Responsive Ads Here

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

विवेकानंद कृषीच्या अखिलची उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रोलीयात निवड

विवेकानंद कृषी महाविद्यालय  गुणवत्तायुक्त कृषी शिक्षणासाठी सुप्रसिध्द आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी देशभरातील  विद्यार्थ्यांची  इच्छा असते. अखिल रामकृष्ण गड्डे हा वेस्ट गोदावरी जिल्हयातील विद्यार्थी असून आश्रमाच्या कृषी महाविद्यालयात चार वर्षापासून कृषी पदवीचे शिक्षण घेत आहे. पदवी परीक्षा संपल्यानंतर एम.एस साठी लागणारी आय.ई.एल.एस. ही परिक्षा उत्तीर्ण केली असून अमेरीका,ऑस्ट्रोलीया या देशात प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण असे आवश्यक असते. अखिलचीे ऑस्ट्रोलीयामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ न्यु इंग्लड या महाविद्यालयामध्ये सॉईल सायन्सच्या शिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे. कृषी शिक्षणात संशोधन व्हावेग्रामीण भागातील शेतक-याला दर्जेदार सुधारीत बियाणेउच्च तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे व त्यातून ग्रामीण भारतातला शेतकरी संपन्न व्हावा हे निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांचा ध्यास होता. याच उदात्त हेतूने २००३ मध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ प.पू.शुकदास महाराजांनी रोवली. या महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. आपल्या कृषी ज्ञानाच्या साहाय्याने असंख्य विद्यार्थ्यांनी शेती उदयोगात क्रांती घडवून आणली आहे. गत वर्षी कु. लक्ष्मीदुर्गा पडीयाला विद्यार्थीनीची इटली देशात एम.एस साठी निवड झालेली आहे. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून वेगवेगळया  क्षेत्रात घवघवीत यश संपादीत करीत असल्याबद्दल कार्यकारी मंडळ व कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कृषी शिक्षणानेच कृषी समृध्दी शक्य होणार आहे. प्रशस्त इमारत,प्रयोगासाठी दिडशे एकर शेती,उच्च गुणवत्ताधारक प्राध्यापकभव्य प्रयोग शाळा व कळेपर्यंत शिकवा हा प.पू.शुकदास महाराजांचा मंत्र महाविद्यालयाच्या यशाचे रहस्य असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी सांगीतले.

शेतकरी पुत्राची उत्तुंग भरारी
अखिल रामकृष्ण गड्डे हा वेस्ट गोदावरी जिल्हयातील विद्यार्थी आहे.अखिलला लहानपणापासून अभ्यासाची गोडी असलेल्या अखिल ने विवेकानंद कृषी महाविद्यालयात आपले कृषीचे शिक्षण पूर्ण केले.अखिलचे वडील शेतकरी असून शेती हा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. अखिलने घेतलेली झेप ही इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

विवेकानंद कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून कृषी जागृती
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषीचे शिक्षण मिळावे यासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालय सुरु केले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी बांधवाना कृषी चर्चा सत्रे  व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करून शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान ची माहिती दिली जाते.



संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

पशू संगोपन व संवर्धनातून उत्कर्ष साधा- आ.डॉ. संजय रायमूलकर


निसर्गाच्या लहरीपणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतक-यांनी शेतीसोबत पशू संगोपन करून दुध व्यवसाय सुरू करावा. पशू संगोपन संवर्धनातून उत्कर्ष साधावा असे विचार  आमदार डॉ.संजय रायमूलकर यांनी विवेकानंद आश्रमात आयोजित केलेल्या गोकुळाष्टमी निमित्त गायींचे प्रदर्शन,आरोग्य तपासणी उत्कृष्ट गायींना बक्षिस वितरण या कार्यक्रमातून बोलतांना व्यक्त केले.
प्रमुख पाहूणे खा.प्रतापराव जाधव पंदेकृवि चे कार्यकारी सदस्य विनायकराव सरनाईक होते. या कार्यक्रमात परीसरातून शेकडो गोपालक आपल्या गायी या प्रदर्शनीत घेवून आले होते.या प्रदर्शनीमध्ये ७५ गायींचा सहभाग होता. या प्रदर्शनीत सुदृढ, जास्त दुध देणारी देखण्या गायीला बक्षिसे दिले जातात. कार्यक्रमाच्या सुरूवातील खा.प्रतापराव जाधव यांनी गोपूजन केले प्रदर्शनातील गायींची पाहणी करून शेतक-यांशी संवांद साधला.त्यांच्या हस्ते वृक्षारोपनही करण्यात आले
विवेकानंद कृषी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संकरीत गटात आदित्य केंदळे,अमोल आव्हाळे तर देशी गटात अरूण काळे,संदीप वाहेकर,गोपाल होणे या गोपालकांनी बक्षिसे पटकावली. यावेळी हभप एकनाथ महाराज येवले यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. या कार्यक्रमाला विवेकानंद आश्रमाचे सर्व पदाधिकारी,महाविद्यालयीन कर्मचारी,परीसरातील गोपालक बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचा समारोप महाप्रसाद वितरणाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद कृषी महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा.मिनाक्षी कडू तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी मानले.


सुदृढ गायीचे मूल्यमापन बक्षिसे
यावेळी सुदृढ गायींचे पशू वैद्यकिय चमूव्दारे गायींचे मूल्यमापन करण्यात आले. या मुल्यमापन समितीमध्ये परिक्षक म्हणून पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. रेपाळे, डॉ.शिंगणे, डॉ.मोरे, डॉ.बनकर इत्यादी होते. यांनी संकरीत गावरान गायींचे वय,आरोग्य,दूध देण्याची क्षमता इत्यादींच्या आधारे सदर मूल्यमापन केले.

गो पालक शेतकरी सन्मानित
संकरीत गावरान अशा दोन गटातून गायींच्या गोपालकांना बक्षिस वितरण करण्यात आले. संकरीत गटातून अशोक धोंडगे कंबरखेड देशी गटातून दामोधर गायकवाड बोरखेडी यांच्या गायीला प्रत्येकी एक पोते ढेप २५ लिटर कॅल्शियमची कॅन बक्षिस देण्यात आले. व्दितीय बक्षिस एकनाथ आव्हाळे सिध्देश्वर जवंजाळ यांच्या गायीला प्रत्येक पोते ढेप देण्यात आले.




संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

पर्यटकांचे आकर्षण बिंदू हिवरा आश्रमचे हरिहर तीर्थ


हरिहरतीरर्थावरील निसर्गरम्य वातावरण श्रावण महिन्यामध्ये अधिकच खुलून जाते. राज्यभरातील हजारो  पर्यटकांची पावले या हरिहर तीर्थक्षेत्राकडे वळू लागली आहेत. हरि हर या दोन्हीमध्ये भेद नाही. म्हणून वैष्णव शैवांना एकाच ठिकाणी भगवान बालाजी भगवान शिवाचे दर्शन सुलभ घेता यावे,यासाठी  कर्मयोगी संत पू  शुकदास महाराजांच्या संकल्पनेतून हरिहर तीर्थाची निर्मिती झाली. श्रावण महिना म्हटला की,व्रत,वैकल्य,अधिष्ठानाचा महिना...मनुष्याची मलिनता दूर होवून भक्तीव्दारे चैतन्याचा साक्षात्कार करणारा महिना,असे चित्र डोळयासमोर येते

हरि हराच्या दर्शनासाठी राज्यभरातून अलोट भक्तांची गर्दी श्रावण महिन्यामध्ये हरिहर तीर्थावर होते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो पर्यटक,भाविक भक्त मोठया संख्येने हिवरा आश्रम येथील श्रीक्षेत्र हरिहर तीर्थ येथे भगवान शिव भगवान बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. भल्या पहाटी निसर्गाच्या कुशीत जातांना युवा पिढीसह बच्चेकंपनीसुध्दा दंग होतात. श्रावणसरी बरल्याने हिरावा शालू परिधान केलेली वसुंधरा नयनरम्य निसर्ग पाहण्याची अनुभूती काही औरच आहे. हरिहर तीर्थक्षेत्र भक्तांच्या श्रध्देचे अतूट स्थान आहे.हरिहर तीर्थक्षेत्र येथील भगवान शिव भगवान बालाजी यांची भव्य मंदिरे आपले वेगळेपण जपत आहेत. रेखीव कलाकृती,आकर्षक रंगछटा,भिंतीवरील  भगवान बालाजींची सचित्र कथा पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते. मंदिराच्या  प्रवेशव्दावर दिमाखात उभे असलेले सिंह बाल गोपांना आकर्षीत करून जातात.

शिव पावन धारे मध्ये स्नान केल्यानंतर समोर भगवान बालाजी मंदिरात जाणा-या रस्त्यावर सुबक आणि उंच अशी कमान आहे.भगवान बालाजी मंदिर कळपापर्यंत ८१ फूट उंच असून मंदिराचे बांधकाम हेंमाडपंथी पध्दतीचे आहे.भगवान बालाजीची मूर्ती १३ फुट उंच असून असे शिल्प अन्यत्र नाही. दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जातो. शिव मंदिराच्या परकोटाच्या पाय-या चढून गेले की, सर्वप्रथम नजरेत पडते करस्थ गंगेची मूर्ती,गोमूखातून अविरत प्रवाहित होणारी पावनधारा आणि प्रशस्त गंगाकुंड.या पावन शिवधारेखाली स्नान करणा-यांच्या मनाची मलीनता दूर होते.विवेक जागृत होतो आणि भगवंताशी समिपता साधण्याची पात्रता  भाविकांच्या अंगी येते.सोमवार,अमावस्या,शिवरात्री इत्यादी प्रसंगी येथे पावनधारेखाली स्नानासाठी दर्शनासाठी रीघ लागते. 

हरिहर तीर्थ वास्तूकलेचा अव्दितीय नमुचा
हरिहर तीर्थक्षेत्र येथील भगवान शिव भगवान बालाजी यांची भव्य मंदिरे आपले वेगळेपण जपत आहेत. रेखीव कलाकृती,आकर्षक रंगछटा,भिंतीवरील  भगवान बालाजींची सचित्र कथा पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते. मंदिराच्या  प्रवेशव्दावर दिमाखात उभे असलेले सिंह बाल गोपांना आकर्षीत करून जातात.


भगवान बालाजी मंदिर
शिव पावन धारे मध्ये स्नान केल्यानंतर समोर भगवान बालाजी मंदिरात जाणा-या रस्त्यावर सुबक आणि उंच अशी कमान आहे.भगवान बालाजी मंदिर कळपापर्यंत ८१ फूट उंच असून मंदिराचे बांधकाम हेंमाडपंथी पध्दतीचे आहे.भगवान बालाजीची मूर्ती १३ फुट उंच असून असे शिल्प अन्यत्र नाही. दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जातो.

शिव जलाभिषेकाची दिव्य पावनधारा
शिव मंदिराच्या परकोटाच्या पाय-या चढून गेले की, सर्वप्रथम नजरेत पडते करस्थ गंगेची मूर्ती,गोमूखातून अविरत प्रवाहित होणारी पावनधारा आणि प्रशस्त गंगाकुंड.या पावन शिवधारेखाली स्नान करणा-यांच्या मनाची मलीनता दूर होते.विवेक जागृत होतो आणि भगवंताशी समिपता साधण्याची पात्रता  भाविकांच्या अंगी येते.सोमवार,अमावस्या,शिवरात्री इत्यादी प्रसंगी येथे पावनधारेखाली स्नानासाठी दर्शनासाठी रीघ लागते.

शैव  वैष्णव पंथाचा संगम असलेले देशातील पहिले तीर्थक्षेत्र
हरि  हर या दोन्हीमध्ये भेद नाहीम्हणून वैष्णव  शैवांना एकाच ठिकाणी भगवान बालाजी  भगवान शिवाचे दर्शन सुलभ घेता यावे,यासाठी  कर्मयोगी संत  पू  शुकदास महाराजांच्या संकल्पनेतून हरिहर तीर्थाची निर्मिती झाली.




संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८