सेंद्रीय पध्दतीने किड नियंत्रणासाठी अमृतपाणी रामबाण


दिवसेंदिवस रासायनिक शेतीच्या सान्निध्यात सापडून शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडत आहे. नैसर्गिक पध्दतीने शून्य खर्चात शेती केल्यास कृषी क्षेत्र सुधारेल, खर्चात बचत होईल, नैसर्गिक विषमुक्त शेती स्वीकार करा. असे आवाहन कृषी विधाता ग्रुपने हिवरा आश्रम येथील शेतकरी बांधवाना केला. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कार्यानुभवाच्या कृषी विधाता ग्रुपने हिवराआश्रम येथील शेतक-यांना पिकांचे अमृतपाणी चा उपयोग करून सेंद्रिय पध्दतीने किडीपासून होणारे नुकसान कसे टाळावे यासंबंधी शेतक-यांना गुरूवारी ता. रोजी मार्गदर्शन केले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ग्राम हिवरा आश्रम येथील शेतक-यांना अमृतपाणी किड नियंत्रणासाठी कसे महत्वाचे आहे. अमृतपाणी कसे तयार करावे अमृतपाण्याचे महत्व सांगीतले. यावेळी विशाल घागरे,शेषराव काकडे,दत्ता गि-हे, विठ्ठल हुंबाड, अतुल गि-हे, दत्ता कुसळकर यांचे सह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपमध्ये काजोल पाटील, नितु जुनघरे, शिवगंगा मिसाळ, प्रज्ञा बागडे, भावना सरोदे, स्नेहल घुगे, कांचन सिरसाट, जुही परचाके, वैष्णवी बोर्डे, निकाता होने या विद्यार्थीनींचा समावेश आहे. कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा.पवन थोरहाते,प्रा.डॉ.भानुदास भोंडे,प्रा.समाधान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देत आहे. दरवर्षी पिकांचे किडीपासून नुकसान झाल्याने उत्पादनात घट होते. पिकांचे रोग नियंत्रण केले असता १२. टक्के तर किडींचे नियंत्रण केले असता ३२ टक्के उत्पादनात वाढ होते. अमृतपाणी हे नैसर्गिक असल्यामुळे पिकांवरती कुठलाही प्रकाराचा दुष्परीणाम होत नाही.

अमृतपाण्याची पिकांवर फवारणी केल्यास किडांपासून पिकांचे होणारे नुकसान टाळल्या जाते. अमृतपाण्यामध्ये असणा-या कडूपणामुळे बहुतेक किड पिकापासून दूर जातात. पिकांवर पी.जी.आर. फवारण्याचे काम पडत नाही.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय


शेतकरी बांधव अमृतपाणी घरी सहज तयार करू शकतातअमृतपाणी नैसर्गिक असल्याने अत्यंत कमीत कमी खर्चात तयार होतेअमृतपाणी फवारणीचा कुठलाही पिकांवर दुष्परिणाम होत नाही. 
काजोल पाटील विद्यार्थीनी विवेकानंद कृषी महाविद्यालय

असे बनावावे अमृतपाणी
किलो गायीचे शेण, किलो बेसन,१किलो कडुनिंबाचा कुटलेला पाला, लिटर गाईचे गोमूत्र,१०० ग्रॅम गूळ हे सर्व मिश्रण १० लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावे. तयार केलेल मिश्रण पाच ते सहा दिवस झाडाच्या सावलीखाली झाकून ठेवावे. सदर मिश्रण दिवसातून एक ते दोन वेळा हलवून घेत राहावे. सातव्या दिवशी मिश्रण चाळणी किंवा कापडाच्या साहय्याने गाळून घ्यावे. १० लिटर पाण्यामध्ये १०० मिली तयार केलेले मिश्रण एकत्र करून फवारणीसाठी वापरावे.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा