बळीराजाची शेतीपयोगी अवजारे बनविण्यासाठी लगबग

 गेल्या आठवडयापासून शेतकरी चाचका प्रमाणे पावसाची वाट पाहत होता. हिवरा आश्रम परिसरातील शेती मशागतीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. पावसाळयाने हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेती उपयोगी अजवारे बनविण्याची घाई तो करीत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने बळीराजा पेरणीसाठी आवश्यक असणारी शेतीपयोगी अवजारे, बनविण्याच्या कामात व्यक्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सुतार लोहार कारागिरांकडे शेती उपयोगी साहित्य बनविण्याचा ओघ मोठया प्रमाणात वाढला आहे.
शेती मशागती बरोबरच शेतीपयोगी वस्तू अवजारे बनविण्याचा वेग आला आहे. हायटेक शेतीमुळे शेतक-यांचे आर्थिक  जीवनमान उंचावले असेल  तरी आंतरमशागत, डवरणी, निंदणी , खत टाकणे आदि किरकोळ कामे शेतक-यांना विनायंत्रानेच करावी लागतात. त्यामुळे वखरी पास, कोळपणी पास, विळा, खुरपे, कुèहाड, टिकास, फावडे दुरूस्तीसाठी शेतकरी लोहाराकडे फेèया मारतांना दिसत आहेत. त्याशिवाय शेती अवजारे वखर,डवरे,पेरणीची तिफन,चाडे आदी अवजारे बनविण्यासाठी शेतकरी सुताराकडे येत आहेत. काळाच्या ओघात बाराबलुतेदार व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी येत असली तरी नसल्यापेक्षा  बरे या भावनेने अनेक कारागिर पिढीजात व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात सुतारी लोहारी व्यवसायाला घरघर लागली असली तरी पेरणींच्या काळात मात्र या व्यावसायिकांकडून काम करून घेण्याकडे शेतकèयांचा ओघ असतो. पूर्वी बलुते म्हणून वर्षभर कामाचा मोबदला एक पायली धान्य शेतकरी देत असत.

ग्रामीण कारागिरांकडे कामांचा ओघ
वखरी पास, कोळपणी पास, विळा, खुरपे, कु-हाड, टिकास, फावडे दुरूस्तीसाठी शेतकरी लोहाराकडे फे-या मारतांना दिसत आहेत. त्याशिवाय शेती अवजारे वखर,डवरे,पेरणीची तिफन,चाडे आदी अवजारे बनविण्यासाठी शेतकरी सुताराकडे येत आहेत.

सध्या बखराची पास,कोळपणी पास,कुदळ,विळा,खुरपे,कुèहाड  इत्यादी अवजाराने बनविण्याचे काम जोमात सुरू आहे. लोहारी व्यवसायासाठी कोळसा प्रामुख्याने कोळसा लागत असून कोळशाचे भाव वाढले आहेत. त्याचा व्यवसायावर परिणाम होत असला तरी पोटासाठी कमी नफ्यात हा व्यवसाय करावा लागत आहे.
                                    राजाराम पवार लोहार कारागीर हिवरा आश्रम

सुतारी व्यवसायात काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. दिवसेंदिवस लाकडाची कमतरता असल्याने शेती अवजारे ही लोखंडी बनविण्याचा कल वाढत आहे. तरी सुध्दा अनेक शेतकरी लाकडी शेती अवजारांना प्राधान्य देतात. सध्या शेती अवजारे बनविण्याच्या कामाला गती आली आहे.
                                      जगन्नाथ इंगळे सुतार कारागीर अंत्री देशमुख

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा