उमलत्या कळयांनी घेतला हसत खेळत शिक्षणाचा आनंद


बालमनावर नैतिकता,निर्भीडपणा,प्रामाणिकता,सत्याचरण चारित्र्यसंपन्न आदर्श जीवनाची परीपाक या सारख्या नीतीमूल्यांचे बिजारोपनाची रूजवणूक करण्यासाठी कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाने दि. जून ते २१ जून पर्यंत विवेकानंद ज्ञानपीठात बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात मुलांना निसर्गरम्य वातावरण,तणावमुक्त शिक्षण पध्दतीत शिकविले जाते. विवेकानंद आश्रमाने आयोजित केलेल्या शिबीरात बालगोपालांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मुलांना मिळून मुलांचे भावविश्व समृध्द केले जात आहेविद्यार्थ्यांना या बालसंस्कार शिबीराच्या माध्यमातून परिसर,पर्यावरण,समाज स्वावलंबन या विषयाचे भाव येऊन बांधिलकीची भावना निर्माण होवून अधिक दृढ होत आहे. विवेकानंद आश्रमाने आयोजित केलेल्या या शिबीराला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबीरात विद्यार्थी हसत खेळत शिक्षण घेत असून त्यांचा व्यक्तीमत्व विकास होत आहे. या बालसंस्कार शिबीराला जून पासून प्रारंभ झाला असून २१ जून ला समारोप करण्यात येणार आहे. या बालसंस्कार शिबीरात विद्यार्थ्यांसाठी योगासने,मंत्रोच्चार,संस्कृत सुभाषिते,इंग्रजी  संभाषण,बौध्दिक क्षमता विकास,चर्चा सत्र,मनोरंजक खेळप्रार्थना, हरीपाठ, गीतापाठ, मल्लखांब,पाऊली,स्टेज डेअरींग, संगणक प्रोजेक्टर व्दारे प्रेझेंटेशन, हस्ताक्षर सुधार प्रकल्प,अशा विविध उपक्रम  राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आतील  सुप्तकलागुणांना संधी मिळण्यासाठी या बालसंस्कार शिबीराचा मोठा फायदा होतो. प्रथमच  या शिबीरामुळे लहान मुले मोबाईल व्हीडीओ गेमच्या विश्वातून बाहेर पडून मैदानावर कुस्ती,मल्लखांब,कवायती,कथाकथन,अभिनय कौशल्य,लेझीम,कसरत,योगासने करतांना दिसत आहे. शिबीरामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण झाली आहे. या शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबीराच्या विद्यार्थ्यांना शिबीराच्या माध्यमातून जीवन जगण्याची उर्जा मिळत असल्याच्या भावना शिबीरातील शिबीरार्थी विद्यार्थ्यांनी बोलतांना सांगीतले.

या शिबीरामध्ये मुलांच्या व्यक्तीमत्व विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. बालसंस्काराच्या शिदोरीतून भावी पिढी घडविण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा सुध्दा बाह्य जगातील वास्तव ज्ञानाची गरज आहे. त्यामुळेच या शिबीरात उदयोगाभिमुख,रोजगाराभिमुख लघु प्रयोग राबविण्या येत आहे.
संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम

बालसंस्कार शिबीरास मदत
विवेकानंद आश्रमाने आयोजित केलेल्या या बालसंस्कार शिबीरास  मुर्तीजापूर येथील सुप्रसिध्द उद्योजक प्रशांत हजारी भेट दिली. यावेळी त्यांनी बालसंस्कार शिबीरासाठी २५ हजारीची देणगी दिली.

बाल संस्कार शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद,
दि. जून ते २१ जून पर्यंत विवेकानंद ज्ञानपीठात बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या आतील  सुप्तकलागुणांना संधी मिळण्यासाठी या बालसंस्कार शिबीराचा मोठा फायदा होतो.  या उन्हाळी बाल संस्कार शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद,

व्यक्तीमत्व विकासाठी विविध उपक्रम
या शिबीरामुळे लहान मुले मोबाईल व्हीडीओ गेमच्या विश्वातून बाहेर पडून मैदानावर कुस्ती,मल्लखांब,कवायती,कथाकथन,अभिनय कौशल्य,लेझीम,कसरत,योगासने करतांना दिसत आहे. शिबीरामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण झाली आहे.


संतोष थोरहाते
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा