विवेकानंद कृषीच्या अखिलची उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रोलीयात निवड

विवेकानंद कृषी महाविद्यालय  गुणवत्तायुक्त कृषी शिक्षणासाठी सुप्रसिध्द आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी देशभरातील  विद्यार्थ्यांची  इच्छा असते. अखिल रामकृष्ण गड्डे हा वेस्ट गोदावरी जिल्हयातील विद्यार्थी असून आश्रमाच्या कृषी महाविद्यालयात चार वर्षापासून कृषी पदवीचे शिक्षण घेत आहे. पदवी परीक्षा संपल्यानंतर एम.एस साठी लागणारी आय.ई.एल.एस. ही परिक्षा उत्तीर्ण केली असून अमेरीका,ऑस्ट्रोलीया या देशात प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण असे आवश्यक असते. अखिलचीे ऑस्ट्रोलीयामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ न्यु इंग्लड या महाविद्यालयामध्ये सॉईल सायन्सच्या शिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे. कृषी शिक्षणात संशोधन व्हावेग्रामीण भागातील शेतक-याला दर्जेदार सुधारीत बियाणेउच्च तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे व त्यातून ग्रामीण भारतातला शेतकरी संपन्न व्हावा हे निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांचा ध्यास होता. याच उदात्त हेतूने २००३ मध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ प.पू.शुकदास महाराजांनी रोवली. या महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. आपल्या कृषी ज्ञानाच्या साहाय्याने असंख्य विद्यार्थ्यांनी शेती उदयोगात क्रांती घडवून आणली आहे. गत वर्षी कु. लक्ष्मीदुर्गा पडीयाला विद्यार्थीनीची इटली देशात एम.एस साठी निवड झालेली आहे. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून वेगवेगळया  क्षेत्रात घवघवीत यश संपादीत करीत असल्याबद्दल कार्यकारी मंडळ व कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कृषी शिक्षणानेच कृषी समृध्दी शक्य होणार आहे. प्रशस्त इमारत,प्रयोगासाठी दिडशे एकर शेती,उच्च गुणवत्ताधारक प्राध्यापकभव्य प्रयोग शाळा व कळेपर्यंत शिकवा हा प.पू.शुकदास महाराजांचा मंत्र महाविद्यालयाच्या यशाचे रहस्य असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी सांगीतले.

शेतकरी पुत्राची उत्तुंग भरारी
अखिल रामकृष्ण गड्डे हा वेस्ट गोदावरी जिल्हयातील विद्यार्थी आहे.अखिलला लहानपणापासून अभ्यासाची गोडी असलेल्या अखिल ने विवेकानंद कृषी महाविद्यालयात आपले कृषीचे शिक्षण पूर्ण केले.अखिलचे वडील शेतकरी असून शेती हा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. अखिलने घेतलेली झेप ही इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

विवेकानंद कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून कृषी जागृती
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषीचे शिक्षण मिळावे यासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालय सुरु केले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी बांधवाना कृषी चर्चा सत्रे  व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करून शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान ची माहिती दिली जाते.



संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा