कर्मयोगी संत प.पू.
शुकदास महाराज यांनी वसविलेल्या वाशिम जिल्ह्यातील भौरद (ब्रम्हतीर्थ) या दुर्गम आदिवासी
खेड्यात कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित भगवान मल्लिकेश्वर पूजनोत्सव अत्यंत उत्साही
वातावरणात साजरा झाला. यानिमित्त हिवरा आश्रम ते भौरद अशी भव्य रथयात्रा काढण्यात आली.
जय ब्रम्हरूपा...जय ब्रम्हरूपा... जय विवेकानंद...जय विवेकानंद...स्वामी शुकदास माऊली
की जय... च्या गगनभेदी घोषणांनी पंचक्रोशी निनादून गेली. रथयात्रेचे प्रवासादरम्यान
ठिकठिकाणी रथयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी शुकदास माऊलींच्या रथारूढ
मुर्तीचे पूजन करून औक्षण केले. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास विवेकानंद आश्रमाच्या
प्रवेशव्दार विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले,अध्यक्ष आर.बी.मालपाणी
यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या मुर्तीचे
पुजन करून रथयात्रेला सुरूवात करण्यात आली.
ही रथयात्रा ब्रम्हपूरी फाटा येथे आली असता संजय म्हस्के,सतिष म्हस्के यांनी पुजन केले.
नागझरी येथे सरपंच सौ.संगीता देवकर, कैलास गोलाईत व ग्रामस्थांनी तर मेहकर नगरीत शिवचंद्र
मित्र मंडाळाचे विनोद भिसे, नंदकिशोर बंगाळे, हभप भागवत भिसे, माजी उपसभापती बबनराव
तुपे, नगरसेवक रामेश्वर भिसे,माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर , मोहनसेठ राठी,दिलीप शर्मा,भाजपच्या
जेष्ठ नेत्या मंदाकिनी कंकाळ,नरेंद्र वक्काणी,गजानन तिफणे,प्रदीप जोशी,पंकज हजारी,डॉ.सुभाष
लोहिया,अशोक नाहार तर पोलीस स्टेशन समोर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने,ठाणेदार
प्रधान,लोढे तर खासदार,आमदार यांच्या संपर्क कार्यालयासमोर युवासेनेचे जिल्हाध्यक्ष
ॠषीकेश जाधव,निरज रायमूलकर तर जीजाऊ चौकात मराठा सेवा संघाच्या वतीने अशोक तुपकर,काटे
ठेकेदार,देशमुख बापू तर जानेफळ चौकात सेवा निवृत्त कृषि अधिकारी दत्तात्रय लहाने,शिवसेना
शहरप्रमुख जयचंद भाटिया यांनी पूजन केले. तर डोणगांव रोडवर जगदंबा हार्डवेअरचे संचालक
रतनपाटील मानघाले यांनी भाविकांना चहा व नाष्टा दिला. तर गजानन महाराज मंदिरावर शामभाऊ
उमाळकर यांनी रथयात्रेच्या सोबत असलेल्या मान्यवरांचे स्वागत करून चहापाण्याची व्यवस्था
केली. तर जेष्ठ पत्रकार सिध्देश्वर पवार यांनी देखील रथयात्रेचे स्वागत केले.
आदिवासी बांधवांच्या
भावना आनंदल्या!
गावातील संत शुकदास
महाराज भजनी मंडळाच्या भजनसंगतीत ही रथयात्रा भौरदकडे मार्गस्थ झाली. आश्रमाचे उपाध्यक्ष
अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत, हभप गजाननदादा
शास्त्री महाराज, विश्वस्त प्रशांत हजारी,नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य
पंढरीनाथ शेळके,संजय भारती,शिवदास सांबपूरे,दयानंद थोरहाते यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त
तसेच यांच्यासह ग्रामस्थांची या रथयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रथयात्रेचे ठिकठिकाणी
उत्स्फुर्त स्वागत
या रथयात्रेचे डोणगाव
येथे माजी मंत्री सुबोध सावजी,ज्येष्ठ नेते केशवराव आखाडे,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र
पळसकर,डॉ.गजानन उल्हामाले यांनी या यात्रेचे स्वागत करून भाविकांना चहापान दिले. मल्लिकेश्वर पूजन व शुकदास महाराजांच्या मुर्ती
पूजनानंतर हजारो भाविक-भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. रिसोडचे आमदार अमित झणक
यांनीही या सोहळ्यास हजेरी लावून महाराजश्रींचे पूजन करत दर्शन घेतले.
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा