले.
   सर्व जीवांची समृष्ट असा जो एकमेव ईश्वर अस्तित्वात आहे ज्या एकमेव ईश्वरावर माझा विश्वास आहे त्याची पूजा करण्यासाठी मला पुनः पुनः जन्म घ्यावा लागो आणि हजारो दुःखे भोगावी लागोत...माझे दुखी नारायण माझे दरिद्री नारायण हीच माझी विशेष उपास्य दैवते आहेत. स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला ''शिव भावे जीव सेवेचा'' अलौकीक मंत्र दिला. कुठल्याही परिस्थितीत दुःखी,दरिद्री लोकांची सेवा करा...त्यांची दुःख हलके करण्याचा प्रयत्न करा हा स्वामीजींचा दिव्य विचार खरोखरच मोलाचा आहे...

संतोष उपाख्य बापूश्री थोरहाते
पत्रकार तथा संत साहित्याचे अभ्यासक
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा