Responsive Ads Here

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात स्वच्छता मोहिम राबवून साजरा केला रा.से.यो.दिन




येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यायलात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून सोमवारी ता.२४  रोजी महाविद्यालय शैक्षणिक परिसराची स्वच्छता करून आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविला. राष्ट्रीय सेवा योजन शिबीराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर सामाजिक उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळते. राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून विद्यार्थ्यांच्या मनावर श्रमसंस्करा सोबत सामाजिक बांधलकीची जोपासना करणा-या उपक्रमांना विशेत्वाने प्राधान्य दिले जाते.याचा एक भाग म्हणून विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रासेयो दिनाचे औचित्य साधून परिसर स्वच्छ निर्मळ करीत निरोगी आरोग्याचा मंत्र दिला

सरकारच्या स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सर्व शालेय परिसर शालेय परिसरा जवळचा रस्ता स्वच्छ करण्यात आला. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूनी साफसफाई करण्यात आली. २४ सप्टेंबर १९६३ रोजी राष्ट्रीय सेवा योजने ची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन गायकवाड,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन ठाकरे,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी,प्रा.किशोर गवई यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना  अभ्यासक्रमा व्यतिरिक्त समाजातील लोकांमध्ये एकात्मतेची जाणीव निर्माण करून देणे, जनजागृती करणे,स्वच्छता मोहीम राबविण्यास भाग पाडणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात.
               प्रा.गजानन गायकवाड, रासेयो कार्यक्रम अधिकारी


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा