Responsive Ads Here

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

ब्रोकन वायफाय पासवर्ड ठरतोय विद्यार्थ्यांसाठी स्पीडब्रेकर



अ‍ॅप्सच्या माध्यमातून लिक होतो पासवर्डविद्यार्थ्यांच्या अभ्यासात नेटमुळे येतो व्यत्यय
ब्रोकन वायफाय पासवर्ड विद्याथ्र्यांसाठी स्पीडब्रेकर ठरत असल्याचे दिसत आहे.अ‍ॅप्सच्या माध्यमातून कोणत्याही वायफायचा पासवर्ड लिक करता येत असल्याचे समोर आले आहे. एकंदरीतच इंटरनेटमुळे विद्याथ्र्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येत असून या परिणाम त्यांच्या निकालावर होण्याची  शक्यता आहे. आधुनिक युगात सेंकदाला नवनविन शोध लागत आहेत. तंत्रज्ञानामुळे मानवाच्या जीवनात प्रगती पहाटच होऊन त्यांचे काम सुध्दा सोपे झाले आहे. शहरीभागाप्रमाणे आता ग्रामीण भागात सुध्दा नेट वापरणाऱ्यांच्या  संख्येत दरवर्षी कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेटच्या वापराने संपूर्ण जग एका क्लिकने जवळ आले आहे. नेटच्या माध्यमातून छापील मजकूर संदेशासोबत व्हीडीओ कॉलींग सुध्दा होते तर स्मार्टफोनधारक मनोरंजनासाठी सुद्धा नेटचा मोठ्या वापर करतात. मात्र अनेक वायफाय पासवर्ड विविध अ‍ॅप्सच्या मदतीने सहज ब्रोकन करता येतात. मग त्या पासवर्डच्या मदतीन स्मार्टफोन धारक सहज विनामूल्य नेटचा वापर करू शकतो. ब्रोकन वायफाय पासवर्ड ग्रामीण भागातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत स्पीडब्रेकर ठरत असल्याचे दिसून येत आहे. नेटचा वापर ज्ञानार्जनासाठी केल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठया प्रमाणात भर पडून त्यांच्या विषय आकलण क्षमतेचा विकास झाल्याखेरीज राहणार नाही. मात्र विद्यार्थ्यांनी केवळ चित्रपट पाहणे,गीते ऐकणे,क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी वापर केल्यास त्याचा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर परिणाम होवून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटते. स्मार्टफोनच्या स्क्रीनमुळे डोळयावर व मोबाईलच्या लहरीमुळे शरीरावर सुध्दा घातक परिणाम होतात. विद्यार्थी स्मार्टवर गेम्स,चॅटिंग करण्यात बहुतेक वेळ घालवित असल्यामुळे नकळत अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम गुणवत्तेची घरसण होवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो.

मॅक अड्रेस प्रतिबंधासाठी उपयुक्त
प्रत्येक वायफाय एनेबल्ड डिव्हाइसचा एक मॅक अड्रेस असतो. तुम्ही एक किंवा वीस डिव्हायसेससाठी वायफाय वापरणार असाल तर त्यांचा मॅक अड्रेस स्पेसिफाय करावा. त्यानंतर मॅक अड्रेस फिल्टरिंग एनेबल केल्यामुळे  तुमच्या डिव्हायसेस शिवाय इतर कोणतेही डिव्हाइस तुमचे वायफाय अक्सेस करू शकणार नाही.

अशी घ्यावी काळजी
शहरी तसेच ग्रामीण भागातील नेटचा वापर करते २४ तास आपले वायफाय सुरू ठेवतात. वापरकत्र्यांनी गरज असल्यासच वायफाय राउटर सुरू ठेवावे. शक्यतोवर वायफाय राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलावा.पासवर्ड अल्फान्युमॅरीक सोबतच स्पेशल कॅरॅक्टर्सचा सुध्दा पासवर्ड मध्ये समावेश करावा.

आपला वायफाय पासवर्ड  कुणासोबत शेअर करू नका. वायफाय राउटर मध्ये मॅक अड्रेस अनेबल करून ठेवा. मॅक अड्रेसमुळे वायफाय पासवर्ड कुणालाही हॅक करता येत नाही.
                                           मिनिष मिश्रा,कॉम्प्युटर तज्ञ,मेहकर
संतोष थोरहाते ,
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम

मो ९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा