जनावराच्या आजार प्रतिबंधासाठी लसीकरणाची गरज

पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार उदभवतात.  या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जनावरांचे लसीकरण  करणे महत्वाचे आहेग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना जनावरांच्या आजारा बाबत माहिती होण्यासाठी दृष्टी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थींनीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम हिवरा आश्रम येथील शेतक-यांना लसीकरणाचे महत्व पटवून दिलेविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुप मध्ये प्रज्ञा बागडे,जुही परचाके,भावना सरोदे,वैष्णवी बोर्डे,शिवगंगा मिसाळ,स्नेहल घुगे,कांचन सिरसाट,काजोल  पाटील,नितु जुनघरे  या विद्यार्थीनींचा समावेश आहेविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडकेप्रा.मंगेश जकातेप्रा.मिनाक्षी कडू, डॉ.प्रा.भानुदास भोंडेपर्यवेक्षक डॉ.सुनिल देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे.  शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात पशूंचे पालन करतोपशुधन संगोपनाचा त्याला जोडधंदयासाठी मोठया प्रमाणात उपयोग होतोग्रामीण भागातील शेतक-याला पशूच्या आजाराबाबत माहिती नसल्यामुळे तो जनावरांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतोशेतक-यांनी जनावरे आजारी असल्यास त्यांचा शेती कामावर सुध्दा परिणाम होतोदुधाळ जनावर आजारी असल्यास त्याचा दुध उत्पादनावर परिणामी दुध व्यवसायात तोटा सहन करावा लागतोविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थींनी परिसरातील  शेतक-याना लसीकरणाचे महत्व यावेळी पटून दिले.

पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प,फऱ्या,पायलाग यांसारखे संसर्गजन्य आजार होतातदमट वातावरणात घटसर्पासारखे श्वसनाचेआजार जास्त प्रमाणात दिसून येतात .या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होतेखालच्या जबड्याखाली सूज येतेश्वासोच्छ्वास करायला त्रास होतो,जनावरांस  १०४ ते १०५ अंश फॅरेनहाईट ताप येतोसंसर्ग झालेल्या जनावरांपैकी ९० टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात.

प्रप्रतिबंधात्मक उपाय
पावसाळ्याच्या सुरवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस टोचावी. त्याच प्रमाणे फऱ्या,पायलाग,काळरोग, धनुर्वात याही आजारावर लसीकरण करून घ्यावे.

जनावरांच्या आरोग्यासाठी लसिकरणाची गरज
पावसाळयात जनावरांना होणाèया रोगापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी जनावरांना लसिकरण करणे अत्यंत आवश्यक असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करण्यात येते. दरवर्षी पावसाळया आधी मे किंवा  जून महिन्यामध्ये जनावरांना लसीकरण करणे आवश्यक असते.

शेती पशूधन यांचे अतूट नाते आहे.पशूधनाशिवाय शेतीकरणे कठीण आहे. पशूधनापासून मिळणाèया उत्पान्नात वाढ करण्यासाठी जनावरांचे लसीकरण करणे गरजेचे असते. नियमीत जनावरांचे लसीकरण केल्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
                                                                   प्रा.मिनाक्षी कडू, विवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा