येथील कर्मयोगी
संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्याचे माजी
विद्याथ्र्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा
परिक्षा उत्तीर्ण करीत घवघवीत यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेमध्ये विवेकानंद कृषी
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रवीण महादेव अप्पा नंदकुळे, सचिन राजू मोरे,
विशाल सत्यनारायण
जिरवणकार या तीन विद्यार्थ्यांची मंडळ कृषी अधिकारी नियुक्ती झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी
शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने २००३ मध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालय
सुरू केले. या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतक-यांसाठी कृषी मार्गदर्शन
चर्चा सत्रे,कृषी प्रदर्शनी,माती परिक्षण,किड व्यवस्थापन, तण व्यवस्थापन तसेच नवनवे कृषी तंत्रज्ञानाची माहिती
देण्यात येते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी नियमीत शेतकरी
बांधवांसाठी मार्गदर्शन करीत असतात. या विद्यार्थ्यांच्या कृषी मार्गदर्शनाचा
जवळपासच्या खेडयातील शेकडो शेतकरी बांधवांनी लाभ घेवून शेतीमध्ये सुधारणा केल्या.
विवेकानंद कृषी महाविद्यालयातून अनेक
गुणवंत विद्यार्थी उत्तीर्ण होवून अनेक यश संपादन केले. विवेकानंद कृषी
महाविद्यालयातील या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई वडील व
विवेकानंदन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य ,सर्व प्राध्यापकांना दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा