Responsive Ads Here

मारुती स्तोत्र


श्री मारुती स्तोत्र
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वानरी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना ||||
महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे | सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णव गायका || ||
दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवता हंता, भव्य सिंदुर लेपना || ||
लोकनाथा, जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता, पुण्यशिळा, पावना परितोषका || ||
ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कांपती भये || ||
ब्रम्हांडे माईली नेणों आंवाळे दंतपंक्ती | नेत्राग्नी चालील्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे || ||
पुच्छ ते मुर्डीले माथा, किरीटी कुंडले बरी | सुवर्ण कटी कांसोटी , घंटा किंकिणी नागरा || ||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपात़ळु | चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लतेपरी || ||
कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे | मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधे उत्पाटिला बळे || ||
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकीले मागे, गतिसी तुळणा नसे || १०||
अणुपासुनि ब्रम्हांडाएवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे || ११||
ब्रम्हांडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करु शके | तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडी पाहता नसे || १२||
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा || १३||
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समस्तही |पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकरुनिया || १४||
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधी समस्तही | नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने || १५||
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी | दृढदेहो, निसंदेहो, संख्याचंद्रकळागुणे || १६||
रामदासी अग्रगण्यु, कपीकुळासी मंडणु | रामरुपी अंतरात्मा, दर्शने दोषनासती|| १७||
||
इती श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं सम्पूर्णं ||


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा