Responsive Ads Here

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

किमया बुधवाणीचे फोल्डेबल हेल्मेट तालुकास्तरावर


विवेकानंद विद्या मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये येथील किमया कमलेश बुधवाणी या विद्यार्थीनीचे फोल्डेबल हेल्मेट प्रथम आले असून याची तालुकास्तरावर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त असलेल्या जिज्ञासू संशोधक वृत्तीला चालना प्रोत्साहन देण्यासाठी विवेकानंद आश्रम दरवर्षी कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज यांचा जयंती निमित्त जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन  करण्यात येते. विवेकानंद विद्या मंदिरात आयोजीत केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला जिल्हाभरातील बालवैज्ञानिकांना आपल्या प्रयोगाव्दारे अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध होते. यावर्षी  या विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील १२६ बालवैज्ञानिकांनी आपला सहभाग नोंदविला होता. विवेकानंद विद्या मंदिरात इयत्ता मध्ये शिकणारी कु.किमया कमलेश बुधवाणी या विद्यार्थीनीच्या फोल्डेबल हेल्मेट चा प्रथम क्रमांत येवून तीच्या फोल्डेबल हेल्मटची तालुकास्तराव निवड झाली. दरवर्षी रस्ता अपघातात मृत्यू पावणा-यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. दुचाकीस्वार अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मृत्यू होते. किमया बुधवाणी हीने बनविलेले फोल्डेबल हेल्मेट हे अत्यंत कमी खर्चात घरी तयार करता येते. हे हेल्मेट अत्यंत कमी वजनाचे असल्यामुळे मान दुःखीच्या रूग्णांसाठी या फोल्डेबल हेल्मेट फायदेशीर ठरणार आहेया विज्ञानप्रदर्शनी मध्ये वर्ग ते मधून प्रथम क्रमांक फोल्डेबल हेल्मेट या कु.किमया बुधवाणी हीचा आला. तर व्दितीय सुरक्षा अलाराम आनंद खराटे,तृतीय जलविद्युत निर्मिती महेश देवकर यांने पटकाविला. वर्ग ते मधून प्रथम प्रथम डोंगराळ प्रदेशातील वाहतूक सुरज कंकाळ,अनिल धंदर,व्दितीय ईस्त्राईल शेती कु.पुजा काकडे,कु.पुजा डुकरे,कु.पुजा जाधव तर तृतीय स्मोक क्लिनर ओम पोफळे,नकुल देशमुख,मंगेश खिल्लारे यांनी पटकाविला.विज्ञान प्रदर्शनाचे मुल्यमापन प्रा.तायडे,प्रा.राठी,प्रा.दाभाडे ,मारोती ठाकरे,विजय गोसावी,मारोती घोरपडे,विष्णु सुरडकर,सदानंद शेळके यांनी केले.

असे बनविले फोल्डेबल हेल्मेट
मक्याचे पिठ आणि पाणी यांचे मिश्रण करून द्रावण तयार करावे हे द्रावण प्लास्टिक पिशवी मध्ये भरावे टोपी मध्ये ही पिशवी घालावी. मक्याचे पिठ आणि पाणी यांच्या मिश्रणाने नॉन न्युटेनियन फ्लूड  तयार होतो. जेव्हा या मिश्रणावर अचानक दाब पडता क्षणीच न्युटेनियम फ्लूड कडक बनतो त्यामुळे डोक्याला जबर मार बसण्यापासून वाचता येते.

रस्ता अपघातामध्ये डोक्याला जबर मार बसल्यामुळे मृृत्यू पावणाèयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फोल्डेबल हेल्मेट ही अत्यंत कमी खर्चात तयार होते.
किमया कमलेश बुधवाणी, विद्यार्थीनी हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा