आजारामुळे व्यक्ती जगापासून एकाकी पडतो. आप्तेष्ठांसाठी संगोपन करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेष्ठांनी भविष्यात अल्झायमर्सचा धोका टाळण्यासाठी संतुलीत आहार, नियमीत व्यायाम व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेतल्यास अल्झायमर्स आजारावर जेष्ठांना सहज मात करता येते.
अल्झायमर्समुळे जेष्ठांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अल्झायमर्स
आपल्या भावविश्वाला आनंदी व समृध्द करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विचार होय. मनुष्याला जीवन जगतांना विचारांची वेळोवेळी मोलाची मदत होते. निराश, हताश झालेल्या माणसाच्या हृदयामध्ये स्फुर्तीचे, उत्साहाचे व उर्जेचे स्पुलींग प्रज्वलित करण्याचे काम विचार करीत असतात. सकारात्मक विचार माणसाला ध्येयाच्या दिशेने झेप घेतांना त्यांच्या पखांना बळ देतात. सकारात्मक विचारांनी माणूस जेव्हा काम करतो तेंव्हा अशक्य वाटणा-या गोष्ट शक्य करून दाखवितो. या विचारांच्या भरवशावर तो जग सुध्दा जिंकू शकतो. क्षणभर कल्पना करा!.. जर माणसाची विचार करण्याची क्षमता नष्ट झाली तर... आयुष्य किती निरस व व्यर्थ होईल. जगण्यात काही अर्थ राहील का? मग उरेल फक्त नाममात्र शरीराची आकृती. अल्झायमर्स आजार काही जेष्ठांना वयाच्या ६० वर्षानंतर नंतर होतो तर काहींना हा वयाच्या ८० नंतर होतो. मेंदूमध्ये बीटा अमायलॉइट पेप्टाइड नावाचा पदार्थ जमा होतो आणि अॅसिटीलकोलीन कमी झाल्यामुळे पेशींना हानी होते. अल्झायमर्स आजारात मेंदूचा हिप्पोकॅम्पस नावाचा भाग किंवा संपूर्ण मेंदू आकुंचन पावल्याने जेष्ठांच्या विचार व क्रिया विस्कळीत होतात. भारतामध्ये ६० वर्षे असणा-या २० व्यक्तीमागे १ व्यक्तीला अल्झायमर्स असतो. भारतामध्ये २०१० मध्ये ४ दशलक्ष लोक अल्झायमर्स आजाराने पीडित होते. अमेरीकेत कॅन्सर, हार्टअटॅक नंतर अल्झायमर्स ने मृत्यू पावणा-यांची संख्या अधिक आहे.
अल्झायमर्सची लक्षणे
अल्झायमर्स मुळे वृध्दापकाळात स्मरणशक्ती कमकुवत होत जाते. विचार करण्याची क्षमता दिसेंदिवस कमी झाल्यामुळे व्यक्ती गोंधळून जातो. कुटूंबातील सदस्य व मित्रांना न ओळखणे, आजारी व्यक्तीला वेळ आणि स्थळाबाबत संभ्रम निर्माण होतो. झोप कमी लागणे, वजन कमी होणे अशी अल्झायमर्स आजाराची लक्षणे आहेत.
अशी घ्यावी काळजी
अल्झायमर्स सारखा आजारापासून दूर राहण्यासाठी संतुलीत पौष्टीक आहार घ्यावा. ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे जास्त सेवन करावे. वयोमानानुसार धावणे, सायकलींग, योगा,प्राणायाम करावा. शरीरात व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले होवून मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा व प्राणवायु मिळतो. तणावमुक्त राहिल्याने मेंदूचे आरोग्य उत्तम राहाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा