Responsive Ads Here

शनिवार, १ जून, २०१९

बालसंस्कार शिबीरातून आदर्श व्यक्तीमत्वाची पायाभरणी-हभप येवले शात्री महाराज

महापुरूषांच्या विचारांचे अनुकरण केल्यास जीवन आनंददायी होते. महापुरूषांच्या विचारात जीवनात आमुग्र बदल करण्याची अद्भूत शक्ती आहे. बालसंस्कार शिबीरातून आदर्श व्यक्तीमत्वाची पायाभरणी होत असल्याचे विचार हभप निवृत्तीनाथ येवले शास्त्री महाराज यांनी बालसंस्कार शिबीरातील शिबीरार्थी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाने आयोजित २१ दिवशीय बालसंस्कार शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी शनिवार ता. रोजी ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती शिंदे  तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,योगशिक्षक नाना इंगळे,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,रणजीत जाधव,विजय गोरे ,प्रतिक्षा डाखोरे तथा आदि उपस्थित होते. विद्यार्थ्यांना साचेबंद जीवनशैलीतून बाजूला काढून त्यांच्यातील सुप्तगुणांना संधी मिळण्यासाठी संस्कार शिबीराचा मोठा फायदा होतो. मुलांच्या हातातील मोबाईल आणि व्हीडीओ गेम दूर करण्यासाठी त्याला मैदानाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. ही पिढी बौध्दीक दृष्टया अत्यंत तेज असून संस्काराचे बीजारोपन झाल्यास उत्तम व्यक्तीमत्व होवून ते यशस्वी होवू शकतात असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना काढले. या शिबीरातून विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे प्रशिक्षण,संगीत,अभिनय इत्यादी कलांचा परिचय करून देण्यात येणार असून सकाळी वाजता सुरू होणा-या शिबीरात योग प्राणायामापासून कुस्ती मल्लखांब,हस्ताक्षर सुधार,गीतापाठ इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे. पहिल्याच दिवशी शिबीरात ७० मुलांची उपस्थिती असून निवासी विद्याथ्र्यांची उत्तम व्यवस्था केली जाणार असल्याचे आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य  पंढरीनाथ शेळके तर आभार प्राचार्य  निवृत्ती शिदे यांनी मानले.

संतोष थोरहाते

पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा