विवेकानंद आश्रमाचे सेवेचे व्रत समाजासाठी मार्गदर्शक ठरो - धर्मादाय उप आयुक्त जोशी


विवेकानंद आश्रमाचा संपूर्ण परिसर .पू.शुकदास महाराजांच्या सेवा व्रताचा,त्यागाचा  सर्मपण भावनेची साक्ष देत आहे. महाराजांचे वैद्यकिय सेवेचे  शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. महाराजानंतर तेवढयाच निष्ठेने  जोमाने हे कार्य सुरू आहे हे पाहून समाधान वाटते. संस्थेचे हे सेवेचे व्रत असेच समाजासाठी मार्गदर्शक ठरो असे भावपूर्ण उद्गार धर्मादाय उप आयुक्त गजानन जोशी यांनी विवेकानंद आश्रमास सदिच्छाभेटी प्रसंगी बुधवारी (ता.१९) काढले. मंगळवारी रात्री त्यांचे आश्रमात आगमन झाले. यावेळी कार्यकारी मंडळाने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सकाळी  वाजता त्यांनी .पू.महाराजांचे निवाससमाधीस्थळगोशाळा तसेचविविध शैक्षणिक संस्था  सर्व सेवा उपक्रमांना भेट दिली. स्वामी विवेकानंदांना दारिद्रय नारायणाची सेवा अपेक्षीत होती. मानवाच्या रूपात उभा असलेला हा नारायण केवळ सत्पुरूषांना कळतो  त्याची सेवा हाच परम धर्म ठरतो.माणसाला रोगमुक्तअज्ञानमुक्तअंधश्रध्दामुक्तअहंकारमुक्त करणारी ठिकाणे समाजाच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक असतात अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्ती केली. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी वकार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
वस्तीगृहामुळे ग्रामीण मुलींना शिक्षणाच्या संधी
संस्थेच्या शारदा माता मुलींचे वसतीगृह पाहून मुलींसाठी अत्यंत सुरक्षित  मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे हे वसतिगृह भविष्यात ग्रामीण भागातील असंख्य मुलींच्या जीवनात क्रांती घडवणून आणणारे ठरेल अशाभावना व्यक्त यावेळी बोलतांना व्यक्त केल्या.

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा