विवेकानंद विद्या मंदिरचे विद्यार्थी कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा


मेहकर येथे दि., ऑगस्ट रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विवेकानंद विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन करून त्यांची जिल्हास्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे वयोगट १४ मधून संतोष शेळके ३० किलो वजयगट,कु.वैष्णवी संतोष गोरोळे ३३ किलो वजनगट, राम दयानंद थोरहाते ३८ किलो वजनगट,सुजित दिपकराव देशमुख ४८ किलो वजनगट,ओम सतिष धाडकर ५७ किलो वजनगट तर वयोगट १७ मधून कु.ईशा सुनिल धोंडगे ४० किलो वजनगट,शितल एकनाथ बोरकर ४९ किलो वजनगट,कु.संजिवनी निलेश हिवलेकर ६१ किलो वजनगट, तर १९ वयोगटामधून रोहन सुधाकर पडघान ७० किलो वजनगट,निखिल गजानन चक्रनारायण ७४ किलो वजनगट या विद्यार्थ्यांनी मेहकर  येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडुंची तयारी क्रीडा शिक्षक रणजित जाधव,आत्मानंद थोरहाते,गोविंद अवचार,श्याम खरात यांनी करून घेतली. या  खेळाडुंचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,मुख्याध्यापक कैलास भिसडे,उपमुख्याध्यापक अशोक गि-हे,पर्यवेक्षक आत्माराम जामकर,देवेंद्र मोरे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  



संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा