रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या अतिवापराने शेतीचे संपूर्ण तंत्र बिघडले आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या महागडया किंमतीने शेतक-यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. याउलट सेंद्रिय पद्धतीने कमीत कमी खर्चात पिकावरील रोगांचे नियंत्रण करता येते. निंबोळी अर्क म्हणजे काय, निंबोळी अर्काचे महत्व,निंबोळी अर्क बनविण्याची पध्दती,निंबोळी अर्काचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कृषी सखी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी ग्राम शिवाजी नगर येथील शेतकरी बांधवांना करून दाखविले. रासायनिक किटकनाशकाच्या अतिरेकी वापरामुळे शेतीचे होणारे अतोनात नुकसान टाळण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करून फवारणी करण्याचा यावेळी कृषी सल्ला विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषी सखी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम शिवाजी नगर येथील शेतकरी बांधवांना दिला. यावेळी राजेश काकडे,वैजीनाथ काकडे,अरूण आव्हाळे,सुनिल काकडे,संजाबराव काकडे,मंगेश काकडे,गजानन आव्हाळे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी सखी ग्रुपमध्ये अखिला पुनम,पुजा वानखेडे,सत्यपावनी,निशा चव्हाण,ललिता गिरी,कोमल बोरकर,अर्पणा खीलारे उषा गवई पुजा मवाळ यांचा समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कृषी सखी ग्रुपच्या विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा.शिवशंकर काकडे,डॉ.प्रा.भानुदास भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहेत.
निंबोळी अर्क बनविण्याची पध्दती
निंबाळी अर्क करण्याची पध्दती अत्यंत साधी व सोपी असून शेतकरी बांधव आपल्या घरी कमीत कमी वेळेमध्ये निंबोळी अर्काची निर्मिती करून शकतात. प्रथम निंबोळयांची साल काढून घ्यावी. निंबोळया उन्हामध्ये वाळू घालाव्यात. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी निंबोळीची दळून वारीक पुड करावी. २ किलो निंबोळीची पुड एका कापडामध्ये गुंडाळून ती १५ लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. रात्रभर निंबोळीची पुड पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने निंबोळीचा पुर्ण अर्क पाण्यामध्ये उतरून एकरूप होतो. हा अर्क भाजीपाला,पिकांवर फवारल्यास किडीचा सेंद्रीय पध्दतीने बंदोबस्त होण्यासाठी मदत होते.
अशी आहे निंबोळी अर्काची महत्व
निंबोळी अर्क इकोफ्रेंडली असून निंबोळी अर्क बनविण्यासाठी मोठा खर्च येत नाही. कडूनिंबाच्या झाडामध्ये असलेले अॅझाडीराक्टीन किडनाशकाचे काम करते. निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या,फळमाश्या, लिंबावरील फुलपाखरे,खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी सखी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी शेतकरी बांधवांना निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दती व प्रात्यक्षिक करून निंबोळी अर्काचे महत्व पटवून दिले. कृषी सखी ग्रुपच्या विद्यार्थीनीच्या मार्गदर्शनाचा शेतकरी बांधवांना खूप फायदा होत आहे.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय
रासायनिक शेतीमुळे शेतीची होणारी हानी लक्षात घेवून आम्ही कृषी सखी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी शिवाजी नगर येथील शेतकरी बांधवांना निंबोळी अर्काचे महत्व प्रात्यक्षिकाव्दारे समजून सांगितले.
आखिला पुनम विद्यार्थीनी विवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा