आयुष्य हे कुण्याच्या उपदेशाने,सल्लाने समृध्दी व आनंदी करता येत नाही तर आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच आपल्या आयुष्यात आनंदाची,सुखाची व मैत्रीची उधळण करीत असतो. संघर्षांच्या वाटेवर चालण्याचे धाडस व कठीण परिस्थिती सुध्दा धैर्य ज्याच्या उरी असते तो आयुष्याची प्रत्येक लढाई यशस्वीपणे लढू शकतो.
''किसी की मुस्कुराहटों पे हो निसार किसीका दर्द मिल सके तो ले उधार
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है ...''
राज म्हणजे एक आनंदी व प्रसन्न व्यक्तीमत्व...प्रसन्न व हसतमुख चेहरा...सळसळत्या उत्साहाने कोणतेही काम तडीस नेणारा...सुखात सहभागी होणारा व दुखात मदतीला धावून जाणारा...आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची व अवगत करण्याची सतत कायम उर्मी असणारा ...माणुसकी जपणार हलव पण तितकच संवेदनशील व्यक्तिमत्व...एक सृजनशील छायाचित्रकार...दृश्याला टिपतांना प्रकाश नियोजना सोबत लाईट,हायलाईट व अचूक वेळेचे भान यामुळे तुझ्या छायाचित्राला लाभेलेली वेगळेपणाची किनार तुझ्यातील प्रतिभा,सौंदर्यदृष्टीचा परिचय करून देते... आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतीलच असे नाही,परंतु काही क्षण कायम स्मृतीपटला वरती कोरल्या जातात...ते क्षण विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. आजच्या दिनीचा तुझा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक सुखद,आनंदाचा,हर्षाचा क्षण...हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. आमच्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक "उत्सव " होऊ जावा हिच मनोकामना... वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा...!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा