ग्रामीण कलावंताला आपल्या कलेचे प्रकटीकरण करण्याची योग्य संधी मिळल्यास त्याचे कसे सोने होते हे हिवरा आश्रम येथील युवा शाहिर विक्रांतसिंह राजपूत व अक्षय राजपूत यांनी दाखवून दिले. शाहिरी कलेची परंपरा लाभलेल्या या गुणी युवा शाहिराला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. झी युवा सिंगर एक नंबर या रिअॅलिटी शोच्या महाअंतिम सोहळयाचे विजेतेपद विदर्भ मराठवाडाच्या एम.एच.फोक्स या ग्रुपने पटकावुन बुलडाणा जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला. विदर्भ मराठवाडयाच्या या एम.एच.फोक्स या ग्रुपमध्ये बुलडाण्याच्या शाहिर विक्रांतसिंह राजपूत व अक्षय राजपूत या दोन शाहिर बंधूचा उल्लेखनिय सहभाग होता.
झी.युवा qसगर एक नंबर या महाअंतिम सोळयाचे मानकरी ठरलेल्या एमएच फोक्स या ग्रुपला जेष्ठ नेते शरदचंद्र पवार,सुप्रियाताई सुळे,रोहित पवार यांच्या हस्ते २ लाख ६० हजार रूपये,सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.यावेळी स्पर्धेचे परिक्षक वैभव मांगल्ये,सावणी शेंडे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.
दिवसेंदिवस लोप पावत चाललेल्या महाराष्ट्राच्या अभिजात लोककलेला,सर्जनशीलतेची जोड देत शाहिर विक्रांतसिंह राजपूत व अक्षय राजपूत या युवा कलाकारांनी विदर्भ मराठवाडयाचा एमएच फोक्स या ग्रुपची स्थापना करून झी युवा सारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या लोककलेचे नाविण्यपूर्ण सादरीकरण करीत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले. युवा सिंगर एक नंबर या रिअॅलिटी शोच्या महाअंतिम फेरीतील उत्कंटावर्धक विजेतेपद पटावले.
एमएच फोक्स ग्रुपेने पारंपारीक संगीताला नाविन्याची जोड देत रसिकांचे मनोरंजन केले. प्रबोधनाची उत्तुंग झेप घेणा-या एम.एच.फोक्स ग्रुपमध्ये संकेत राजपूत औरंगाबाद,अनिल घोगरे औरंगाबाद,कल्याण उगले जालना,संतोष साळुंके लातूर,प्रतिज्ञा गायकवाड लातूर,स्वरांजली पंचाळ लातूर व बुलडाणा जिल्हयातील शाहिर विक्रांतसिंह राजपूत,अक्षय राजपूत यांचा समावेश होता.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील उच्चतम कलाविष्काराचे प्रकटन करणा-या व प्रसिध्दपासून दूर असणा-या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम झी युवा या वाहिनीने झी युवा सिंगर एक नंबर या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. या दोन्ही बंधूंनी कल्पक सादरीकरणातून महाराष्ट्रातील रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. बुलडाणा जिल्हयाच्या लोक परंपरेला चार चाँद लावले. एमएच फोक्स ग्रुपने मुंबई येथे झालेल्या ऑडिशन प्रक्रियेचे तीन राऊंड पार करत या संघाने मेघा ऑडिशनमध्ये स्थान मिळविले.एमएच फोक्स या ग्रुपूने महाराष्ट्राच्या काळजाचा ठाव घेत रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविले. शाहिर विक्रांतसिंह राजपूत हे स्व.बाबुसिंह राजपूत यांचे सुपूत्र सज्जनसिंह राजपूत यांचे पुत्र आहे.
बुलडाणा जिल्हयाच्या शिरपेचात मानचा तूरा
युवा शाहिर विक्रांतसिह राजपूत व अक्षय राजपूत या बंधूंनी शाहिरी कलेची परंपरा लाभलेल्या या गुणी शाहिराला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. झी युवा सिंगर एक नंबर या रिअॅलिटी शोच्या महाअंतिम सोहळयाचे विजेतेपद विदर्भ मराठवाडाच्या एम.एच.फोक्स या ग्रुपने पटकावुन बुलडाणा जिल्हयाच्या
शिरपेचात मानाचा तूरा रोवला.
विदर्भातील शाहीर बंधूंची निवड ठरली लक्षवेधी
या शोच्या ऑडिशनसाठी ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. चाळणी प्रकियेतून १६ कलावंतांची या स्पर्धेसाठी अंतिम निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या १६ स्पर्धेकांमये विदर्भातील शाहिर विक्रांतसिंह राजपूत व अक्षय राजपूत या दोन बंधूची निवड लक्षवेधी ठरली.
शाहिरी परंपरा अविरत सुरू
बाबूसिंह राजपूत यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या शाहिरी कार्यक्रमातून महाराष्ट्रभर प्रबोधनाचे मोठे काम केले. शाहीर बाबूसिंह राजपूत आणि त्यांचे गुरू शाहीर गोकुळसिंह क्षत्रिय यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या शाहिरीने संबंध महाराष्ट्र भर शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम केले राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम केले. त्यांच्या हा वसा शाहिर सज्जनसिंह राजपूत यांनी समर्थपणे सुरू ठेवत आपला मुलगा विक्रांतसिंह याला सुध्दा शाहिरीचे बालकडू लहानपणापासून दिले. शाहिर बाबूसिंह राजपूत कलामंचाच्या माध्यमातून हे कार्य महाराष्ट्रभर अविरतपणे सुरू ठेविले आहे.
प.पू.शुकदास महाराजश्रीं कडून शाबासकी व कौतुकाची थाप
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री हे कलेचे चाहते व कलावंताची कदर करणारे होते. युवा शाहिर विक्रांतसिह राजपूत यांच्यातील गुण ओळखून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी विवेकानंद जन्मोत्सव २०१६ च्या विवेकानंद जन्मोत्सवाच्या तीनही दिवसाच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी युवा शाहिर विक्रांतसिह राजपूत याचे सोपविली व विक्रांतqसहने सुध्दा ती तितक्याच समर्थपणे पार पाडली. महाराजश्रींच्या अनिवासी यांचा निवास याठिकाणी अनेक वेळा कार्यक्रमांच्या माध्यमातून दोन्ही पिता पुत्रांच्या पाठीवर शाबासकीची व कौतुकाची थाप दिली.
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा