तालीमें नही दी जाती परिंदो को उडानो की... वे खुद ही तय करते है उॅचाई आसमानो की...रखते है जो हौसला आसमां को छुने का वो नही करते परवाह जमीन पे गिर जाने की.. या ओळीचा प्रत्यय हिवरा आश्रम येथील उच्चशिक्षीत निलीमा दत्तात्रय काळे यांच्या रूपाने दिसून येतो. निलीमा काळे यांनी नोकरीची कास न धरता ग्रामीण भागात सिमेंट उद्योग उभा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आपला सिमेंट उद्योग सुरू करण्याचा मनोदय पती दत्तात्रय काळे यांना पटवून दिला. निलीमा काळे यांनी चिखली मेहकर रोडच्या बाजूला एका एकराच्या शेतात समृध्दी सिमेंट उद्योग सुरू केला. ग्रामीण भागातील उघडयावर शौचास जाणा-या महिलांची होणारी कुचंबना लक्षात घेवून कमीत कमी खर्चात रेडीमेड शौचालय निर्मिती करण्याचे ठरले. समृध्दी सिमेंट कारखान्याच्या माध्यमातून दहा ते पंधरा लोकांना मजूरी मिळवून त्यांना उपजिवीकेचा साधन मिळाले आहे. निलीमा काळे यांच्या समृध्दी कारखान्यामध्ये रेडीमेड सिमेंट चौकटी,
सिमेंट खिडक्या,
सिमेंट बाक,
पाण्याचे हौद,
रेडीमेड शौचालय इत्यादी सिमेंटचे स्वस्त व टिकाऊ उत्पादन निर्मिती होत आहे. सदर कारखान्यातील रेडीमेड शौचालय अत्यंत माफक दरात मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकडून या सिमेंट रेडिमेड शौचालयाला बुलडाणा,
वाशिम व अकोला येथून मोठया प्रमाणात मागणी आहे. सदर कारखान्यातील रेडीमेड शौचालय चार बाय चार या आकाराच्या जागेत बसविता येतो. समृध्दी सिमेंट कारखान्यातील रेडीमेड शौचालय विकत घेण्यासाठी ग्रामीण भागातील जनेतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण
भागातल्या ठरल्या पहिल्या उद्योजिका
हिवरा आश्रम
सारख्या छोट्याशा खेड्यामध्ये उद्योग सुरु करुण्याचे धाडस नीलिमा काळे यांनी
केले.यामाध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. नीलिमा काळे यांनी
सिमेंट कारखाना सुरु केल्यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळून त्यांचा आत्मविश्वास
वाढला आहे.
ऑरगॅनिक प्रॉडक्ट निर्मितीचा मानस
रासायनिक उत्पादनामुळे मानवाच्या शरीरावर परिणाम होवून दिवसेंदिवस माणसाचे आरोग्य धोक्यात येवून अनेक आजार उदभवत आहे. याकरीता निलीमा काळे यांनी ऑरगॅनिक उत्पादन निर्मिती करणार आहे. यामध्ये मधुमेह व्यक्तीसाठी शुगर फ्री ऑरगॅनिक शुगर,ग्रीन टी,आयुर्वेदीक औषधी,घरघुती व महिलांचे सौंदर्य प्रसादने अशी ऑरगॅनिक,
हर्बल उत्पादने निर्मिती करणार आहे.
उत्पादनाला तीन
जिल्हयातून मागणी
सदर कारखान्यातील
रेडीमेड शौचालय अत्यंत माफक दरात मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब
जनतेकडून या सिमेंट रेडिमेड शौचालयाला बुलडाणा, वाशिम व अकोला येथून
मोठया प्रमाणात मागणी आहे. सदर कारखान्यातील रेडीमेड शौचालय चार बाय चार या
आकाराच्या जागेत बसविता येतो.
महिला सुध्दा उद्योग सुरू करून यामध्ये यशस्वी होऊ शकतात. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत असतांना ग्रामीण भागातील महिला मागे का?
या हेतूने समृध्दी सिमेंट उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. समृध्दी सिमेंट उद्योगाच्या माध्यमातून इतरांना रोजगार मिळाला आहे.
नीलीमा काळे, ग्रामीण उद्योजिका हिवरा आश्रम
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा