Responsive Ads Here

गुरुवार, २० जून, २०१९

कृषीकन्यांनी दिले बळीराजाला माती परिक्षणाचे धडे

शेतकरी बांधवानी माती परिक्षण का करावे,माती परिक्षणाचे होणारे लाभ,माती परिक्षणासाठी नमुना कशाप्रकारे घ्यावामाती परिक्षणाचा नमुना घेतांना कोणती काळजी घ्यावी यासंबंधी शेतक-यांना माहिती होण्याच्या दृष्टीने विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभाच्या  कृषी संवादिनी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी ग्राम पिंपळगाव उंडा येथे परिसरातील शेतक-यांना माती परिक्षणाचे धडे दिलेयावेळी सरपंच आंभोरे,उपसरपंच प्रदिप काळे,किशोर इंगळे तथा परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते
भारत हा कृषीप्रधान देश असून बहुतेक जनतेच्या उपजिविकेचे  उत्पादनाचे साधन हे शेती आहेकाळाच्या ओघात  भारतीय शेती  शेती व्यवसायात आमुलाग्र बदल होत गेलेशेतीमध्ये महत्वाचा घटक म्हणजे माती होयपिकांच्या वाढिसाठी मातीमध्ये अन्नदव्यांची आवश्यकत असतेमातीमध्ये आवश्यक अन्नद्रव्य कमी असल्यास पिकांची वाढ होत नाही परिणामी उत्पादनात घट होतेजमिनीत पिक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्यांची कमरता आहे हे माती परिक्षणामुळे कळतेजमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जमीन नापिक झाल्यामुळे शेतीतील उत्पादन कमी होतेमाती परिक्षणामुळे उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण,कमरता असलेली अन्नद्रव्ये इत्यादीचे निदान होवून कोणते खत जमीनीसाठी फायदेशीर आहे याची माहिती होतेमाती परिक्षणामुळे जमिनीा सामू,विद्राव्य क्षारांचे प्रमाण,सेंद्रिय कर्ब,उपलब्ध नत्र,स्फुरद आणि पालाश तसेच लोह,जस्त,तांबे आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परिक्षणाची गरज असते.माती परिक्षणानुसार योग्य खतांचा वापर केल्यामुळे उत्पादन वाढ होते तसेच जमिनीची सुपिकता काय टिकण्यासाठी सुध्दा मदत होतेविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी संवादिनी ग्रुपमध्ये श्वेता बोर्डे,निकिता खपके,दिक्षा भगत,रूपाली गवई,मनिषा सोनुने,स्वाती उबरहंडे,शुभांगी मापारी,साक्षी दुतंडे या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा.मंगेश जकाते,प्रा.डॉ.भानुदास भोंडे यांचे  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी संवादिनी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी मेहकर तालुक्यातील पिंपळगाव  उंडा येथील शेतकरी बांधवांना माती परिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी माती परिक्षण प्रात्यक्षिक करून दाखविलेयावेळी कृषी संवादिनी ग्रुपच्या विद्यार्थींनी मातीचा नुमना घेण्याची पध्दत,नमुना घेतांना घ्यायची काळजी यासंबधी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलेयावेळी परिसरातील शेतकरी बांधव  मोठया संख्येने उपस्थित होते.

असा घ्यावा मातीचा नमुना
माती परिक्षणासाठी माती नमुना घेतांना पिक काढल्यानंतर किंवा शेतात खत दिल्यानंतर तीन महिन्यानंतर घ्यावामाती परिक्षणासाठी फक्त अर्धा किलो मातीचा नुमना घ्यावामाती नमुना घेतांना इंग्रजी अक्षराच्या व्ही आकराचा जमिनीमध्ये खड्डा १५ सेमी खोल व्ही आकाराचा खड्डा खोदावाखड्डाच्या एका बाजूची माती  घ्यावीत्या मातीची जाडी  ते  सेमी असावीप्रत्येक भागातून सुमारे १५ ठिकाणचे मातीचे नमुने घ्यावेमातीच्या नमुन्यामध्ये काडी कचरा असल्यास बाजूला करावेमाती स्वच्छ पोत्यात भरावी एकत्र करावे या सर्व मातीचे चार भाग करून समोरा समोरचे दोन भाग चांगले एकत्र करून अर्धा किलो माती परिक्षणासाठी घ्यावी.

माती परीक्षणाचे फायदे
माती परिक्षणामुळे उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण,कमरता असलेली अन्नद्रव्ये इत्यादीचे निदान होवून कोणते खत जमीनीसाठी फायदेशीर आहे याची माहिती होतेमाती परिक्षणामुळे जमिनीा सामू,विद्राव्य क्षारांचे प्रमाण,सेंद्रिय कर्ब,उपलब्ध नत्र,स्फुरद आणि पालाश तसेच लोह,जस्त,तांबे आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परिक्षणाची गरज असते. माती परिक्षणानुसार योग्य खतांचा वापर केल्यामुळे उत्पादन वाढ होते तसेच जमिनीची सुपिकता काय टिकण्यासाठी सुध्दा मदत होते.

माती परिक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी माती परिक्षण करणे गरजेचे आहेमाती परिक्षणामुळे अन्नद्रव्याच्या कमतरेची माहिती मिळते.परिसरातील शेतकरी बांधवांना माती परीक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी आम्ही माती परीक्षण प्रात्यक्षित करून दाखविले.
                                    निकिता खपके, विद्यार्थीनी विवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा