Responsive Ads Here

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

विवेकानंद नगरी ते ब्रम्हतीर्थ रथयात्रेचे उत्स्फुर्त स्वागत



कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांनी वसविलेल्या वाशिम जिल्ह्यातील भौरद (ब्रम्हतीर्थ) या दुर्गम आदिवासी खेड्यात कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित भगवान मल्लिकेश्वर पूजनोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा झाला. यानिमित्त हिवरा आश्रम ते भौरद अशी भव्य रथयात्रा काढण्यात आली. जय ब्रम्हरूपा...जय ब्रम्हरूपा... जय विवेकानंद...जय विवेकानंद...स्वामी शुकदास माऊली की जय... च्या गगनभेदी घोषणांनी पंचक्रोशी निनादून गेली. रथयात्रेचे प्रवासादरम्यान ठिकठिकाणी रथयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी शुकदास माऊलींच्या रथारूढ मुर्तीचे पूजन करून औक्षण केले. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास विवेकानंद आश्रमाच्या प्रवेशव्दार विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले,अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या मुर्तीचे पुजन करून रथयात्रेला सुरूवात  करण्यात आली. ही रथयात्रा ब्रम्हपूरी फाटा येथे आली असता संजय म्हस्के,सतिष म्हस्के यांनी पुजन केले. नागझरी येथे सरपंच सौ.संगीता देवकर, कैलास गोलाईत व ग्रामस्थांनी तर मेहकर नगरीत शिवचंद्र मित्र मंडाळाचे विनोद भिसे, नंदकिशोर बंगाळे, हभप भागवत भिसे, माजी उपसभापती बबनराव तुपे, नगरसेवक रामेश्वर भिसे,माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर , मोहनसेठ राठी,दिलीप शर्मा,भाजपच्या जेष्ठ नेत्या मंदाकिनी कंकाळ,नरेंद्र वक्काणी,गजानन तिफणे,प्रदीप जोशी,पंकज हजारी,डॉ.सुभाष लोहिया,अशोक नाहार तर पोलीस स्टेशन समोर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने,ठाणेदार प्रधान,लोढे तर खासदार,आमदार यांच्या संपर्क कार्यालयासमोर युवासेनेचे जिल्हाध्यक्ष ॠषीकेश जाधव,निरज रायमूलकर तर जीजाऊ चौकात मराठा सेवा संघाच्या वतीने अशोक तुपकर,काटे ठेकेदार,देशमुख बापू तर जानेफळ चौकात सेवा निवृत्त कृषि अधिकारी दत्तात्रय लहाने,शिवसेना शहरप्रमुख जयचंद भाटिया यांनी पूजन केले. तर डोणगांव रोडवर जगदंबा हार्डवेअरचे संचालक रतनपाटील मानघाले यांनी भाविकांना चहा व नाष्टा दिला. तर गजानन महाराज मंदिरावर शामभाऊ उमाळकर यांनी रथयात्रेच्या सोबत असलेल्या मान्यवरांचे स्वागत करून चहापाण्याची व्यवस्था केली. तर जेष्ठ पत्रकार सिध्देश्वर पवार यांनी देखील रथयात्रेचे स्वागत केले.

आदिवासी बांधवांच्या भावना आनंदल्या!
गावातील संत शुकदास महाराज भजनी मंडळाच्या भजनसंगतीत ही रथयात्रा भौरदकडे मार्गस्थ झाली. आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत, हभप गजाननदादा शास्त्री महाराज, विश्वस्त  प्रशांत हजारी,नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,संजय भारती,शिवदास सांबपूरे,दयानंद थोरहाते यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त तसेच यांच्यासह ग्रामस्थांची या रथयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

रथयात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत
या रथयात्रेचे डोणगाव येथे माजी मंत्री सुबोध सावजी,ज्येष्ठ नेते केशवराव आखाडे,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पळसकर,डॉ.गजानन उल्हामाले यांनी या यात्रेचे स्वागत करून भाविकांना चहापान दिले.  मल्लिकेश्वर पूजन व शुकदास महाराजांच्या मुर्ती पूजनानंतर हजारो भाविक-भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. रिसोडचे आमदार अमित झणक यांनीही या सोहळ्यास हजेरी लावून महाराजश्रींचे पूजन करत दर्शन घेतले.

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८



बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८

जन्मदिनाच्या मनस्वी शुभेच्छा एका आनंदीयात्रीला !


आयुष्य हे कुण्याच्या उपदेशाने,सल्लाने समृध्दी आनंदी करता येत नाही तर आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच आपल्या आयुष्यात आनंदाची,सुखाची मैत्रीची उधळण करीत असतो. संघर्षांच्या वाटेवर चालण्याचे धाडस कठीण परिस्थिती सुध्दा धैर्य ज्याच्या उरी असते तो आयुष्याची प्रत्येक लढाई यशस्वीपणे लढू शकतो.
''किसी की मुस्कुराहटों पे हो निसार 
किसीका दर्द मिल सके तो ले उधार 
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार 
जीना इसी का नाम है ...''
राज म्हणजे एक आनंदी प्रसन्न व्यक्तीमत्व...प्रसन्न हसतमुख चेहरा...सळसळत्या उत्साहाने कोणतेही काम तडीस नेणारा...सुखात सहभागी होणारा दुखात मदतीला धावून जाणारा...आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची अवगत करण्याची सतत कायम उर्मी असणारा ...माणुसकी जपणार हलव पण तितकच संवेदनशील व्यक्तिमत्व...एक सृजनशील छायाचित्रकार...दृश्याला टिपतांना प्रकाश नियोजना सोबत लाईट,हायलाईट अचूक वेळेचे भान यामुळे तुझ्या छायाचित्राला लाभेलेली वेगळेपणाची किनार तुझ्यातील प्रतिभा,सौंदर्यदृष्टीचा परिचय करून देते... आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतीलच असे नाही,परंतु काही क्षण कायम स्मृतीपटला वरती कोरल्या जातात...ते क्षण विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. आजच्या दिनीचा तुझा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक सुखद,आनंदाचा,हर्षाचा क्षण...हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. आमच्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक "उत्सव " होऊ जावा हिच मनोकामना... वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा...!!!

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

फटाक्यांची आतिषबाजी हानीकारकच !



दिवाळी सण हा माणासाला अंधाराकडून प्रकाशाकडे अर्थात अज्ञानाकडे नाची शिकवण देणारा आहे. ज्ञानाने अज्ञानावार तर प्रेमाने घृणेवर विजय मिळविण्याची शिकवण देणारा हा सण म्हणजे दिवाळी... दिवाळी सणाच्या निमित्ताने माणसाच्या मनाला आनंदाचे उधान येते. विशेषतः लहानमुलांमध्ये सणा विषयी अतिशय उत्सुकता व ओढ दिसून येते.दिवाळी हा सण प्रकाशाचा...रंगोळीच्या रेखीव रंगछटांनी अंगाला आलेले सौंदर्य....मनामनात हर्षोल्हास सगळ कसं आनंददायी करून जातं...दिवाळी आली म्हणजे असाच अत्यानंद कोवळया बालगोपालांना झाला नाही तर नवल! दिवाळी नवनवीन कपडयांची खरेदी,मिठाईची रेलचेल व सोबत फटाक्यांची धमालमस्तीने सर्व बालगोपाल सुखावून दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहतात. दिवाळीचा सण आला की बाजारपेठत फटाके विक्रीची दुकाने थाटू लागतात. दिवाळी म्हटली की फटाके हे जणू समीकरण झाले आहे. दिवाळीत फटाके फोडून उत्साह,आनंद व जल्लोष व्यक्त केला जातो. परंतु कुठल्याही गोष्टीला एका मर्यादेपर्यंत सिमीत ठेवण्यात खरा आनंद असतो. कुठल्याही अतिरेक हा दुःखदायक,वाईट असतो. काही गोष्टीचे तोटे हळूहळू जाणू लागतात. महाराष्ट्र राज्यात दरवर्षी फटाक्यामुळे अनेक चिमुकल्यांना आपले प्राण गमावे लागतात. पालकांनी दिवाळीत आपल्या मुलांच्या हाती फटाके द्यावेत का? लहान मुले फटाके फोडतांना पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती गरज आहे. आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रदुषण मुक्त दिवाळीसाठी फटाक्याचा वापर टाळा बाबत जनजागृती करण्यात येत आहे. फटाक्याचा वापराने पर्यावरणाचा -हास होता. फटाक्यांचा वापर खूपच वाढला व त्यापासून होणा-या उपद्रवात वाढ झाली आहे.फटाक्यापासून ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण होते. ही दोन्ही प्रदूषण माणसाच्या आरोग्यासाठी,स्वास्थासाठी तितकीच हानिकारक आहे.

फटका प्रदूषणाबाबत प्रबोधनाची गरज
दिवाळी फटाके फोडण्यामुळे कोणते तोटे होतात याबाबत अजून सुध्दा पाहिजे त्याप्रमाणात जनजागृती झाल्याचे दिसून येत नाही. फटाक्यांच्या आवाजाने बालके आणि लहान मुले झोपेत दचकतात. मोठय़ा फटाक्यांच्या दणक्याने व दीर्घकाळ चालणा-या फटाक्यांच्या आवाजाने प्रौढ माणसाच्याही कानांना इजा होऊ शकते आणि बहिरेपणाही येऊ शकतो. मोठय़ा माणसांना असा हानिकारक त्रास होऊ शकतो तर लहान मुले आणि बालकांना किती धोका पोहोचू शकतो, याची कल्पना केलेली बरी. फटाक्यांमुळे त्रासदायक ध्वनिप्रदूषणच होते, असे नाही तर आरोग्याला हानिकारक असे वायुप्रदूषणही होते. फटाके फोडण्यामुळे होणा-या दुष्परिणामाची दाहकता जनतेच्या मनावर बिंबविण्याची गरज आहे.

आरोग्यासाठी फटाके हानीकारक
फटाक्यांमुळे कार्बनडाय ऑक्साइड, सल्फरडाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, फॉस्फरस यांसारखे विषारी वायू हवेत मिसळतात.या प्रदूषित हवेमुळे माणसाच्या आजारांचे मोठया प्रमाणात वाढ होते. या वायुप्रदूषणामुळे आधीच आजारी असलेल्या रुग्णांना, विशेषत: दमा व श्वसनाचे विकार असलेल्यांचा विकार बळावतो. दिवाळीत सर्दी, खोकला आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांची दवाखान्यात संख्या वाढलेली असते. दिवाळी आणि दिवाळीनंतर केलेल्या पाहणीत दमा व श्वसनाचे विकार वाढलेल्यांची संख्या खूप असते, असे आढळून आले आहे.

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८