Responsive Ads Here

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

रासेयो सामाजिक कार्याची अंतःप्रेरणा - आत्मानंद थोरहाते


राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून श्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. शिबीराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होवून सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेचा विकास होतो. गावपातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचा विकास होतो. रासेयो सामाजिक कार्याची अंतःप्रेरणा असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी यांनी बोलतांना व्यक्त केले.
येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उदघाटन प्रसंगी ते शुक्रवार (दि.२३) रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे तर प्रमुख पाहूणे म्हणून आश्रमाचे सचिव संतोष गोरे,विश्वस्त अशोक गि-हे तथा आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा,स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.प.शुकदास महाराज,पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
शिबिरात विद्यार्थी समूहाने सामाजिक कार्य करीत असल्यामुळे नेतृत्वगुण,संघटनशक्ती,सामाजिक एकोप्याची भावना वाढीस लागते. रासेयो शिबीराच्या माध्यमातून समाजातील माणसे वाचता येतात. रासेयो शिबीरातील सहभाग हा केवळ गुण वाढविण्यासाठी नसून सेवावृत्तीवाढीसाठी करावा असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी केले.
कार्याक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आकाश इरतकर तर सुत्रसंचालन अस्लम शेख,कल्याणी पाटील यांनी केले तर आभार प्रा.प्रतिक उगले यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा.प्रतिक उगले,प्रा.हर्षल मगर,प्रा.रqवद्र काकडे,प्रा.ज्ञानेश्वर जाधव,प्रा.सी.जी.देशमुख तथा आदींची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा