भगवान कृष्णाचा समतेचा विचार रुजवावा - पशुसंवर्धनमंत्री ना.खोतकर




भगवान श्रीकृष्ण हे मानवी जीवनाला व्यापून आहे. अगदी बालकृष्ण, ते युगंधर कृष्ण हे जगण्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान भगवत्गीतेत समाविष्ट आहे. गीतेतील त्यांचाउपदेश समतेचा आहे समतेमुळेच सामाजिक एकोपा अबाधीत राहतो. भगवान कृष्णाचा समतेचा विचार रुजवावा   असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकासमंत्री ना. अर्जूनराव खोतकर  यांनी व्यक्त केले.विवेकानंद आश्रमात आयोजित केलेल्या गोकुळाष्टमी उत्सवात शेतक-यांना मार्गदर्शन प्रसंगी सोमवारी ते बोलत होते.
 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त दादासाहेब मानघाले तर प्रमुख पाहूणे म्हणून . डॉ.संजय रायमुलकर, ... गजाननदादा शास्त्री पवार महाराज हे होते. कर्मयोगी संत .पू. शुकदासमहाराजश्रींच्या समाधि स्थळाचे दर्शन घेवून हरिहरतीर्थावर आयोजीत गायींचा मेळावा प्रदर्शनाला भेट देवून स्पर्धेत सहभागी झालेल्या गायींची आश्रमाच्या गोशाळेची त्यांनी पाहणी केली. त्याच्या हस्ते उत्कृष्ट गायींचेसंवर्धन करणा-या गोपालकांचा बक्षिसे देवून सत्कार करण्यात आला... गजाननदादा शास्त्री पवार यांनी या प्रकारचा आगळावेगळा उत्सव संपन्न करणारे विवेकानंद आश्रम समाजाचे दिशादर्शक आहे. मानवीकल्याणासाठी आवश्यक असलेली सर्व दालने समाजासाठी उपलब्ध करुन देण्याचे काम .पू. शुकदास महाराजश्रींनी केले असल्याचे विचार त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्यआशिष रहाटे, जि.पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पसरटे, तहसिलदार संतोष काकडे, कृषि विद्यापीठ अकोल्याचे कार्यकारणी सदस्य  विनायकराव सरनाईक, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाउ खरात, जालनाचे माजीजि.- अध्यक्ष पंडितराव भुतेकर, आश्रमाचे अध्यक्ष आर.बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक पाध्ये, अशोक थोरहाते, सहसचिव वि.. कुलवंत, आत्मानंद थोरहाते, विश्वस्त नारायण भारस्कर, पुरुषोत्तम आकोटकर, के.के. भिसडे, जि.के. ठाकरे, प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,अनुप शेवाळे,... निवृत्तीनाथ येवले, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे  यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अशोक पाध्ये यांनी केले.  

पशु संवर्धन दुग्ध विभागातील  रिक्त जागा भराव्या
जिल्हयातील या विभागातील रिक्त असलेल्या जागा  भरुन शेतक-यांना पशुधन सांभाळण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी डॉ.संजय रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

विवेकानंद  गोशाळेसाठी १ कोटी ची घोषणा
विवेकानंद आश्रमाची गोशाळा ही शेतक-यांसाठी प्रेरणादायी स्थळ आहे. या गोशाळेतील जणावरांच्या सोयी-सुविधा, अद्यावत दवाखाना, संवर्धनासाठी एक कोटी रुपयाचे अनुदान देणार असल्याची घोषणा ना. खोतकर यांनीआपल्या भाषणातून केली.



संतोष श्रीथोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा