Responsive Ads Here

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

जीवनातील निर्भेळ आनंदासाठी करा व्यसनांचा त्याग !


व्यसन ही अशी सवय आहे की ज्याचा शारीरीक,मानसिक व सामाजिक जीवनावर परिणाम होतो. काही वेळेस व्यक्ती व्यसनाच्या इतक्या आहारी जातो की सामाजिक प्रतिष्ठेचे सुध्दा भान हरपून जातो. बीडी,सीगारेट,दारू या व्यसनांनी शरीराच्या आरोग्यवर घातक परिणाम होतात. जसजसा वृध्दापकाळ जवळ येतो तशीतशी शरीरातील उर्जाशक्ती कमी होवून शरीर अशक्त होते. तरूणपणात जडलेली व्यसने वृद्धापकाळात सोडण्यासाठी मनाची तितकीच दृढ इच्छाशक्ती लागते. जेष्ठांच्या व्यसन मुक्तीसाठी घरातील कौटुंबीक प्रोत्साहन महत्वपूर्ण भूमिका पार पाडते.
वृध्दापकाळात जेष्ठांनी आपल्या सवयीत वेळीच बदल केला नाही तर आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. जेष्ठांनी वेळीच दृढ इच्छा शक्तीव्दारे आपल्या मनावर नियंत्रण मिळून व्यसनाचा त्याग करावा. जेष्ठांनी वृध्दापकाळात व्यसनांचा त्याग केल्यास शरीराची होणारी हानी तर टळतेच परंतु जीवनातील निर्भेळ आनंद सुध्दा घेता येतो. व्यसनापासून परावृत्त होणे कठीण आहे ही मानसीकतेत बदल केल्यास जेष्ठांनासुध्दा सहज व्यसनाचा त्याग करता येतो. बीडीसिगारेट व दारू वृध्दापकाळात त्याग करावा. सतत बीडी, सीगारेट ओढल्याने माणसाच्या जेष्ठांच्या फुप्फुसांना मोठी हानी पोहचून एकंदरीत संपूर्ण श्वसन संस्थेच्या कार्यात बिघाड निर्माण होतो. व्यक्तीला हलका श्वास घेण्यास सुध्दा त्रास होवू लागतो. सारखा कोरडा खोकला, ठसका लागणे, छातीत चमका निघणे, दुखणे, दमा यासारखे त्रास उदभवतात. व्यसनमुक्तीसाठी गेल्या अनेक वर्षापासून राज्यात विविध उपक्रम चालविले जातात परंतु जोपर्यंत मानसीकतेत बदल होत नाही तोपर्यंत व्यसनमुक्त समाज निर्मित होवू शकत नाही. आपल्या घरातील कुणी व्यसनाधीन असेल तर त्याचे समुपदेशन करणे गरजेचे ठरते. व्यसनी व्यक्तीला भावनीक आधाराची गरज असल्यामुळे त्याच्या भावनांची अवेहना होणारा नाही याची काळजी घेतल्यास सुधारणा होवू शकते.


व्यसनांचा शरीरावर होणारा परिणाम
तंबाखुजन्य पदार्थांच्या व्यसनाने कर्करोग सुध्दा होतो. तर काही व्यसनामुळे हात, पाय किंवा चेह-यावर सुज येणे, दृष्टीदोष निर्माण होवून नजर कमी होणे. ह्रदय छातीची दुखणे वाढणे, खोकला वाढणे, यकृताची आकारात वृध्दी होणेरक्तदाब अधिक वाढणे हातपाय थरथरणे, स्मरणशक्तीचा -हास होतो.

व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाची गरज
कुठली गोष्ट चांगली किंवा कुठली गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक हे मनावर बिंबविण्याचे काम समुपदेशकच चांगल्या प्रकारे करू शकतो. समुपदेशक हाव्यसनी व्यक्तीचा विश्वास संपादन करून व्यसनमुक्तीच्या प्रवासात मोलाची भूमीका पार पडतो. समुपदेशच्या योग्य मार्गदर्शनाखाली व्यक्ती व्यसनमुक्त होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा