आश्रमाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी व्हाः- अशोक थोरहाते



हिवरा आश्रम,ता.४:  स्वामीजींच्या चारित्र निर्माण करणारे शिक्षण हा शिक्षण विषयक विचार अंगी बांणलेले विवेकानंद आश्रमाच्या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतलेले हजारो तरूण आज देशभर कार्यरत आहेत त्या सर्वांनी परत एकत्र येवून संस्थेला भेट देण्याची एकमेकांप्रतीचा ॠणानुबंध घट्ट होण्याच्या दृष्टीने दि. जून रोजी विवेकानंद विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेजच्या वतीने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी केले. विवेकानंद आश्रमात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यासाठीच्या नियोजन सभेत ते मंगळवारी (ता. ४)  रोजी बोलत होते.
गेली दशके शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारा विवेकानंद आश्रम राज्यातील एक प्रतिष्ठीत सुपरिचीत संस्था आहे. विवेकानंद आश्रम समाजाच्या उत्कर्षासाठी मोठया दिमाखात उभा आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी अहोरात्र झटणारे, दीन दुःखीतांच्या जीवनात आरोग्य सेवेच्या माध्यमातून सुख समृध्दीचा मार्ग दाखविणारे निष्काम कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी १९८२ साली सुरू केलेल्या नंतर त्याला जोडून सुरू केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाने लक्षावधी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाचा मार्ग दाखविला. आज रोजी हजारो विद्यार्थी वेगवेगळया क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवून आहेत. वर्षभर विद्यार्थी वेगवेगळया कार्यक्रमाच्या निमित्ताने आश्रमाला भेट देत असतातच परंतु पहिल्यांदाच सर्व माजी विद्यार्थी एकत्रीतपणे जून ला जमा होणार असल्याचे मेळाव्याचे समन्वयक शिवदास सांबपूरे यांनी सांगीतले. मेळाव्यासाठी सर्व आजी माजी शिक्षक,संस्थेचे सर्व पदाधिकारी हजर राहणार आहेत. 


कॉमेंट बॉक्समध्ये नोंदविल्या प्रतिक्रिया
निष्काम कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांच्या समाधीच्या दर्शनाची ओढ आमच्या मनात आहे. त्यासाठी या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचे .पू.महाराजश्री आज आमचे कौतुक करायला हवे होते. एवढे सगळे विद्यार्थी एकत्रीत बघून महाराजांना अपार आनंद झाला असता अशा भावना विद्यार्थ्यांनी आश्रमाच्या वेबसाईटच्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदविल्या आहेत.
आजही वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पालकांची पहिली पसंती विवेकानंद विद्या मंदिराला असते. जून रोजी होणा-या मेळाव्यासाठी विविध समित्या गठीत केल्या असून विद्यार्थ्यांनी मित्रांशी संपर्क साधवा.
                                                         कैलास भिसडे, प्राचार्य विवेकानंद विद्या मंदिर



संतोष थोरहाते
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा