नॅशनल अवॉर्डने डॉ नारायण आंभोरे सन्मानित


रूग्णसेवेच्या माध्यमातून हजारो ग्रामीण तसेच शहरी रूग्णांना व्याधीमुक्त करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे डॉ.नारायण आंभारे यांना नॅशनल अवॉर्डने पुरस्काराने भोपाळ येथे सन्मानित करण्यात आले.
भोपाळ येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात डॉ.नारायण आंभोरे यांना मिस वल्र्ड सेफअली शर्मा,जेष्ठ चित्रपट अभिनेत निर्माते गुलशन अहमद खान व मध्यप्रदेश सहाय्यक पोलीस महासंचालक डि.सी सागर यांच्या हस्ते शुक्रवार ता.७ जून रोजी शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह,आणि प्रमाणपत्र देवून यावेळी गौरविण्यात आले. 
शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाèया व्यक्तीचा भोपाळ येथील नॅशनल अँटी हर्रासमेंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी नॅशनल अवॉर्ड देवून सन्मान करण्यात येतो. यावर्षी देशभरातून नाममात्र ५४ व्यक्तींना हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये डॉ. अंभोरे यांचा समावेश आहे. डॉ. नारायण अंभोरे हे मागील दहा ते बारा वर्षापासून अ‍ॅक्युपंचर, अ‍ॅक्युप्रेशर, योगा व निसर्गाेपचाराच्या माध्यमातून रुग्णांची अत्यल्प दरात सेवा करीत आहेत. आतापर्यत त्यांनी विना शस्त्रक्रीया लाखो रुग्णांना दुर्धर आजारातून मुक्त केले आहे. विशेष म्हणजे आठवडाभर विविध शहरात जावून ते रुग्णांवर उपचार करीत आहेत. रुग्ण सेवेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना नॅशनल अवॉर्ड जाहिर करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.नारायण आंभोरे यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

दुर्धर व्याधीतुन रूग्णांची मुक्तता
ग्रामीण तसेच शहरी भागातील रूग्णांची अल्पदरात रूग्णसेवेचे व्रत डाॅ.नारायण आंभोरे यांनी सुरू केले आहे. त्यांच्या उपचार पध्दतीचा हजारो रूग्णांना लाभ होवन त्यांना व्याधीमुक्ततेचा आनंद मिळत आहे. डाॅ.नारायण आंभोरे यांनी आपल्या रूग्णसेवेतून विना शस्त्रक्रिया लाखो रूग्णांना दुर्धर आजारातून व्याक्तीमुक्त केले आहे.

रूणसेवेला एक तपपूर्ती
हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयातून आपल्या रूग्णसेवेची सुरू करून रूग्णसेवेचा वसा घेतलेले डाॅ. नारायण आंभोरे नाव आता सुर्वदूर सुपरिचित झाले आहे. अल्पदरात रूग्णांची रूग्णसेवा ते करीत आहे.अॅक्युपंचर,अॅक्युप्रेशर,योगा व निसर्गोपचाराच्या माध्यमातून रूग्णांना व्याधीमुक्त करीत आहे. डाॅ.नारायण आंभोरे यांच्या रूग्णसेवेला 12 वर्ष पूर्ण झाले आहे.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा