बुध्दी ज्ञान प्रगटी करण्याचे माध्यम - संतोष गोरे

अज्ञानासारखा मानसाचा मोठा शत्रू नाही.अज्ञान हाच अंधकार आहे. जीवनात ज्ञानार्जना सारखा मोठा आनंद नाही. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाची कास धरावी. ज्ञान हे बुध्दी असेल तरच ग्रहण करणे शक्य आहे. बुध्दी ज्ञान या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.बुध्दी ज्ञान ग्रहण प्रगट करण्याचे माध्यम आहे असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी  बोलतांना व्यक्त केले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकांनद अपंग विद्यालयात कला शिक्षीका सौ.नंदा धाडकर यांच्या  सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापीका सौ.सुनिता गोरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे माजी जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त नारायण भारस्कर,अशोक गि-हे,कर्णबधिर विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके,ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती शिंदे,गंगाधर निकस,वैभव धाडकर,डॉ.नरेंद्र फिस्के तथा आदि उपस्थित होते.
यावेळी आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले यांच्या हस्ते नंदा धाडकर गोपाळ धाडकर  यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ सन्मानपत्र देवून यथोचित सत्कार करण्यात आला. सौ.नंदा धाडकर सन १९९४ पासून विवेकानंद अपंग विद्यालयात कला शिक्षिका या पदावर कार्यरत होत्या.  त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलतांना त्या खूप भावुक झाल्या होत्या. कणखर आवाज,कमालीची शिस्त त्यांची मुलांना शिकवण्याची तळमळ खूपच वेगळी होती. त्यांनी शेवट पर्यंत मुलांना तळमळीने ज्ञानदानाच काम केले. त्यामुळेच सर्वच  मुलं निरोप देतांना रडत असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपंग विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी ओंकार पुरी,विठ्ठल घोंगडे,गणेश शिंदे,निर्मला तुपकरी, सीमा सोनुने  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.सुनिता गोरे यांनी तर आभार प्रदर्शन आत्माराम दळवी यांनी केले

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा