Responsive Ads Here

महाराष्ट्रीयन

ज्वारीचे थालीपीठ 
महाराष्ट्र खाद्य संस्कृतीने आपले एक वेगळेपण जपून ठेवले आहे. महाराष्ट्रीयन खाद्य पदार्धाची चव ही या खाद्यपदार्थांना अधिक चविष्ट करतात. महाराष्ट्र खाद्यपदार्थात ज्वारी पासून बनविलेली भाकरी  व 
 झुणका विशेष प्रसिद्ध आहे .त्याचप्रमाणे ज्वारीचे थालीपीठ हे सुद्धा मोठ्याप्रमाणात लोकप्रिय आहे .लहान्ग्यापासून ते वृद्धांपर्यंत ज्वारीचे थालीपीठ तितक्याच आवडीने खाण्यात येते.

ज्वारीचे थालीपीठ साहित्य:
  • १ कप ज्वारीचे पीठ
  • १ कप पाणी
  • १ मोठा कांदा, उभा पातळ चिरून
  • १/२ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
  • १ टिस्पून मिरची पेस्ट
  • २-३ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
  • तेल
  • चवीपुरते मीठ
ज्वारीचे थालीपीठ बनविण्याची कृती
प्रथम  पाणी उकळत ठेवावे. त्यामध्ये त्यात मीठ,जीरे, हिंग आणि हळद घालून एकजीव  करावे. पाण्याची चव पहावी. थोडी खारट असली पाहिजे म्हणजे पीठ घातल्यावर मीठ बरोबर लागेल. पाणी उकळल्या  नंतर पीठ घालून आच बंद करावी. नीट मिक्स करून लगेच झाकण ठेवावे. 
१० मिनिटांनी मळून घ्यावे. मळताना मिरची पेस्ट, कांदा आणि कोथिंबीर घालावी. लागल्यास पाण्याचा हात लावावा. मोठे गोळे करावे.
दोन प्लास्टिक पेपरला आतून तेल लावून थालीपीठ लाटून घ्यावे. तेल सोडण्यासाठी २-३ छिद्रे  पाडावीत.
 तवा गरम करून तेल घालावे. थालीपीठ टाकून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी. झाकण काढून आच थोडी वाढवावी. एक बाजू थोडी भाजून तपकिरी होऊ  द्यावी. वरच्या बाजूवर आधीच तेल लावावे आणि कालथ्याने बाजू पालटावी. दुसरी बाजू खरपूस होवू द्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा