माऊली गणेश मंडळाने बळीराजाला दिला अ‍ॅझोला उत्पादन्नाचा संदेश




कल्पकता,सृजनशीलता व नाविन्यपूर्णतेचा ध्यास असल्यास काहीही शक्य होते. बाप्पाच्या आगमनाची प्रत्येकाला तितकीच आस व ओढ असते. बाप्पाच्या स्थापनेपासून ते सजावटीपर्यंत सर्व नाविन्यपूर्ण असावे यावर अधिक भर दिला जातो. याचाच प्रत्यय येथून जवळ असलेल्या देऊळगांव माळी येथील माऊली गणेश मंडळाच्या रूपाने दिसून आला. कुठल्याही प्रकारची महागडी रोषणाई,सजावटीसाठी महागडया वस्तूंचा वापर न करता आपल्या कल्पकतेने अ‍ॅझोला या पशूखाद्याचा गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी वापर केला. माऊली गणेश मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांना हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अ‍ॅझोला सजावटीचा सल्ला दिल्यानंतर माऊली गणेश मंडळाच्या सदस्यांना तो पटला. गणपती बाप्पाच्या समोर चार बाय सहा या आकाराचा चौरसामध्ये हिरवे अ‍ॅझोला ठेवण्यात आले. या सजावटीच्या माध्यमातून प्रथमच माऊली गणेश मंडळ व विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना अ‍ॅझोला उत्पादनाचा सामाजिक संदेश दिला आहे. गणपती बाप्पाच्या समोरील अ‍ॅझोला सजावटीची सर्व ठिकाणावरून कौतुक होत असून अ‍ॅझोला सजावट पाहण्यासाठी नागरीक मोठी गर्दी करीत आहे.विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कृषिसमर्पण ग्रुप महेंद्र राऊत,परवेज देशमुख,यासीन पठाण,चेतन चव्हाण,रोशन कडु,आशिष भारसाखळे,ज्ञानेश्वर बानोरे या विद्याथ्र्यांचा समावेश आहे. याशिवाय किशोर बळी यांचे विद्यार्थ्यांना खूप सहकार्य लाभले.

अ‍ॅझोलामुळे पशुखाद्यात बचत
अ‍ॅझोला यामधून मिळणारी विविध खनिजे जसे कॅल्शियम,पोटॅशियम,लोह,तांबे,फॉस्फोरस,मॅग्नेशियम तसेच अमिनो आम्ल इत्यादीमुळे जनावराची शारीरीक वाढ होण्यास मदत मिळते. अ‍ॅझोला हे दुग्ध जनावरांसाठी उपयोगी आहे.दुध देणा-या जनावरांना अ‍ॅझोला दिल्यास दूध उत्पादनात वाढ होते.याशिवाय जनावरांना चारा,ढेप,सोबतच अ‍ॅझोलाची पशुखाद्य म्हणून दिल्यास पशुखाद्यात ५० ते ७० टक्के बचत होते.
महेंद्र राऊत विवेकानंद कृषी महाविद्यालय

अ‍ॅझाला शेतक-यांसाठी लाभदायक
गेल्या दोन ते तीन वर्षापासून अत्यल्प पावसामुळे चारा उत्पन्नात मोठया प्रमाणात घट आहे.त्यांचे दुरगामी परिणाम दूध व्यावसायिकांना होत आहे.पशूखाद्याचे दर वाढत असल्यल्यामुळे आज दूध व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅझाला पशुखाद्य हे शेतक-यांसाठी लाभदायक आहे.
                                        पांडुरंग बळी देऊळगांव माळी

माऊली गणेश मंडळानी प्रथमच ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना अ‍ॅझोला उत्पादन घेण्याकरीता प्रेरणा मिळावी म्हणून अ‍ॅझोलाचा गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी उपयोग केला. माऊली गणेश मंडळ व विवेकानंद कृषी महावि
द्यालयाच्या विद्यार्थ्यांचा हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.
                      डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा