विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कबड्डी संघाचे सुयश


येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत विद्यापीठस्तरावर यश संपादन केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धाचे आयोजन दि. ऑक्टोंबर ते ऑक्टोंबर रोजी देऊळगांव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालय येथे पार पडल्या. या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये ५६ महाविद्यालयाच्या संघानी भाग घेतला होता. सदर कबड्डी स्पर्धेमध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालयातील मुलांच्या कबड्डी संघाने व्दितीय क्रमांक पटकावून विद्यापीठ स्तरावर घवघवीत यश संपादन केले. यामध्ये संघाचे कप्तान विशाल गालट,अमोल काळे,वैभव चांदणे,अनंता अंभोरे,निखील लाहे,गोकुळ बेलोकार,पवन बोरकर,शुभम अरू,रोहीत ओेहरे,वैभव इंगळे,देवेंद्र काळे,ॠषिकेश शिंदे या खेळाडूंचा समावेश होता. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कबड्डी संघाला प्रा.रवींद्र काकड यांचे मार्गदर्शन लाभले होते. या खेळाडूंचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवेयांनी अभिनंदन केले.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा