व्हॉलीबॉल स्पर्धेत विवेकानंद मुलींचा संघ विजयी






डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत संपन्न झालेल्या विभागीय आंतर महाविद्यालयीन व्हॉली बॉल स्पर्धा २०१८ विभाग अ मधीलझालेल्या फाईनल मॅच मध्ये कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या मुलींचा संघ शनिवारी विजयी झाला. हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयात  दिनांक ७,  सप्टेंबर रोजी  व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. याव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत जवळपास विदर्भातून जवळपास १४ महाविद्यालयातील मुला मुलींच्या हॉलीबॉल संघ दाखल झाले होते. दिनांक ७ सप्टे.२०१८ ला सकाळी११.०० वाजता विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते यांच्या हस्ते तर यावेळी विश्वस्तपुरूषोत्तम आकोटकर, प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, अणाजी सिरसाट,पर्यवेक्षक अशोक गिèहे हे उपस्थित होते. उदघाटन करून क्रीडा स्पर्धाना सुरूवात  झाली. दिनांक ८सप्टे.२०१८ ला मुलींचा अंतिम सामना विवेकानंद कृषी महाविद्यालय व कृषी महाविद्यालय दारव्हा दरम्यान खेळला गेला. या चमूमध्ये कु.दिपाली मनोहर गिèहे,कु.काजोल मqहद्रपाटील,कु.नितु अरूण जुनघरे,कु.प्रतिज्ञा मुंगशीदेव डाखोरे,कु.नेहा युवराज बोर्डे,कु.पुजा लक्ष्मण पुरी या विद्यार्थींनी चा समावेश होतो. या व्हॉलीबॉल स्पर्धेचे पंचहितेश यांनी काम पाहीले.विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या मुलींचा संघाची तयारी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख तथा कोच प्रा.शिवशंकरकाकडे यांनी तर प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांचे मार्गदर्शन लाभले.  

सामना ठरला चुरशीचा  
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यातविवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम मुलींचा संघ विजयी ठरला तर दारव्हा कृषी महाविद्यालयाचा मुलींचा संघ उपविजयी ठरला. प्रेक्षकांची उत्कंठा वाढविलेल्या या सामन्यात शेवटी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने विजय मिळवला.

संतोष श्रीथोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा