युरिया चारा उपचार पध्दती ठरते जनावरांसाठी वरदान


शेतीपूरक जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पाहतात. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शेतीसोबत दुध व्यवसायाकडे मोठया प्रमाणात कल वाढल्याचे दिसून येत आहे. शेतीसोबत दूध व्यवसायाने त्यांना मोठा आर्थिक लाभ होतो. चारा हा दुधाळ जनावरांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. सकस चा-यामुळे जनावरांचे पोषण होऊन दूध देण्याच्या क्षमतेत वाढ होते. चा-याची पौष्टिकता वाढीसाठी चारा जास्त दिवस टिकण्यासाठी चा-यावर युरिया पध्दतीने प्रात्यक्षिक विवेकानंद  कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनींनी हिवरा बु येथे शेतक-यांना करून दाखविले.
यावेळी संदीप बोरे,सखाराम दळवी,अशोक शेळके,विजय बोरे,किसन खाटोवकर,सरीता दळवी,वच्छला दळवी,शेवंताबाई गायकवाड,गोदावरी बोरे,शोभा खाटोवकर,सविता पवार  यांचे सह परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. चा-यावर युरीया उपचार पध्दतीचा वापर केल्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पोषकतत्व मिळतात. या चा-यामुळे  जनावरांच्या पोटातील नायट्रोजन हा प्रोट्रिनमध्ये रूपांतरीत होतो. तसेच कार्बोहायड्रेट लवकर पचत नसल्यामुळे युरिया चारा खाल्याने योग्य परिणाम दिसून येतो. हा चारा खाल्याने जनावरांची पचनशक्ती वाढते पचनक्रिया सुरळीत होते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या जय जिजाऊ ग्रुप हर्षा पवार,आरती उईके,दिपाली गि-हे,माधवी वाका,मानसा पोलेरू, अश्विनी इंगळे,योगिता राठोड,अश्विनी घुगे,सलोनी लड्डा,भारती नंदापुरे या विद्यार्थीनींचा ग्रुपमध्ये  समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा.मंगेश जकात  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

अशी आहे युरिया चारा उपचार पध्दती
शेतक-यांनी प्रथम १०० किलो गव्हाचे कुटार ताडपत्रीवर टाकावे. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडावे .त्यानंतर ४० लिटर पाण्यामध्ये किलो युरिया,१० किलो गुळ आणि किलो मिळ यांचे मिश्रण एकरूप होईपर्यंत हलवावे. हे मिश्रण गव्हाच्या कुटाराच्या थरा वरती फवारावे. पुन्हा एक गव्हाच्या कुटाराचा थर करून त्यावर हे मिश्रण फवारावे. हा गव्हाचा चारा २५ ते २८ दिवस झाकून ठेवावा.

दुधाळ जनावरांसाठी वरदान
युरीया उपचार पध्दतीचा वापर केल्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पोषकतत्व मिळतात. या चा-यामुळे  जनावरांच्या पोटातील नायट्रोजन हा प्रोट्रिनमध्ये रूपांतरीत होतो. तसेच कार्बोहायड्रेट लवकर पचत नसल्यामुळे युरिया चारा खाल्याने योग्य परिणाम दिसून येतो. चारा हा दुधाळ जनावरांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. सकस चा-यामुळे जनावरांचे पोषण होऊन दूध देण्याच्या क्षमतेत वाढ होते. 

वाळलेला वा-यामध्ये पोषकतत्वाचे प्रमाण कमी असते. आणि युरीया उपचारीत चा-यामध्ये पोषकतत्व जास्त प्रमाणात असते. उपचारीत चा-यामुळे दुधाची आणि वासराची वाढ झपाटयाने होते.
हर्षा पवार,विद्यार्थीनी विवेकानंद कृषी महाविद्यालय

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनी शेतकरी बांधवाना युरिया चार उपचार पद्धतीचे प्रात्यक्षित करून दाखविले. त्यांचा परिसरातील शेतक-यांना खूप लाभ होत आहे.जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनी परिसरातील शेतक-यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देत आहे.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा