Responsive Ads Here

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

पर्यावरण संवर्धनासाठी लहाने कुटुंबीय सरसावले !


रक्षा विसर्जनस्थळी केले वृक्षारोपन,रूढीला बगल देवून केले समाजपरिर्वतन


समाजसुधारकाची एक दैदिप्यमान परंपरा महराष्ट्र राज्याला लाभली आहे. या समाजसुधारकांनी वैचारीक विचार मंथनातून समाजातील अनेक अनिष्ठ चालीरीतीरूढी व परंपरावरवेळोवेळी आघात करून त्या कशा फोल व असत्य आहे त्या पटवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. याचा प्रत्यय येथूनच जवळ असलेल्या लव्हाळा येथे दिसून आला. लव्हाळा येथील लहाने कुटूंबीयानी वडिलांच्या रक्षाविसर्जनाच्या प्रसंगी रूढी व परंपरेला बाजूला सारत मेहकर पं.स.चे माजी उपसभापती बबनराव लहाने,दिनकरराव लहाने,शिवसाही प्रतिष्ठाणचे तथा जि.प.बुलडाणा सदस्य दत्तात्रय लहाने यांनी वडीलांच्या रक्षाचे नदीच्या पाण्यात विसर्जन न करता शेतात एक खड्डा खणुन त्यामध्ये रक्षा व माती मिसळून त्याठिकाणी आंब्याच्या झाडाचे लागवड करीत समाजापुढे एक नवा आदर्श प्रस्थापित करत पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना प्रेरणा दिली आहे.
कवी केशव सुतांनी सुध्दा आपल्या तुतारी या कवितेतून समाजपरिवर्तनासाठी सज्ज झालेल्या नवतरूणाच्या माध्यमातून समाजामध्ये समाजपरिवर्तनाची जणू मुहूर्तमेठ रोवत समाजजागृतीचे कार्य केले. जुने जाऊ द्या मरणालागुनी...जाळुनी किंवा पुरुनी टाका...सडत न एक्या ठायी ठाका...सावध! ऐका पुढल्या हाका...
खांद्यास चला खांदा भिडवूनी... केशवसुतांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून समाजातील रूढी व परंपरेवर शाब्दीक प्रहार करून समाजमनामध्ये परिवर्तनवादी विचारांचे बीजारोपन करून त्यांना रूढी व परंपरेच्या जोखडातून मुक्त केले आहे.
मेहकर पंचायत समितीचे माजी उपसभापती बबनराव लहाने,दिनकरराव लहाने यांचे वडिल तर संस्थापक शिवशाही प्रतिष्ठाण तथा जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय लहाने यांचे काका वै.नारायणराव लहाने यांचे गुरूवारी दि.२२ रोजी निधन झाले. वडिलांच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी बबनराव लहाने,दिनकरराव लहाने,दत्तात्रय लहाने व लहाने कुटूंबीयांनी जुन्या रूढी व पंरपरेला बाजूला सारत आपल्या शेतात खड्डा खोदून त्यात काळीमाती व रक्षा एकत्र करून त्याठिकाणी आंब्याच्या झाड लावले.त्यांनी आपल्या कृतीतून समाजपरिवर्तनवादी विचारांना चालना देत ग्रामीण भागातील जनतेसमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. याप्रसंगी आमदार डॉ.संजय रायमुलकर,सामाजिक कार्यकर्ते तथा पाचार्य पंढरीनाथ शेळके,जिल्हासेवादलाचे संतोष पाटील,कृ.उ.बा.चे सभापती माधवराव जाधव,तालुका सेना प्रमुख सुरेशतात्या वाळूकर,जि.प.मा.कृषि सभापती नंदुभाउ बोरे,राष्ट्र वादीचे नेते नरेंद्र शेळके,अ‍ॅड सुरेश वानखेडे,जि.प.सदस्य संजय वडतकर,भाजपाचे उध्दव काळे तथा आप्तेष्ट,स्नेहीजण मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

आधुनिक काळात रूढी,परंपरा व चालीरीतीना कवटाळत परीवर्तनवादी विचारांची कास धरावी म्हणून प्रत्येकाने काळानुरूप आपल्या विचारात बदल केले पाहिजेत.
                                                     बबनराव लहाने, मेहकर पं.स. माजी उपसभापती


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम

मो ९९२३२०९६५८

हिमोग्लोबीन वाढीसाठी करा सकस आहाचे सेवन



जेष्ठ महिलांनी अ‍ॅनेमिया टाळण्यासाठी द्यावे लक्ष


पुरूषांच्या तुलनेत जेष्ठ महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता हा प्रामुख्याने दिसून येते. हिमोग्लोबीन हा मनुष्याच्या रक्तातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. हिमोग्लोबीन हे लोह आणि प्रथिने यांच्यापासून बनते. महिलांची हिमोग्लोबीनची सामान्रू पातळी प्रति लिटर १२०- १४० ग्रॅम अशी आहे. जेष्ट महिलांमधील हिमोग्लोबीन  कमी असण्याची समस्या ही सार्वत्रिक स्वरूपाची आहे. जेष्ठ महिलांना घरकाम तसेच नातवंडाच्या सांभाळण्याच्या जबाबदारी वेळी अवेळी जेवन व संतुलीत आहाराच्या बाबतीत जेष्ठ महिलांचे होते.काही जेष्ठ महिला आपल्या दैनंदिन आहाराच्या बाबतीत पाहिजे त्याप्रमाणात जागृक राहत नाही. आहाराकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे सकस आहाराचे सेवन होत नाही. जेष्ठ महिलांनी हिमोग्लोबीन कडे दुर्लक्ष केल्यास रक्ताल्पतेचा धोका निर्माण होवू शकतो. जेष्ठ महिलांनी शरीरातील हिमोग्लोबीनची मात्रा कमी झाल्या पालक भाजीचे सेवन करावे.पालकभाजी मोठया प्रमाणात लोह असल्यामुळे शरीरातील रक्त वाढीस मदत होते.पालकमध्ये व्हिटॅमिन बी १२,फॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे लाल पेशींची संख्या झपाटयाने वाढते.हिमोग्लोबीन वाढीसाठी डाळींब व खजूर सुध्दा खाल्यास हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

हिमोग्लोबीन कारणे
शरीरामधील हिमोग्लोबीन आणि लाल पेशींची मात्रा कमी होण्याची अनेक कारणे आहेत.त्यापैकी शरीरातील आर्यनचे प्रमाण कमी होणे एक कारण आहे.लाल पेशीची संख्या कमी होणे अथवा झपाटयाने नष्ट होने.आजारपणात अथवा अपघातामध्ये जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यास अथवा पोटाचे आजार,शरीरातील फोलीक अ‍ॅसिडची कमी व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे सुध्दा हिमोग्लोबीन कमी होते.

अशी कमतरतेची लक्षणे
शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाल्यास थकवा जाणवतो.हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे संपूर्ण शरीर  पिवळे पडते.हदयाची गती आणि धडधड वाढते.श्वसनासंबंधी आजार उत्पन्न होतात. काही व्यक्तीना हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे चक्कर सुध्दा येते.

जेष्ठ महिलांच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावे. पालक, राई, हिरवे वटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आणि टमाटर हे आपल्या भोजना मध्ये समाविष्ट करावे.जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणात घेऊन पिण्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. 
डॉ.गजानन गि-हे वैद्यकिय अधिकारी विवेकानंद आश्रम


लेखक 
संतोष थोरहाते ,
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

ब्रोकन वायफाय पासवर्ड ठरतोय विद्यार्थ्यांसाठी स्पीडब्रेकर



अ‍ॅप्सच्या माध्यमातून लिक होतो पासवर्डविद्यार्थ्यांच्या अभ्यासात नेटमुळे येतो व्यत्यय
ब्रोकन वायफाय पासवर्ड विद्याथ्र्यांसाठी स्पीडब्रेकर ठरत असल्याचे दिसत आहे.अ‍ॅप्सच्या माध्यमातून कोणत्याही वायफायचा पासवर्ड लिक करता येत असल्याचे समोर आले आहे. एकंदरीतच इंटरनेटमुळे विद्याथ्र्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येत असून या परिणाम त्यांच्या निकालावर होण्याची  शक्यता आहे. आधुनिक युगात सेंकदाला नवनविन शोध लागत आहेत. तंत्रज्ञानामुळे मानवाच्या जीवनात प्रगती पहाटच होऊन त्यांचे काम सुध्दा सोपे झाले आहे. शहरीभागाप्रमाणे आता ग्रामीण भागात सुध्दा नेट वापरणाऱ्यांच्या  संख्येत दरवर्षी कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेटच्या वापराने संपूर्ण जग एका क्लिकने जवळ आले आहे. नेटच्या माध्यमातून छापील मजकूर संदेशासोबत व्हीडीओ कॉलींग सुध्दा होते तर स्मार्टफोनधारक मनोरंजनासाठी सुद्धा नेटचा मोठ्या वापर करतात. मात्र अनेक वायफाय पासवर्ड विविध अ‍ॅप्सच्या मदतीने सहज ब्रोकन करता येतात. मग त्या पासवर्डच्या मदतीन स्मार्टफोन धारक सहज विनामूल्य नेटचा वापर करू शकतो. ब्रोकन वायफाय पासवर्ड ग्रामीण भागातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत स्पीडब्रेकर ठरत असल्याचे दिसून येत आहे. नेटचा वापर ज्ञानार्जनासाठी केल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठया प्रमाणात भर पडून त्यांच्या विषय आकलण क्षमतेचा विकास झाल्याखेरीज राहणार नाही. मात्र विद्यार्थ्यांनी केवळ चित्रपट पाहणे,गीते ऐकणे,क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी वापर केल्यास त्याचा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर परिणाम होवून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटते. स्मार्टफोनच्या स्क्रीनमुळे डोळयावर व मोबाईलच्या लहरीमुळे शरीरावर सुध्दा घातक परिणाम होतात. विद्यार्थी स्मार्टवर गेम्स,चॅटिंग करण्यात बहुतेक वेळ घालवित असल्यामुळे नकळत अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम गुणवत्तेची घरसण होवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो.

मॅक अड्रेस प्रतिबंधासाठी उपयुक्त
प्रत्येक वायफाय एनेबल्ड डिव्हाइसचा एक मॅक अड्रेस असतो. तुम्ही एक किंवा वीस डिव्हायसेससाठी वायफाय वापरणार असाल तर त्यांचा मॅक अड्रेस स्पेसिफाय करावा. त्यानंतर मॅक अड्रेस फिल्टरिंग एनेबल केल्यामुळे  तुमच्या डिव्हायसेस शिवाय इतर कोणतेही डिव्हाइस तुमचे वायफाय अक्सेस करू शकणार नाही.

अशी घ्यावी काळजी
शहरी तसेच ग्रामीण भागातील नेटचा वापर करते २४ तास आपले वायफाय सुरू ठेवतात. वापरकत्र्यांनी गरज असल्यासच वायफाय राउटर सुरू ठेवावे. शक्यतोवर वायफाय राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलावा.पासवर्ड अल्फान्युमॅरीक सोबतच स्पेशल कॅरॅक्टर्सचा सुध्दा पासवर्ड मध्ये समावेश करावा.

आपला वायफाय पासवर्ड  कुणासोबत शेअर करू नका. वायफाय राउटर मध्ये मॅक अड्रेस अनेबल करून ठेवा. मॅक अड्रेसमुळे वायफाय पासवर्ड कुणालाही हॅक करता येत नाही.
                                           मिनिष मिश्रा,कॉम्प्युटर तज्ञ,मेहकर
संतोष थोरहाते ,
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम

मो ९९२३२०९६५८


गाडगे बाबांच्या विचारांनी समाजाला तारले - संतोष गोरे


विवेकानंद विद्या मंदिरात गाडगेबाबा जयंती संपन्न

हिवरा आश्रम,ता.२५: गाडगे बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या उत्कर्षासाठी व समाजोन्नतीसाठी वेचले. गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंध्दश्रध्दा निर्मूलन,शिक्षणाचा प्रचार प्रसाराचे मोठे कार्य केले. बाबांनी आपल्या साध्या सोप्या कीर्तनातून जनमानसाचे प्रबोधन करीत सत्य तेच समाजापुढे मांडले. गाडगे बाबांच्या विचाराने समाजाला तारले असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी  बोलतांना व्यक्त केले.
येथील येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिरात आयोजित संत गाडगे बाबा यांच्या जयंती प्रसंगी शनिवारी (दि.२४) रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात  संत गाडगे बाबांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमाचे सचिव संतोष गोरे तर प्रमुख पाहुणे सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक गि-हे,प्राचार्य निवृत्ती शिंदे,उपप्राचार्य अणाजी सिरसाठ तथा आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, .समाजातील रंजल्या गांजल्यात देव आहे त्यांची सेवा करा असे समाजाला शिकवण दिली. गाडगेबाबांनी समाजातील गरिबी, अशिक्षितपणा, अंध्दश्रध्दा, दारू,कर्ज काढून सण साजरे करणे,पशूबळी अशा मागासलेल्या समाजाचे प्रबोधन केले असल्याचे ही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
कार्यक्रम सूत्रसंचालन संजय भारती यांनी तर आभार प्रदर्शन सुजित दिवटे यांनी मानले.

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

जैविक बुरशी नियंत्रक बळीराजासाठी ठरतेय वरदान!


जमिनीचा पोत सुधारण्यासाठी होते मदतशेतक-यांचा वापराकडे वाढला कल


दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत असल्याचे दिसून येत आहे. पारंपारिक पिक पध्दतीला काही शेतकरी फाटा देत शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असल्याचे विधायक चित्र दिसून येत आहे. रासायनिक शेतीमुळे गेल्या काही वर्षात शेतक-याचा खर्च वाढला मात्र त्या तुलनेत शेतीपासून मिळणा-या उत्पादनात घट झाली. आता ग्रामीण भागातील शेतक-याचा नैसर्गिक शेती व जैविक शेती करण्याकडे मोठा कल वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मोठया प्रमाणात पालेभाज्या पिकवित असून पालेभाज्या वरील बुरशीच्या नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर न करता जैविक बुरशी नियंत्रकाचा (ट्रायकोडर्मा) मोठया प्रमाणात वापर करीत आहे. ट्रायकोडर्मा मुळे जमिनीच्या मातीची सुपिकता कायम ठेवून जमिनीचा पोट सुधारण्यास मोठी मदत होते. जमीनीचा होणारा -हास टळतो. शेतक-यांच्या पिकांना त्रस्त करणारे व जमिनीत वास्तव्य करणा-या बुरशी, मर, मुळकुच यासारखे रोग पिकांवर येतात त्यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. ट्रायकोडर्मा नियंत्रकाचा वापर आळवणी,शेणखत तसेच ठिबक सिंचनाव्दारे करता येतो.

अशा आहे वापराच्या पद्धती
ट्रायकोडर्मा वापराच्या तीन पध्दती असून बीजप्रक्रिया करते वेळेस एक किलो बियाण्याच्या बीजप्रक्रियेसाठी ८ ग्रम ट्रायकोडर्माचा वापर करावा तर माती प्रक्रीयासाठी एक ते अडीच किलो ट्रायकोडर्माची भुकटी १ हेक्टर क्षेत्रात मातीत पसरून माती मिसळून त्याला पाणी दयावे. द्रावणात बुडविण्याच्या पध्दतीमध्ये ५०० ग्रम पावडर ५ लिटर पाण्यात मिसळून गादी वाफ्यावरील रोपांची मुळे द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी.

ट्रायकोडर्मा चे फायदे
ट्रायकोडर्मा नैसर्गीक घटक असल्यामुळे या बुरशी नियंत्रकाचा पर्यावरणाल कोणताच विपरीत परिणाम होत नाही. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. ट्रायकोडर्माचा वापर करून बीजप्रक्रिया केल्यास पिकांचे बीजांकुरणात वाढ होते. रोगकारक बुरशीचा नाश करते. पिकांच्या वाढीच्या काळात पिकांचे संरक्षण करते. किफायदशीर असल्यामुळे खर्च कमी लागतो.

ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशी नियत्रंक रासायनिक बुरशी नाशकांपेक्षा स्वस्त असते. ट्रायकोडर्माच्या वापराने पर्यावरणावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. पिकांच्या वाढीच्या काळात पिकांचे अपायकारक बुरशीपासून संवरक्षण करते.
                                  प्रा.संतोष सुरडकर,वनस्पती विकृती शास्त्र विवेकानंद कृषी महाविद्यालय

लेखक 
संतोष थोरहाते 
पत्रकार 
विवेकानंद नगर,हिवरा आश्रम 
मो.९९२३२०६९५८


शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

रासेयो सामाजिक कार्याची अंतःप्रेरणा - आत्मानंद थोरहाते


राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून श्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. शिबीराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होवून सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेचा विकास होतो. गावपातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचा विकास होतो. रासेयो सामाजिक कार्याची अंतःप्रेरणा असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी यांनी बोलतांना व्यक्त केले.
येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उदघाटन प्रसंगी ते शुक्रवार (दि.२३) रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे तर प्रमुख पाहूणे म्हणून आश्रमाचे सचिव संतोष गोरे,विश्वस्त अशोक गि-हे तथा आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा,स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.प.शुकदास महाराज,पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
शिबिरात विद्यार्थी समूहाने सामाजिक कार्य करीत असल्यामुळे नेतृत्वगुण,संघटनशक्ती,सामाजिक एकोप्याची भावना वाढीस लागते. रासेयो शिबीराच्या माध्यमातून समाजातील माणसे वाचता येतात. रासेयो शिबीरातील सहभाग हा केवळ गुण वाढविण्यासाठी नसून सेवावृत्तीवाढीसाठी करावा असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी केले.
कार्याक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आकाश इरतकर तर सुत्रसंचालन अस्लम शेख,कल्याणी पाटील यांनी केले तर आभार प्रा.प्रतिक उगले यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा.प्रतिक उगले,प्रा.हर्षल मगर,प्रा.रqवद्र काकडे,प्रा.ज्ञानेश्वर जाधव,प्रा.सी.जी.देशमुख तथा आदींची उपस्थिती होती.


संतोष थोरहाते : स्त्री भ्रूण हत्या एक बिकट स्वरूप

संतोष थोरहाते : स्त्री भ्रूण हत्या एक बिकट स्वरूप: स्त्री भ्रूण हत्या हि समस्या आज-कालच निर्माण झाली असे नाही  तर या समस्येला इतिहास आहे,परंतु आजच्या एवढे बिकट स्वरूप पूर्वी या समस्य...

संतोष थोरहाते : ""एक तत्व नाम दृढ धरी मना"

संतोष थोरहाते : ""एक तत्व नाम दृढ धरी मना": मनुष्याला मानव जन्म महत भाग्याने मिळालेला आहे.जन्माला आल्यानंतर हया ठिकाणी मनुष्याला सुख दुःख ,आशा निराशा,प्रतिकुल अनुकुल अशा अने...

स्त्री भ्रूण हत्या एक बिकट स्वरूप


स्त्री भ्रूण हत्या हि समस्या आज-कालच निर्माण झाली असे नाही 
तर या समस्येला इतिहास आहे,परंतु आजच्या एवढे बिकट स्वरूप पूर्वी या समस्येने धारण केले नव्हते.पुरुष -प्रधान संस्कृती बर्याच प्रमाणात काळ-बाह्य झाली असली तरी विकासाचे ध्येय गाठू शकणार्या मुलीना समाजाने पाहिजे तेव्हढे हक्क प्रदान केले नाही.त्यामुळे समाजाची प्रगती
खुंटली.वास्तविक मुलीना हक्क नाकारणे म्हणजे देशाच्या प्रगतीला नकार देण्यासारखे आहे.फार पूर्वीपासून स्त्री अपत्या विषयीचा आकस समाजात आहे.वेग-वेगळ्या वेळी त्याची वेग-वेगळी कारणे पुढे आली आहे.परंतु स्त्री मुल नको हि या मागची सर्व-साधारण भावना आहे.
मुख्तः ग्रामीण भागातच घडत, म्हणून त्याची दाखल अथवा बोभाटा होत नसे.
परंतु नवीन तंत्र-ज्ञानाने असे अघोरी प्रकार करण्याची गरजच उरली नाही.गर्भातील मुलगी नको असेल तर लगेच गर्भ-पात करून घेऊन सारे कसे
आलबेल आहे असा आभास आता निर्माण केला जातो.मुलीना फक्त भ्रूण-हत्तेलाच तोंड द्यावे लागते असे नाही तर या दिव्यातून त्य बाहेर पडल्या तर आयुष्य भर त्यांना भेद-भावाला तोंड द्यावे लागते..
समानता हा मुल-भूत हक्क घटनेने सर्वाना दिला आहे. मग जन्मा -अगोदर हत्या केली जाणार्या मुलीना जन्म्ण्याचा व जगण्याचा हक्क का
डावलला जातो?कायद्याने गर्भ-पात करण्यची मुभा दिली आहे ,पण मुलगी म्हणून गर्भ-पाताच्या नावाखाली हत्या करण्याची मुभा त्यांना कोणी दिली ?त्यांना सहाय्य करणारे या गुन्ह्यात त्यांचे साथीदार नाहीत का?दुर्देवाची बाब असी आहे कि बर्याच अयादेखील भ्रूण-हत्येची पाठ-राखण करणाऱ्या आहेत.त्यामुळे हि समस्या फार जटील झाली आहे,आणि त्यावर रामबाण तोडगा शोधून काढणे अवघड होऊन बसले आहे.युनोच्या अहवालानुसार दरवर्षी ७५०००० भारतात मुलींची भ्रूण-हत्या होते.

संतोष थोरहाते,
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम.ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

""एक तत्व नाम दृढ धरी मना"



मनुष्याला मानव जन्म महत भाग्याने मिळालेला आहे.जन्माला आल्यानंतर हया ठिकाणी मनुष्याला सुख दुःख ,आशा निराशा,प्रतिकुल अनुकुल अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
मनुष्याला हा न जाण्यासाठी भगवंताच्या नामाचा अधार घावा लागतो. हा मायारूपी संसार तरून जाणे फारच कठिण कार्य आहे.परंतु भगवंतात्या नामाचा मनुष्याला जर आश्रय,आधार असेल तर तो निश्चित हा भवसागर सहजगत्या तरूण जाईल.जगत्गुरू तुकाराम महाराज नामाचा महिमा सांगतांना म्हणतात.

नामपरते साधन नाही पै आणिक। भव सिंधुतारक हेचि एक।।
उत्तमा उत्तम सर्वाही वरिष्ट। नाम श्रेष्ठा श्रेष्ठ तिन्ही लोकी।।

तुकाराम महाराज आपल्या लाडक्या,जिव्हाळयाच्या भक्तांचे शुभ व्हावे म्हणून  त्यांना वारंवार विनवणी करतांना म्हणतात की ,बाबा रे हा भवqसधु तरून जाणे अत्यंत दुस्कर असे कार्य आहे.परंतु भगवंताच्या नामाचा जर आधार असेल तर मनुष्य हा भवसागर सहज तरून जावू शकतो.तुकाराम महाराज म्हणतात की, नामाशिवाय उत्तम असे साधन नाही.नाम हे श्रेष्ठात श्रेष्ठ साधन आहे.
नाम हेच मुक्तीचे अमोघ साधन आहे.म्हणून ज्ञानी पुरूषाने नेहमी हया नामाचाच आधार घ्यावा.मनुष्याने आपल्या हृदयगाभाèयात सदैव भगवंताच्या नामाचे स्मरण,चिंतन अखंड चालु  ठेवावे .हे भगवंताचे नाम आत्मशांतीदायक ,आनंददायक त्याचप्रमाणे मुक्तीदायक सुध्दा आहे.भगवंताचे नाम हे जीवाचे शिवाशी 

एकरूप करण्याचे अमोघ ,अव्दितीय असे साधन आहे.
नामे पाषाण तरले।महापापी उध्दरले।।

एकनाथ महाराज नामाचा अगाध अलौकीक महिमा वर्णन करतांंना अतिशय आनंदाने भक्तांना सांगतात की ,नामाच्या आधारे निर्जीव पाषाण सुध्दा तरून जातात,तर आपण काय हा संसाररूपी सागर तरून जाणार नाही काय?महापापी राक्षस सुध्दा केवल नामाच्या साहयाने तरून जातात .एकनाथ महाराज म्हणतात की,भक्त प्रल्हाद हा वंशाने राक्षस होता परंतु प्रल्हादाने भगवंताच्या नामाचे अखंड स्मरण केले आणि भक्त प्रल्हादाचा उध्दार झाला.भगवंताच्या नामाचा महिमा अत्यंत प्रभाविपणे सांगतांना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात

नाम पवित्र आणि परिकरू।कल्पतरूहुनि उदारू।।
ते तु धरी कारे सधरू। तेणे तरसी भव दुस्तरू।।

संत श्रेष्ठ माऊली ही भक्तांच्या उध्दारासाठी त्याच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर असते.भक्तांचा उध्दार व्हावा.त्याचे जीवन कारणी लागावे.त्याच्या जीवनामध्ये मुक्ती सहजगत्या त्याला मिळावी यासाठीच ते उपदेश करतांना नामाचा महिमा विषद करताना म्हणतात.नामाशिवाय जीवाला तरणोपाय नाही.
भगवंताच्या मधुर पावन अशा नामाने मनुष्य सबाहय शुध्द होतो.नाम हे मनाला ,आत्म्याला पवित्र करते.एकदा का भक्ताला भगवंताच्या नामची गोडी लागली की तो देहभान हारपून जातो.त्याला भगवंता शिवाय दुसरीकडे करमत सुध्दा नाही.त्याची अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंगङ्कहयाप्रमाणे होते नाम हे भक्तासाठी मायेप्रमाणे आहे नाम हे मनुष्याला कल्पतरूप्रमाणे त्यांच्या मनोच्छा पुर्ण करणारे आहे.

संतोष थोरहाते ,
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

"विवेकानंद आश्रम" सामाजिक विकासाची प्रयोगशाला


               कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरक,स्फूर्तीदायक,ओजस्वी विचारांपासून प्रेरणा घेवून बुलडाणा जिल्हयातील हिवरा बु या छोटयाशा निर्सगरम्य परंतु दुर्गम खेडयात १४ जानेवारी १९६५ रोजी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. विवेकानंदांच्या ओजस्वी विचांराना पुस्तका पुरते मर्यादित  न ठेवता विवेकानंदांच्या विचारांना ख-या अर्थाने कृतीची जोड दिली. स्वामी विवेकानंदा प्रति दृढ निष्ठता,कर्तव्यपालनाची कठोरता आणि अखंड परिश्रमाची तयारी यातुन निर्माण झालेल्या इच्छाशक्तीच्या बळावर प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमा स्थापना करून  उजाड माळ रानावर विवेकानंद आश्रमाच्या रूपाने स्वर्ग निर्माण केला. जे का रंजले गांजले या महान तत्वाची प्रेरणा लाभलेले प.पू.शुकदास महाराज शेवट पर्यंत अनाथ,अपंग,गरीब रूग्णांसाठी चंदनाप्रमाणे झिजत राहिले.
प.पू.शुकदास महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासूनच समाजसेवेचा वसा घेतला. स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार वयाच्या १४ व्या वर्षीच प.पू.शुकदास महाराजांना उमगले आणि मानवसेवा हीच ईश्वर सेवा,तोच खरा धर्म व तेच खरे आध्यात्मीक जीवनहे जीवनध्येय ठरविले. दारिद्र नारायणाची सेवा हीच खरी परमेश्वराची पुजा हा विचार शुकदास महाराजांच्या जीवन कार्याचा आधार बनला. 
ज्या मी देवाचा आहे उपासक। करूनी ओळख देतो त्याची।।
 या इकडे तुम्ही पहा तो नयनी। नटला रूपानी दुःखीतांच्या।। 
गरीब अनाथ अपंग दलित। तोचि हा पतीत झाला अज्ञ।।
 शुकदास म्हणे हेचि माझे देव ।अर्पिला मी जीव त्यांच्यासाठी ।। 
विवेकानंद आश्रमाचे मानवाच्या जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारे विविध सेवाभावी उपक्रम व सेवा कार्य आखिल समाजोन्नतीसाठी आहे.
भौतिक विकास हा अध्यात्माच्या पायावर उभा करून भूतलावर स्वर्ग कसा निर्माण होऊ शकते हे प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाचे माध्यमातून समाजाला दाखवून दिली. विवेकानंद आश्रम हे असे एक तीर्थस्थळ आहे की, जिथे माणसाच्या मनाचा मळ धुतला जावून त्याचा विवेक जागृत होतो. धर्म,पंथ,भेद विसरायला लावणारा विवेकानंद आश्रमाचा परिसर मनाला भावणारा आहे. जणूकाही विवेकानंद आश्रम ही सामाजिक विकासाची प्रयोगशाला तसेच धर्माचे यर्थाथरूप स्पष्ट करणारी धर्म शाळा आहे. तीर्थक्षेत्र म्हणून विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थक्षेत्रास विवेकाची किनार आहे. हरिहर तीर्थक्षेत्रावरील भगवान बालाजी व भगवान शिव हि दोन्ही मंदिरे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. विवेकानंद आश्रम म्हणजे विज्ञान आणि अध्यात्माचा सुरेख संगम आहे. विवेकानंद आश्रम म्हणजे मानवसेवेचा दिपस्तंभ होय.

आश्रमाचे ग्रामीण भागातील आरोग्य कार्य उल्लेखनीय
प.पू.शुकदास महाराजांनी सव्वा कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त केले आहे.शनिवार,रविवार व सोमवार या तिन दिवशी हिवरा आश्रम येथे धर्माध रूग्णचिकित्सा सुरू असते. राज्याच्या कान्याकोपयातून हजारो रूग्ण विवेकानंद आश्रम येथे वैद्यकीय उपचारासाठी येवून व्याधीमुक्ततेचा आनंद घेतात. विवेकानंद आश्रम व्दारे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य समस्या दूर होण्याच्या दृष्टीने विविध भव्य आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात येते. या आरोग्य शिबीरामध्ये नामवंत डॉक्टर्स आपल्या सेवा देतात.आरोग्य शिबीरात गरजू,गरीब रूग्णांना मोफत औषधींचे वाटप केले जाते. गरीब रूग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेचा खर्च विवेकानंद आश्रम  उचलते.विवेकानंद आश्रम व्दारा आयोजित आरोग्य शिबीराचा दरवर्षी सुमारे दहा हजार ते पंधरा हजार रूग्ण बांधव लाभ घेतात.

ग्रामीण रूग्णालयाचा ४० खेड्यांना होईल लाभ
प.पू.शुकदास महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत रूग्णसेवेला प्राधान्य दिले. प.पू.शुकदास महाराजांनी सव्वा कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. प.पू.शुकदास महाराजांच्या आरोग्य सेवेची दखल घेत महाराष्ट्र शासनाने हिवराआश्रम येथे विशेष बाब म्हणून ग्रामीण रूग्णालयास मंजूरी दिली. हिवरा आश्रम येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगती पथावर असून लवकरच हे ग्रामीण रूग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरू होईल. ग्रामीण रूग्णालयांसाठी विवेकानंद आश्रमाने चार कोटी रूपये किंमतीची जागा उपलब्ध करून दिली असून हया ग्रामीण रूग्णालयाच्या लाभ जवळपास चाळीस ते पन्नास खेडयातील रूग्ण बांधवांना होणार आहे.

विवेकानंद आश्रमाचे शैक्षणिक कार्य
बोध आणि शोध म्हणजे शिक्षण होय असे शिक्षणाबाबत शुकदास महाराजांचे विचार विद्याथ्र्यांच्या जिज्ञासा,शोध वृत्तीला चालना देण्यासाठी प्रेरक ठरतात. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. ग्रामीण भागातील होतकरू,गरीब,हुशार विद्याथ्र्यांना कमी दरात शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी विवेकानंद आश्रम व्दारे विवेकानंद ज्ञानपीठविद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,निवासी अपंग विद्यालय,निवासी कर्णबधिर विद्यालय,विवेकानदं विज्ञान महाविद्यालय,कृषी महाविद्यालय,कृषी व्यवसाय व्यवस्थान महाविद्यालय,नामांकित मुलांची इंग्रजी शाळा  सुरू करण्यात आली आहे. विवेकानंद आश्रमाच्या वसतिगृहात सुमारे पाच ते हजार मुले मुली निवासी आहे. विद्यार्थ्यांच्या मनात संस्काराची बीजे अंकुरीत होवून देशाला चारित्र्यसंपन्न युवक तयार करण्याचे काम आश्रमाच्या शैक्षणिक संस्थेतून होत आहे.

कृषी कार्य शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी
भारत हा कृषी प्रधान देश आहे. विवेकानंद आश्रम व्दारे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होण्यासाठी विविध कृषी उपक्रम राबविले जातात. यामध्ये पशुसंवर्धनदुध चारा विकास प्रकल्पगांडुळ खत निर्मिती प्रकल्प,विज्ञान शेतीकृषी मेळाव्यांचे आयोजनकृषीप्रदशनेकृषी चर्चासत्रे मोठया प्रमाणात राबविले जातात.

विवेकानंद आश्रमाचे सामाजिक कार्य
वृध्दनिराधार व्यक्तींना मायेची उब मिळावीत्यांना सन्मानानेताठ मानेने जगता यावे यासाठी विवेकानंद आश्रम व्दारे वानप्रस्थाश्रम चालविले जाते. समाजातील अंधश्रध्दा,हुंडाप्रथा निर्मुलन करण्यासाठी महाविद्यालयाचे विद्याथी पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करीत असतात. याशिवाय साक्षरता,पर्यावरण रक्षणसंवर्धनवृक्षारोपन इत्यांदी उपक्रम विवेकानंद आश्रमाव्दारे राबविले जातात.

विवेकानंद जयंती व भव्य महाप्रसाद
विवेकानंद आश्रमामध्ये पौष वद्य पंचमी ते सप्तमी  या दरम्यान विवेकानंदांचा जन्मोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणा-या या महोत्सवामध्ये नामवंत कीर्तनकारप्रवचनकारव्याख्यातेगायक यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. शेवटच्या दिवशी देशभरात आलेल्या सुमारे तीन ते चार लाख भाविकांना चाळीस एकराच्या शेतात अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने गव्हाची पुरीवांग्याच्या भाजीचा महाप्रसाद उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येतो.

संतोष थोरहाते 
"श्रीनिवास" विवेकानंद नगर हिवरा आश्रम 
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८  

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

ग्रामीण भागातील तरूणांनी घेतली उदयोगात भरारी


उद्योगातून स्थानिक भागातील अनेक तरुणांना मिळाला रोजगार


पुरी वायरनेल्स चे उद्घाटन करतांना आश्रमाचे  जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले ,अध्यक्ष सेवाव्रती आर.बी .मालपाणी व इतर 


उम्मीदों की कश्ती को डुबोया नही करते...मंजिल दूर हो तो थक कर रोया नही करते...रखते है जो दिल में उम्मीद कुछ पाने की...वो लोग जिंदगी मे कुछ खोया नही करते...जीवनातील स्वप्नांना कृतीची पंख लावून यशाची गगन भरारी घेण्याची कला,धाडस व साहस फारच थोडया लोकांना अवगत होते. जी व्यक्ती आपल्या उराशी यशाची स्वप्ने बाळगतात त्याच्या यशाच्या मार्गात कितीही अडचणी अथवा संकटे आली तरी ते न घाबराता ज्योपर्यंत ध्येय,यश मिळत नाही अथक प्रयत्न करीत राहतात. याचा प्रत्यय हिवरा आश्रम येथील संदीप हरिदास पुरी,ओम हरिदास पुरी व भगवान सुंदर पुरी या तीन उच्च विद्याविभुषीत पुरी या सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या कुटूंबीयांकडे पाहून येतो. कुठल्याही प्रकारी व्यावसायिक पार्श्वभूमी अथवा कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन नसतांना स्वयंप्रेरणेतून त्यांनी हिवरा आश्रम सारख्या छोटया गावामध्ये वीस लाख भांडवलातून पुरी वायरनेल्स हा छोटा उदयोग उभारला आहे. ग्रामीण भागात लोखंडी खिळे निर्मितीचा हा  पहिलाच उदयोग उभारणीचे धाडस पुरी भावंडानी दाखविले आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या कायम सानिध्यात व संस्कारात लहानाचे मोठे झालेले  संदीप पुरी,ओम पुरी व भगवान पुरी यांचा ग्रामीण भागातील उदयोग उभारून तरूणांना प्रेरणा दिली आहे. ग्रामीण भागातील तरूणाईच्या मानसिकतेत बदल होत असून आजचा तरूण नोकरीच्या मागे न लागता उदयोगाच्या दिशेने वळत असल्याचे विधायक चित्र दिसून येत आहे. जिद्द, जिकाटी व मेहनतीच्या बळावर येणा-या काळात हा उदयोग वाढविणार असल्याचाही मनोदय  पुरी भावडांनी दैनिक सकाळशी बोलतांना व्यक्त केला.

रोजगार निर्मितीवर देणार भर
पुरी वायरनेल्स मध्ये एक इंची लोखडी खिळयापासून ते चार इंची खिळ्यांची निर्मिती होत आहे. येणा-या काळात ग्रामीण भागातील अधिक लोकांना उदयोगाच्या माध्यामातून रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

उदयोग सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अथवा मागणी पुरवठा व उदयोगाशी निगडीत बाबींचा आम्ही अभ्यास केला असून आम्हाला निश्चित उदयोगात यश मिळेल. भावनेच्या भरात उदयोग सुरू केला नाहीतर व्यावसायिकता अंगी बाळगून उद्योग सुरु केला.
                                                                 संदीप पुरी हिवरा आश्रम

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

खांदेकरी बनून महिलांची सामाजिक परिवर्तनास सुरूवात



हिवरा आश्रम येथील महिला बनल्या वडीलांच्या खांदेकरी


वडीलांच्या निधनाची वार्ता कानी पडताक्षणी मुलींना अनावर झालेले दुःख... आश्रुंनी डबडबले डोळे, खिन्न व उदास  झालेले चेहरे...कायम हुंदक्याचा आवाज... मात्र झालेल्या दुखातून स्वतःला सावरत व आईला धीर देत हिवरा आश्रम येथील चार मुली वडीलांच्या खांदेकरी बनल्या. रूढी व परंपरेच्या चौकटीतून बाहेर पडत वडीलांच्या खांदेकरी बनून या महिलांनी नव्या सामाजिक परिवर्तनाची खरी सुरूवात केली. हिवरा आश्रम येथील महिलांनी वडिलाचे खांदेकरी बनत समाजापुढे नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. स्त्री ही त्याग, नम्रता, श्रध्दा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. आजची स्त्री पुरूषासोबत प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. आपले कर्तुत्वाने तिने अनेक यशाच्या वाटा पादाक्रांत केल्या असून तीने वेळोवेळी आपली क्षमता व  सिद्धता  दाखवून दिली आहे. हिवरा आश्रम येथील मुलीनी वडिलांचे खांदेकरी बनून समाजाला स्त्री शक्तीची जाणीव करून दिली आहे. हिवरा आश्रम येथील रामकृष्ण खंडूजी खिल्लारे हे शिव जयंतीच्या शुभ पर्वावर अल्पशा आजाराने निधन पावले. रामकृष्ण खिल्लारी हे  सुस्वभावी, धार्मिक प्रवृत्ती व पंचागशास्त्राचे अभ्यासक होते. हिवरा आश्रम येथील मुली वडीलांच्या खांदेकरी बनल्याने ख-या अर्थाने मुलगीच वंशाचा दिवा असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. रामकृष्ण खिल्लारी यांच्या पश्चात पत्नी व ५ मुली असा परिवार आहे. त्याचा मुलगा पुरूषोत्तम याचा काहीवर्षापूर्वी अपघातात मृत्य झाला होता. बालपणी  ज्या वडीलांच्या अंगाखांदयावर खेळलो...ज्यांनी प्रत्येक हट्ट पुरविण्यासाठी जीवाचे रान केले... त्याच आपल्या वडीलांना आपला खांदयाचा आधार मिळाला... त्याच आपल्या वडीलांचे खांदेकरी होण्याच्या मुलींच्या निणर्यामुळे सर्व महिलांसमोर नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे. रामकृष्ण खिल्लारी यांना खांदा देण्यासाठी त्यांच्या मुली सौ.कुसुमबाई निकम रा.नायगांव,सौ.वर्षा गारोळे रा.परतापूर,सौ.संगीता कबाडे रा.उकळी,सौ.सुनिता कुटे रा.शेलगाव देशमुख,पुष्पा खिल्लारी रा.हिवरा आश्रम यांनी वडीलांच्या खांदेकरी बनल्या होत्या.  ऐकऐकीकडे  आजसुध्दा स्त्रीयांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या उदासीन वृत्तीत अजून सुध्दा  बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. वर्तमानपत्रात दररोज स्त्रीभ्रूणहत्या व स्त्री अत्याचारांच्या बातम्या नजरेखाली आल्याशिवाय राहत नाही. आजची स्त्री समानतेसाठी अजून लढत असतांना मात्र हिवरा आश्रम येथील रामकृष्ण खंडूजी खिल्लारी यांच्या  चार मुलींनी खांदा देवून आपले कर्तव्य पूर्ण केले. अंत्यसंस्काराच्या वेळीस आई-वडीलांना मुलगा व मुलगी समान असते. मुली सुध्दा आपल्या आईवडीलांच्या सेवत कुठेही कमी पडत नसल्याचे पुन्हा एकदा समाजाला आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

संतोष थोरहाते : अल्झायमर्स रूग्णांना गरज सहानुभूतीपूर्वक संगोपनाची...

संतोष थोरहाते : अल्झायमर्स रूग्णांना गरज सहानुभूतीपूर्वक संगोपनाची...: अल्झायमर्स रूग्णांना गरज सहानुभूतीपूर्वक संगोपनाची   !    आजारामुळे  व्यक्ती जगापासून एकाकी पडतो. आप्तेष्ठांसाठी संगोपन करतांना  अनेक ...

संतोष थोरहाते : जीवनातील निर्भेळ आनंदासाठी करा व्यसनांचा त्याग !...

संतोष थोरहाते : जीवनातील निर्भेळ आनंदासाठी करा व्यसनांचा त्याग !

...
: जीवनातील निर्भेळ आनंदासाठी करा व्यसनांचा त्याग ! व्यसन ही अशी सवय आहे की ज्याचा शारीरीक , मानसिक व सामाजिक जीवनावर परिणाम होतो. काही ...