दिवाळी सण हा
माणासाला अंधाराकडून प्रकाशाकडे अर्थात अज्ञानाकडे नाची शिकवण देणारा आहे.
ज्ञानाने अज्ञानावार तर प्रेमाने घृणेवर विजय मिळविण्याची शिकवण देणारा हा सण
म्हणजे दिवाळी... दिवाळी सणाच्या निमित्ताने माणसाच्या मनाला आनंदाचे उधान येते.
विशेषतः लहानमुलांमध्ये सणा विषयी अतिशय उत्सुकता व ओढ दिसून येते.दिवाळी हा सण
प्रकाशाचा...रंगोळीच्या रेखीव रंगछटांनी अंगाला आलेले सौंदर्य....मनामनात
हर्षोल्हास सगळ कसं आनंददायी करून जातं...दिवाळी आली म्हणजे असाच अत्यानंद कोवळया
बालगोपालांना झाला नाही तर नवल! दिवाळी नवनवीन कपडयांची खरेदी,मिठाईची
रेलचेल व सोबत फटाक्यांची धमालमस्तीने सर्व बालगोपाल सुखावून दिवाळी सणाची
आतुरतेने वाट पाहतात. दिवाळीचा सण आला की बाजारपेठत फटाके विक्रीची दुकाने थाटू
लागतात. दिवाळी म्हटली की फटाके हे जणू समीकरण झाले आहे. दिवाळीत फटाके फोडून
उत्साह,आनंद व जल्लोष व्यक्त केला जातो. परंतु कुठल्याही
गोष्टीला एका मर्यादेपर्यंत सिमीत ठेवण्यात खरा आनंद असतो. कुठल्याही अतिरेक हा
दुःखदायक,वाईट असतो. काही गोष्टीचे तोटे हळूहळू जाणू
लागतात. महाराष्ट्र राज्यात दरवर्षी फटाक्यामुळे अनेक चिमुकल्यांना आपले प्राण
गमावे लागतात. पालकांनी दिवाळीत आपल्या मुलांच्या हाती फटाके द्यावेत का? लहान
मुले फटाके फोडतांना पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती गरज आहे. आज
सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रदुषण मुक्त दिवाळीसाठी फटाक्याचा वापर टाळा बाबत
जनजागृती करण्यात येत आहे. फटाक्याचा वापराने पर्यावरणाचा -हास होता. फटाक्यांचा
वापर खूपच वाढला व त्यापासून होणा-या उपद्रवात वाढ झाली आहे.फटाक्यापासून
ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण होते. ही दोन्ही प्रदूषण माणसाच्या आरोग्यासाठी,स्वास्थासाठी
तितकीच हानिकारक आहे.
फटका प्रदूषणाबाबत
प्रबोधनाची गरज
दिवाळी फटाके
फोडण्यामुळे कोणते तोटे होतात याबाबत अजून सुध्दा पाहिजे त्याप्रमाणात जनजागृती
झाल्याचे दिसून येत नाही. फटाक्यांच्या आवाजाने बालके आणि लहान मुले झोपेत दचकतात.
मोठय़ा फटाक्यांच्या दणक्याने व दीर्घकाळ चालणा-या फटाक्यांच्या आवाजाने प्रौढ
माणसाच्याही कानांना इजा होऊ शकते आणि बहिरेपणाही येऊ शकतो. मोठय़ा माणसांना असा
हानिकारक त्रास होऊ शकतो तर लहान मुले आणि बालकांना किती धोका पोहोचू शकतो, याची
कल्पना केलेली बरी. फटाक्यांमुळे त्रासदायक ध्वनिप्रदूषणच होते, असे
नाही तर आरोग्याला हानिकारक असे वायुप्रदूषणही होते. फटाके फोडण्यामुळे होणा-या
दुष्परिणामाची दाहकता जनतेच्या मनावर बिंबविण्याची गरज आहे.
आरोग्यासाठी फटाके
हानीकारक
फटाक्यांमुळे
कार्बनडाय ऑक्साइड, सल्फरडाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, फॉस्फरस
यांसारखे विषारी वायू हवेत मिसळतात.या प्रदूषित हवेमुळे माणसाच्या आजारांचे मोठया
प्रमाणात वाढ होते. या वायुप्रदूषणामुळे आधीच आजारी असलेल्या रुग्णांना, विशेषत:
दमा व श्वसनाचे विकार असलेल्यांचा विकार बळावतो. दिवाळीत सर्दी, खोकला
आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांची दवाखान्यात संख्या वाढलेली असते. दिवाळी
आणि दिवाळीनंतर केलेल्या पाहणीत दमा व श्वसनाचे विकार वाढलेल्यांची संख्या खूप
असते, असे आढळून आले आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक
सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास'
विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा