शुकदास महाराजांचे आदिवासींच्या सेवेत अमूल्य योगदान - संतोष गोरे

विवेकानंद आश्रमाची स्थापना करून निष्काम कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी आरोग्य,शिक्षण,कृषी,आदिवासी कल्याण,अपंग पुर्नवसन इत्यादी उदिष्ठांसाठी स्वतःचे जीवन समर्पित केले.दुर्गम तसेच डोंगरात तसेच जंगलात राहणा-या  आदिवासींना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम महाराजांनी तब्बल ४० वर्ष केले. त्यांचे आदिवासींच्या सेवेत हे अमूल्य योगदान असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी आश्रमात दि. ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या आदिवासी दिन कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलतांना व्यक्त केले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठचे प्राचार्य एन एन शिंदे  तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद नगरचे सरपंच सौ.निर्मला डाखोरे, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन करून झाली. पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, आदिवासींच्या वस्ती,वाडयापर्यंत चालत जावून त्यांना आरोग्य सेवा बहाल केली. भौरद, आंधारसांगवी अशी अनेक आदिवासी गावे त्यांनी विकासासाठी दत्तक घेतली होती. आज त्या गावांचा पुर्ण कायापालट झाला असून त्या गावांमध्ये शाळा,रस्ते,दवाखाने इत्यादी सुविधा निर्माण झाल्या आहे. त्या गावामधील अनेक आदिवासी युवक,युवती उच्चशिक्षण घेवून स्वतःला सिध्द करून दाखवित आहते. आदिवासी समाज हा निसर्गाला दैवत मानणारा,धाडसी वृत्तीचा आहे. परंतु दारिद्र,अज्ञान यामुळे  हा समाज अजूनही प्रगतीपासून दुर आहे.त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद आश्रम कटिबध्द आहे. आज आश्रमात जवळपास ४५० आदिवासी विद्यार्थी विद्यार्थीनी शिक्षण घेत असून भविष्यात ते यशस्वीरित्या वाटचाल करतील असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम,वक्तृत्व स्पर्धा,क्रीडा स्पर्धा इत्यादीत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना महाराजांच्या आठवणीने गहिवरून आले होते. कार्यक्रमा निमित्त उपस्थितांना मिष्ठान भोजन दिले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश येवले यांनी तर आभार प्रदर्शन अर्जुन जाधव यांनी केले.प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा