Responsive Ads Here

सोमवार, १० जून, २०१९

डोळयाच्या विकारावर मात करीत शोधला यशाचा मार्ग!



 जीतूगा मै यह खुद से वादा करो...जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो...तकदीर भी रूठे पर हिंमत टुटे...मजबूत इतना अपना इरादा करो... या कवीतेतील ओळीप्रमाणे लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या येथील सौरभ विकास बोरे याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुुण संपादन करून उत्तुंग भरारी घेत आई वडीलांचे स्वप्न साकार करण्यात कुठलीच कुचराई केली नाही. उमलत्या वयात  उराशी यशाची स्वप्ने बघावी... यशाचा पाठलाग करतांना पावलोपावली संघर्षाशी दोन हात करण्याची तयारी ठेवावी अशा प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा दुर्दम्य इच्छा शक्ती,जिद्द  प्रयत्नाची पराकाष्ठा करीत हिवरा आश्रम येथील सौरभ विकास बोरे या विवेकानंद विद्या मंदिराच्या विद्यार्थ्याने  डोळयाच्या विकारावर मात करीत दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शिक्षण ही व्यक्तीमत्व विकासातील महत्वाची पायरी आहे.शिक्षणाने वैचारीक मानसिक विचारात आमुलाग्र बदल होतात. सौरभ बोरे या विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत ९५.६० टक्के गुण संपादन करून आपली डोळयाच्या विकावर मात करीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सौरभ बोरे हा कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिराचा विद्यार्थी आहे. सौरभचे वडील विकास बोरे हे विवेकानंद आश्रमात कार्यरत असून आई गृहीनी आहे. सौरभने सुध्दा आई वडीलांचे स्वप्नांना आकार देण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. रात्रदिवस अभ्यासाचा ध्यास घेऊन दहावीत त्याला ९५.६० टक्के गुण मिळाले. सौरभला संस्कृत विषयात १०० गुण तर गणित विषयात ९६,गणित विषयात ९६, सायन्स टेकनॉलॉजी विषयात मध्ये ९५,सोशल सायन्स विषयात  मध्ये ९४, इंग्रजी विषयात  ९३ तर मराठी विषयात ८५ गुण मिळाले आहेत. अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम,चिकाटी ध्येयाप्रती एकनिष्ठता हे आपलया यशाचे गमक असल्याचे दैनिक सकाळशी बोलतांना सांगितले. नियमीत शाळेत शिकविलेला अभ्यास,लेखन,वाचनावर भर देऊन सौरभने दहावीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुण प्राप्त केले आहे. मुळातच अभ्यासाची आवड होती.

उराशी बाळगले डॉक्टर होण्याचे स्वप्न
सौरभ बोरे या विद्यार्थ्याने  लहानपणापासून आपल्याला डॉक्टर होवून रूग्णसेवेच्या माध्यमातून रूग्णांना व्याधीमुक्त करून सेवा करण्याचा त्याचा मानस आहे. सौरभला इयत्ता वी असतांना केरेटा कोनस या डोळयाच्या विकाराचा त्रास सुरू झाला. या आजारामुळे डोके दुःखीचा त्रास होत असुन सुध्दा आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहत सौरभने दहावीच्या परीक्षेत यश संपादीत करून डॉक्टर होण्याच्या आपल्या स्वप्नासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी जिद्दीने अभ्यास केला. यशाला कुटलाही शार्टकट नसल्याची पुर्व कल्पना असल्यामुळे प्रत्येक विषयाचे सखोल अध्ययन केले.यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम ध्येयपूर्ती एकनिष्ठता अत्यंत महत्वाची आहे.
सौरभ विकास बोरे,हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा