जैविक बुरशी नियंत्रक बळीराजासाठी ठरतेय वरदान!


जमिनीचा पोत सुधारण्यासाठी होते मदतशेतक-यांचा वापराकडे वाढला कल


दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत असल्याचे दिसून येत आहे. पारंपारिक पिक पध्दतीला काही शेतकरी फाटा देत शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असल्याचे विधायक चित्र दिसून येत आहे. रासायनिक शेतीमुळे गेल्या काही वर्षात शेतक-याचा खर्च वाढला मात्र त्या तुलनेत शेतीपासून मिळणा-या उत्पादनात घट झाली. आता ग्रामीण भागातील शेतक-याचा नैसर्गिक शेती व जैविक शेती करण्याकडे मोठा कल वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मोठया प्रमाणात पालेभाज्या पिकवित असून पालेभाज्या वरील बुरशीच्या नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर न करता जैविक बुरशी नियंत्रकाचा (ट्रायकोडर्मा) मोठया प्रमाणात वापर करीत आहे. ट्रायकोडर्मा मुळे जमिनीच्या मातीची सुपिकता कायम ठेवून जमिनीचा पोट सुधारण्यास मोठी मदत होते. जमीनीचा होणारा -हास टळतो. शेतक-यांच्या पिकांना त्रस्त करणारे व जमिनीत वास्तव्य करणा-या बुरशी, मर, मुळकुच यासारखे रोग पिकांवर येतात त्यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. ट्रायकोडर्मा नियंत्रकाचा वापर आळवणी,शेणखत तसेच ठिबक सिंचनाव्दारे करता येतो.

अशा आहे वापराच्या पद्धती
ट्रायकोडर्मा वापराच्या तीन पध्दती असून बीजप्रक्रिया करते वेळेस एक किलो बियाण्याच्या बीजप्रक्रियेसाठी ८ ग्रम ट्रायकोडर्माचा वापर करावा तर माती प्रक्रीयासाठी एक ते अडीच किलो ट्रायकोडर्माची भुकटी १ हेक्टर क्षेत्रात मातीत पसरून माती मिसळून त्याला पाणी दयावे. द्रावणात बुडविण्याच्या पध्दतीमध्ये ५०० ग्रम पावडर ५ लिटर पाण्यात मिसळून गादी वाफ्यावरील रोपांची मुळे द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी.

ट्रायकोडर्मा चे फायदे
ट्रायकोडर्मा नैसर्गीक घटक असल्यामुळे या बुरशी नियंत्रकाचा पर्यावरणाल कोणताच विपरीत परिणाम होत नाही. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. ट्रायकोडर्माचा वापर करून बीजप्रक्रिया केल्यास पिकांचे बीजांकुरणात वाढ होते. रोगकारक बुरशीचा नाश करते. पिकांच्या वाढीच्या काळात पिकांचे संरक्षण करते. किफायदशीर असल्यामुळे खर्च कमी लागतो.

ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशी नियत्रंक रासायनिक बुरशी नाशकांपेक्षा स्वस्त असते. ट्रायकोडर्माच्या वापराने पर्यावरणावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. पिकांच्या वाढीच्या काळात पिकांचे अपायकारक बुरशीपासून संवरक्षण करते.
                                  प्रा.संतोष सुरडकर,वनस्पती विकृती शास्त्र विवेकानंद कृषी महाविद्यालय

लेखक 
संतोष थोरहाते 
पत्रकार 
विवेकानंद नगर,हिवरा आश्रम 
मो.९९२३२०६९५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा