विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत येथील हिवरा आश्रम येथील शेतक-यांना बीज प्रक्रिया म्हणजे काय,
बीज प्रक्रिया का करावी,बीज प्रक्रियेचे फायदे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकरी बांधवांनी बियाण्याची शेतात पेरणी करण्यापूर्वी त्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते.बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी केल्यास उत्पादन वाढीसाठी मदत मिळते. बीज प्रक्रिया केल्याने रोगजंतूचे संक्रमण होऊन बी कुजणे,अंकुरण,व्यवस्थित होत नाही.बीज प्रक्रिया केल्यामुळे रोगांचे प्राथमिक अवस्थेतच निर्मूलन झाल्याने खर्चात मोठया प्रमाणात बचत,कपात होते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थींनीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम हिवरा आश्रम येथील शेतक-यांना बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिक व महत्व पटवून दिले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुप मध्ये प्रज्ञा बागडे,जुही परचाके,
भावना सरोदे,
वैष्णवी बोर्डे,
शिवगंगा मिसाळ,
स्नेहल घुगे,
कांचन सिरसाट, निकिता
होणे, काजोल पाटील,
नितु जुनघरे या विद्यार्थीनींचा समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके, प्रा.मंगेश जकाते,
प्रा.गजानन ठाकरे,
प्रा.समाधान जाधव, प्रा.विवेक हमाने, डॉ.प्रा.भानुदास भोंडे, प्रा.पवन थोरहाते,
यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे. यावेळी नामदेव ताजने,
तुकाराम कंकाळ,
धंनजय बोकडे,
भिकेश इंगळे,
कांताबाई इंगळे यांचे सह परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वसाधरणपणे बीज प्रक्रिया म्हणजे हलके,
किडके,
रोगमुक्त,
आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून अशा बियाण्याचे रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया असे म्हणतात.
बीज प्रक्रिया
करतांना अशी घ्या काळजी
बीज प्रक्रियासाठी वापरायची औषधे सर्व बियाण्यास समप्रमाणास लागतील यावी काळजी घ्यावी. बियाण्याला कमी झाल्यास रोगापासून संरक्षण मिळत नाही किंवा जास्त झाल्यास बियाण्याला हानी पोहचते.बीज प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद किंवा प्लास्टिक पिशवीत भरू ठेवू नये. बीज प्रकिया केलेले बियाणे थंड किंवा कोरडया हवेत सावलीत २४ ते ४८ तास वाळवून घ्यावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्यामुळे बीजप्रकियेनंतर हात स्वच्छ धुवून घ्यावेत.
अशी करा बीज प्रक्रिया
सर्वप्रथम कोरडा जागेत ताडपत्री किंवापोते घेऊन बियाणे पातळ थरामध्ये प्रसरावे. त्यावर किंचित प्रमाणात पाण्याचा शिंपडा करून बियाणे ओले करावे. त्यानंतर बियाण्यास लागणा-या रासायनिक बुरशीनाशकांचे प्रमाण घेऊन ते हलक्या हाताने बियाणे चोळून अर्धा तास सुकवावे.
बीज प्रक्रियेचे
फायदे
बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीतून व बियाण्यांव्दारे पसरणा-या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. पिकांची उगवण क्षमता वाढते.पिकांची जोमदार वाढ होऊन पिकांच्या उत्पादनात वाढ होते. बीज प्रक्रिया ही घरी सहज शक्य असल्यामुळे कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक वाढ होते.
संतोष थोरहाते
बीज प्रक्रिया केल्याने रोगजंतूचे संक्रमण होऊन बी कुजणे,अंकुरण,व्यवस्थित होत नाही.बीज प्रक्रिया केल्यामुळे रोगांचे प्राथमिक अवस्थेतच निर्मूलन झाल्याने खर्चात मोठया प्रमाणात बचत,कपात होते. आम्ही कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी शेतकरी बंधूंना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कांचन सिरसाट, विवेकानंद कृषी महाविद्यालय
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा